Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadi Anant Trailer Launch : ‘आदि अनंत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित ! आजोबा-नातवाच्या नात्याची भावस्पर्शी गोष्ट

Aadi Anant Trailer Launch : अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘आदि अनंत’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटात आजोबा आणि नातवाच्या नात्यातील गंमतीजंमती, भावनिक क्षण आणि कौटुंबिक नात्यांमधील आपुलकी पाहायला मिळणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत हा चित्रप

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 21, 2026 | 09:54 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • प्रत्येक घरात आजी-आजोबांच्या काही खास सवयी  
  • ‘आदि अनंत’ मधून सगळे पैलू प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न  
  • आजच्या धावपळीच्या आयुष्यात कुटुंबासोबत घालवलेले क्षण किती महत्त्वाचे
Aadi Anant Trailer Launch : कधी हट्ट, कधी मिश्किल संवाद, तर कधी एकमेकांना दिलेली साथ, तर कधी मनाला भिडणारे क्षण आहेत. अशा अनेक रंगांनी सजलेल्या आजोबा-नातवाच्या नात्याची गोष्ट घेऊन पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलर लाँच सोहळ्याची खासियत म्हणजे या ट्रेलरचे अनावरण ‘आदि अनंत’ टीमच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले.

अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या कौटुंबिक गोष्टीची झलक पाहायला मिळाली. आजोबा-नातवाच्या नात्यातील गंमतीजंमती, भावनिक चढ-उतार आणि नात्यांना नवी दिशा देणारे प्रसंग यांची सांगड घालणारा हा ट्रेलर चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवतो.

प्रत्येक घरात आजी-आजोबांच्या काही खास सवयी

प्रत्येक घरात आजी-आजोबांच्या काही खास सवयी असतात, नातवंडांचे हट्ट असतात आणि त्यातून तयार होतात अनेक अविस्मरणीय किस्से. ‘आदि अनंत’मधील आजोबा आणि नातवाचे नातेही अशाच वेगळ्या रंगांनी खुलताना दिसते. दोन पिढ्यांमधील विचारांची गंमत, एकमेकांशी जुळवून घेण्याची धडपड आणि नात्यात दडलेली ओढ यांतून या चित्रपटाची कथा आकार घेत असल्याचे दिसते आहे. ट्रेलरमधील प्रसंग या नात्याची केवळ भावनिक बाजूच नव्हे, तर त्यातील सहज विनोद आणि मनोरंजनही समोर आणतात.

Jay Jay Swami Samarth: स्वामींच्या अनुपस्थितीत स्वामीस्थानात अवधूतची अनपेक्षित एंट्री! रणजीतला थेट आव्हान देणारा हा बालक कोण आहे?

‘आदि अनंत’ मधून सगळे पैलू प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न

दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, “आजोबा आणि नातवाचं नातं पडद्यावर मांडताना मला त्यातील सहजता आणि त्यांच्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग महत्त्वाचे वाटले. या नात्यात कधी गंमत असते, कधी मतभेद असतात, तर कधी शब्दांत न मावणारी जवळीक असते. ‘आदि अनंत’ मधून हे सगळे पैलू प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट बघताना प्रेक्षकांना त्यांच्या घरातल्या माणसांची आठवण नक्की येईल. यामध्ये आजोबा – नातवाचं नातं असले तरीही हा प्रत्येक नात्याचा चित्रपट आहे, जो संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहाणं गरजेचं आहे.

आजच्या धावपळीच्या आयुष्यात कुटुंबासोबत घालवलेले क्षण किती महत्त्वाचे

निर्माते समीर हंपी आणि अनिकेत मराठे सांगतात, ” आदि अनंत’ची गोष्ट तिच्यातील साधेपणामुळे आणि नात्यांमधील वेगळेपणामुळे आम्हाला भावली. आजच्या धावपळीच्या आयुष्यात कुटुंबासोबत घालवलेले क्षण किती महत्त्वाचे असतात, हे या चित्रपटातून अधोरेखित होते. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांची जोडी या कथेला खास रंगत देते. मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना आपुलकीची जाणीव करून देणारा हा कौटुंबिक चित्रपट आहे.”

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह यांनी सहनिर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर यांच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. येत्या १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dhasal Movie Teaser Out : धम्मा फेस्टिव्हलमध्ये ‘ढसाळ’चा हुंकार; ललित प्रभाकरचा दमदार लूक समोर

Web Title: Aadi anant marathi movie trailer ashok saraf sankarshan karhade sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 09:54 PM

Topics:  

  • Akhil Bharatiya Marathi Sahitya
  • Entertainment marathi
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

Dhasal Movie Teaser Out :  धम्मा फेस्टिव्हलमध्ये ‘ढसाळ’चा हुंकार; ललित प्रभाकरचा दमदार लूक समोर
1

Dhasal Movie Teaser Out : धम्मा फेस्टिव्हलमध्ये ‘ढसाळ’चा हुंकार; ललित प्रभाकरचा दमदार लूक समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.