Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?

Dwidha Movie Review: दिग्दर्शक निलेश भास्कर नाईक यांनी आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणात ‘द्विधा’ या चित्रपटातून एक संवेदनशील आणि वेगळा विषय मांडला आहे. जाणून घ्या चित्रपटाचा रिव्ह्यू.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 02, 2026 | 12:39 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘द्विधा’ची कथा नेमकी काय?
  • सतीश पुळेकरांनी जिंकली मनं
  • ‘द्विधा’ पाहावा की नाही?
Review By: माधवी वाडकर
Rating For the Movie: 4/5

Dwidha Movie Review: मराठी चित्रपटसृष्टीला नेहमीच प्रयोगशील दिग्दर्शक आणि विषय मिळाले आहेत. सध्या द्विधा हा मराठी चित्रपट चर्चेत आहे. दिग्दर्शक निलेश भास्कर नाईक यांनी आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणात ‘द्विधा’ या चित्रपटातून एक संवेदनशील आणि वेगळा विषय मांडला आहे. दोन पिढ्यांमधील अंतर, जुन्या नात्यांमधील भावनिक ओलावा आणि आजच्या प्रॅक्टिकल जगण्यातील कायदेशीर व व्यावहारिक गणित यांचा सुंदर मेळ या चित्रपटात पाहायला मिळतो.

वडिलांचं वचन की बाळाचं भविष्य?

चित्रपटाची कथा श्रावणीभोवती फिरते. मानसी कुलकर्णी साकारत असलेली श्रावणी पाच वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर अमेरिकेतून वसईतील माहेरच्या घरी परतते. भूतकाळातील मिसकॅरेजचं दुःख मागे टाकत ती आता पुन्हा आई होणार असते. मात्र, घरी परतल्यानंतर वडिलांना गंभीर आजार असल्याचं समोर येतं आणि तिच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळतं.

लहानपणीच आईला गमावलेल्या श्रावणीचं तिच्या वडिलांशी असलेलं नातं अत्यंत घट्ट असतं. बालपणी तिने वडिलांना कधीही सोडणार नसल्याचं वचन दिलेलं असतं. वडिलांनीही आपल्या मुलीसाठी अनेक त्याग केलेले असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांच्यासोबत राहणं हे श्रावणीसाठी केवळ कर्तव्य नसून भावनिक बांधिलकी असते.

मात्र, दुसरीकडे तिचा पती अमेरिकेत स्थायिक असतो. अमेरिकेत बाळाचा जन्म झाल्यास त्याला तिथल्या नागरिकत्वाचा फायदा मिळू शकतो, या विचाराने तो श्रावणीने अमेरिकेत परत यावं, यासाठी आग्रही असतो. त्यामुळे वडिलांसोबत राहण्याचं बालपणीचं वचन की बाळाच्या भविष्यासाठी घेतलेला व्यावहारिक निर्णय, या द्वंद्वात श्रावणी अडकते. हाच संघर्ष चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.

Toxic Worldwide Collection: सातव्या दिवशी ‘टॉक्सिक’च्या कमाईत मोठी वाढ; वर्ल्डवाइड कलेक्शन पोहोचलं इतक्या कोटींवर

मानसी कुलकर्णीचा सहज अभिनय

मानसी कुलकर्णीने श्रावणीची व्यक्तिरेखा अत्यंत नैसर्गिक पद्धतीने साकारली आहे. विशेषतः तिच्या एन्झायटीचे प्रसंग आणि भावनिक घुसमट कोणत्याही आडपडद्याशिवाय पडद्यावर मांडण्यात आली आहे. विदाऊट मेकअप आणि सहज अभिनयामुळे तिची व्यक्तिरेखा अधिक खरी वाटते. श्रावणीच्या मनातील संभ्रम, भीती आणि भावनिक संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.

सतीश पुळेकरांचा कसलेला अभिनय

ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांनी श्रावणीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयामुळे बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक ओलावा अधिक गडद होतो. वडिलांच्या व्यक्तिरेखेतून त्याग, प्रेम आणि मुलीबद्दलची काळजी प्रभावीपणे समोर येते.

चित्रपटातील इतर पात्रेही कथेला मजबूत आधार देतात. रेणुका दफ्तरदार यांनी साकारलेली आत्या आणि निमेष कुलकर्णी यांनी साकारलेला आत्याचा मुलगा ही पात्रं सहजसुंदर अभिनयातून कथेला वेगळा आयाम देतात.

ओवी कुलकर्णीने जिंकली मनं

बालकलाकार ओवी कुलकर्णी हिचं विशेष कौतुक करावं लागेल. हा तिचा पहिलाच चित्रपट असूनही तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे ओवीची भूमिका अभिनेत्री मानसी कुलकर्णीच्या खऱ्या आयुष्यातील लेकीने साकारली आहे. तिच्या सहज वावरामुळे चित्रपटातील भावनिक प्रसंगांना आणखी परिणामकारकता मिळते.

दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू

दिग्दर्शक निलेश नाईक यांनी संवादांपेक्षा मूक भावना, नात्यांमधील सूक्ष्म बदल आणि मानवी मानसशास्त्रावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे चित्रपटातील अनेक प्रसंग संवादांपेक्षा भावनांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात.

अमेरिकेतील जन्म आणि नागरिकत्वाचा मुद्दा कथेत महत्त्वाचा असला, तरी तो जबरदस्तीने मांडल्यासारखा वाटत नाही. कौटुंबिक भावनांच्या कथानकात हा व्यावहारिक पैलू सहजपणे गुंफण्यात आला आहे.

चित्रपटाची गाणीही कथेला साजेशी आहेत. बाप-लेकीच्या जुन्या आठवणी आणि बालपणीचे प्रसंग पाहताना ही गाणी प्रेक्षकांना नॉस्टॅल्जियाच्या जगात घेऊन जातात. वसईचं सुंदर चित्रण आणि कादंबरीसारखी हळूहळू पुढे सरकणारी कथा चित्रपटाच्या वातावरणाला अधिक भावनिक बनवते.

Nepal Flash Flood: नेपाळमधील मुलांसाठी ‘देवदूत’ बनला सोनू सूद, फोटो शेअर करत म्हणाला,‘घर-कुटुंब, बालपण सगळं गमावलं, पण..’

‘द्विधा’ एकदा अनुभवायलाच हवा

‘द्विधा’ हा केवळ एका मुलीसमोर उभ्या राहिलेल्या निर्णयाचा चित्रपट नाही, तर नाती, कर्तव्य, पालकांचं प्रेम आणि भविष्यासाठी घेतले जाणारे व्यावहारिक निर्णय यांच्यातील संघर्ष मांडणारा चित्रपट आहे. काही ठिकाणी कथा रेंगाळत असली तरी ती कंटाळवाणी होत नाही. बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक क्षण मनाला भिडतात आणि शेवटपर्यंत श्रावणीचा निर्णय काय असेल, याची उत्सुकता कायम राहते.

Web Title: Dwidha movie review nilesh naik marathi film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Movie Review

संबंधित बातम्या

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड
1

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच
2

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर
3

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर

Marathi Movie: प्रेम, लग्न आणि नात्यांमधील ट्विस्ट! पूजा सावंत-अभिजीत खांडकेकरच्या ‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर प्रदर्शित
4

Marathi Movie: प्रेम, लग्न आणि नात्यांमधील ट्विस्ट! पूजा सावंत-अभिजीत खांडकेकरच्या ‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.