Aai Tuljabhavani Marathi Serial: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Sanchi Bhoyar on Playing Young Tulja Bhavani: सध्या मनोरंजन विश्वात सगळीकडे AI आणि VFX चा बोलबाला आहे. मोठमोठे चित्रपट सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले जात आहेत. अशा काळात कलर्स मराठीवरील एका मालिकेने वेगळीच जादू केली आहे. ती मालिका म्हणजे ‘आई तुळजाभवानी’. या मालिकेत छोट्या तुळजाईची भूमिका साकारणारी बालकलाकार सांची भोयर सध्या सगळ्यांची लाडकी झाली आहे. Aai Tuljabhavani Marathi Serial:
सांचीला तुम्ही याआधी ‘इंद्रायणी’ या गाजलेल्या मालिकेत पाहिलं असेल. त्या मालिकेमधून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. इंद्रायणीने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली. आता ‘आई तुळजाभवानी’ मधून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. कमी वेळातच तिने छोट्या तुळजाईच्या रूपात लोकांची मनं जिंकली आहेत.
छोट्या वयात देवीची भूमिका साकारणं हे खूप मोठं आव्हान असतं. सांचीने तिच्या अनुभवाबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “आई तुळजाईची भूमिका करणं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे पण तितकंच भारी पण वाटतंय. डोक्यावर मोठा मुकुट घालणं, सिंहासनावर बसणं, कथा सांगणं, हे सगळं खूप वेगळं आहे. त्यात आमच्या मालिकेत खूप मोठे VFX आणि ऍक्शन सीन्स आहेत.”
Bepanwah Movie: अहान पांडे-शर्वरीची ‘बेपरवाह’ झेप! यशराज फिल्म्सकडून नव्या सिनेमाची घोषणा
“विशेषतः जेव्हा असुरिके सोबत युद्धाचे सीन्स असतात, तेव्हा खूप मेहनत घ्यावी लागते. VFX साठी लागणारे एक्सप्रेशन बरोबर देणं खूप कठीण असतं. एकाच सीनसाठी अनेक वेळा रिटेक घ्यावे लागतात. सुरुवातीला तर शूटिंगचं वेळापत्रक सांभाळणं खूप अवघड वाटत होतं. पण आमचे दिग्दर्शक आणि पूर्ण टीम मला खूप मदत करतात. त्यांच्या सपोर्टमुळे सगळं सोपं झालं आहे,” असं सांचीने सांगितलं.
सांची अजून लहान आहे, शाळेत शिकते. त्यामुळे शूटिंगसोबत अभ्यास पण करावा लागतो. याबद्दल ती म्हणाली, “मी सेटवर ब्रेक मिळाला की लगेच अभ्यास करते. शूटिंग आणि अभ्यास दोन्हीचा बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करते. आई तुळजाईच्या रूपात असताना एक वेगळीच पॉवर, वेगळीच एनर्जी मिळते असं वाटतं.”
“सेटवर बालसेनेसोबत खेळणं, मस्ती करणं, हे सगळे क्षण खूप भारी असतात. हा पूर्ण प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि कधीही न विसरण्यासारखा आहे,” असं म्हणून तिने तिचा आनंद व्यक्त केला.
AI आणि VFX चा वापर जरी होत असला तरी शेवटी अभिनय महत्त्वाचा असतो आणि सांची तो अभिनय अगदी मनापासून करत आहे. तिच्या डोळ्यातली निरागसता आणि तिचा अभिनय यामुळेच लोक तिला छोटी तुळजाई म्हणून स्वीकारत आहेत.तुम्हाला जर सांचीचा हा नवा अवतार पाहायचा असेल तर ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका दररोज रात्री 8:50 वाजता कलर्स मराठीवर नक्की बघा. आणि तुम्हाला कुठेही कधीही बघायची असेल तर JioHotstar वर पण ती उपलब्ध आ






