Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aarti Solanki: ‘बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं…’; गणेशमूर्तींच्या बदलत्या ट्रेंडवर आरती सोलंकी संतापली, पोस्ट व्हायरल

Aarti Solanki: बॅलन्सिंग गणेशमूर्तींच्या ट्रेंडवर अभिनेत्री आरती सोलंकीने नाराजी व्यक्त केली. ‘बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं योग्य आहे का?’ असा सवाल करत पोस्ट शेअर केली.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 01, 2026 | 01:26 PM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aarti Solanki: गणेशोत्सवाची चाहूल लागली की बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वत्र सुरू होते. गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. मोठमोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांचे आगमन सोहळे सध्या पाहायला मिळत आहेत. या आगमन सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

मात्र, यंदा ‘बॅलन्सिंग गणेशमूर्ती’ सर्वाधिक चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या मूर्तींबाबत नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी या अनोख्या मांडणीचं कौतुक केलं आहे, तर काहींनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

याच बदलत्या ट्रेंडवर अभिनेत्री आरती सोलंकी हिने नाराजी व्यक्त केली आहे. गणपती बाप्पाचं रूप मुळातच सुरेख आणि देखणं असताना त्यांना वेगळ्या रूपात घडवण्याची गरज काय, असा सवाल अभिनेत्रीने उपस्थित केला आहे.

‘बाप्पाला वेगळ्या रूपात घडवण्याची काय गरज?’

आरती सोलंकीने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत गणेशमूर्तींच्या बदलत्या स्वरूपावर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. “अरे, हे काय चालवलंय? गणपती बाप्पाचं रूप मुळातच सुरेख, देखणं… अगदी गोड असताना बाप्पाला वेगळ्या रूपात घडवण्याची काय गरज?” असा सवाल तिने केला आहे.

मंडपात देखावा करण्यापेक्षा बाप्पाचं पारंपरिक स्वरूप जपण्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे, असंही आरतीने आपल्या पोस्टमधून म्हटलं आहे. “मंडपात देखावा हवा तो करा… खरंतर त्याचीही गरज नाही. पण मंडळांच्या स्पर्धेत वाढ झालीये, तर काय करणार?” असं म्हणत तिने मंडळांमधील वाढत्या स्पर्धेवरही भाष्य केलं आहे.

‘बॅलन्सिंगच्या नावावर बाप्पाला हवेत लटकवणं योग्य आहे का?’

सध्या चर्चेत असलेल्या बॅलन्सिंग गणेशमूर्तींबाबत आरतीने विशेष नाराजी व्यक्त केली. “सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे बॅलन्सिंगच्या नावावर बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं हे योग्य आहे का? वाईट वाटतं बाप्पासाठी…” असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

गणेशोत्सव आणि बाप्पाचं स्वरूप पारंपरिक असावं, असं मतही अभिनेत्रीने व्यक्त केलं. “सण आणि बाप्पा हा पारंपरिक हवा. स्वत:च्या मुलांना फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तयार करतात, तसं बिचाऱ्या बाप्पाला सजवत आहेत,” असं म्हणत तिने या बदलत्या ट्रेंडवर नाराजी व्यक्त केली.

पोस्टच्या शेवटी आरतीने बाप्पाकडेच एक मिश्किल पण स्पष्ट मागणी केली आहे. “माफ करा बाप्पा… तुम्ही बुद्धीचे देवता आहात, आता याल तर सगळ्यांना चांगली बुद्धी द्या!” असं तिने म्हटलं आहे.

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Chinchpokli Cha Chintamani: गणपतीच्या उत्साहाला न्युकेलियाची अनोखी मानवंदना; ‘आला रे आला’ गाण्याची खास झलक सादर

आरती सोलंकीची पोस्ट चर्चेत

आरती सोलंकीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. गणेशोत्सवातील बदलते ट्रेंड आणि मंडळांमधील वाढती स्पर्धा यावर अभिनेत्रीने व्यक्त केलेल्या मतावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरती सोलंकीने मांडलेलं हे स्पष्ट मत सध्या चर्चेचा विषय ठरत असून, तिच्या पोस्टमुळे गणेशमूर्तींच्या बदलत्या ट्रेंडवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Raqesh Bapat: ‘नवरी मिळे हिटलरला’नंतर राकेश बापट पुन्हा छोट्या पडद्यावर; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत साकारणार ‘ही’ दमदार भूमिका

Web Title: Aarti solanki balancing ganesh murti ganeshotsav 2026 post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Ganesh Festival
  • marathi actress

संबंधित बातम्या

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?
2

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?

Nepal Flash Flood: नेपाळमधील मुलांसाठी ‘देवदूत’ बनला सोनू सूद, फोटो शेअर करत म्हणाला,‘घर-कुटुंब, बालपण सगळं गमावलं, पण..’
3

Nepal Flash Flood: नेपाळमधील मुलांसाठी ‘देवदूत’ बनला सोनू सूद, फोटो शेअर करत म्हणाला,‘घर-कुटुंब, बालपण सगळं गमावलं, पण..’

Toxic Worldwide Collection: सातव्या दिवशी ‘टॉक्सिक’च्या कमाईत मोठी वाढ; वर्ल्डवाइड कलेक्शन पोहोचलं इतक्या कोटींवर
4

Toxic Worldwide Collection: सातव्या दिवशी ‘टॉक्सिक’च्या कमाईत मोठी वाढ; वर्ल्डवाइड कलेक्शन पोहोचलं इतक्या कोटींवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.