Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flash Flood: नेपाळमधील मुलांसाठी ‘देवदूत’ बनला सोनू सूद, फोटो शेअर करत म्हणाला,‘घर-कुटुंब, बालपण सगळं गमावलं, पण..’

Nepal Flash Flood: नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोनू सूद नेपाळमध्ये पोहोचला आहे. मुलांसोबतचे फोटो शेअर करत त्याने भावुक संदेश दिला असून, त्याच्या या कार्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 02, 2026 | 12:05 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोहोचला सोनू सूद
  • मुलांसोबतचे फोटो शेअर करत दिला भावुक संदेश
  • सोनू सूदच्या मदतकार्याचं सोशल मीडियावर कौतुक
Nepal Flash Flood: नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली असून, अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकजण सध्या आपली उद्ध्वस्त झालेली घरं आणि विस्कटलेलं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतः नेपाळमध्ये पोहोचला आहे.

सोनू सूदने नेपाळमधील आपल्या प्रवासाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो स्थानिक नागरिक आणि लहान मुलांची भेट घेताना दिसत आहे. त्यांच्याशी संवाद साधत सोनू त्यांचं दुःख आणि परिस्थिती जाणून घेताना दिसतोय.

फोटो शेअर करताना सोनूने या निष्पाप मुलांनी आपली घरं, कुटुंबं आणि बालपण गमावल्याचं म्हटलं आहे. मात्र, या कठीण काळात आपण सर्वजण मिळून नव्याने सुरुवात करू शकतो, असा आशावादी संदेशही त्याने दिला आहे. नेपाळमधील नागरिकांनी या संकटाच्या काळात स्वतःला एकटं समजू नये, आपण त्यांच्या सोबत आहोत, असं सोनूने आपल्या पोस्टमधून सांगितलं.

सोनूच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी त्याला ‘खरा हिरो’ आणि ‘देवदूत’ म्हणत त्याच्या मदतकार्याचं कौतुक केलं आहे.

3 Idiots Sequel: ‘3 इडियट्स’च्या सीक्वलवर राजकुमार हिरानींची मोठी अपडेट; आमिर खानसह जुनी स्टारकास्टच दिसणार का?

जीवनावश्यक वस्तू घेऊन नेपाळमध्ये पोहोचला सोनू

दरम्यान, सोनू सूदने माध्यमांशी संवाद साधताना नेपाळला जाण्यामागचं कारण सांगितलं. पूरग्रस्तांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि त्यांना आवश्यक जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी आपण नेपाळमध्ये आल्याचं त्याने सांगितलं.

भारताकडून मोठ्या प्रमाणात मदतसामग्री नेपाळमध्ये आणण्यात आली आहे. गरजू नागरिकांना मदत करणं आणि त्यांचं आयुष्य पुन्हा रुळावर आणण्यासाठी शक्य तेवढा हातभार लावणं हे आपलं ध्येय असल्याचं सोनूने स्पष्ट केलं.


Toxic Worldwide Collection: सातव्या दिवशी ‘टॉक्सिक’च्या कमाईत मोठी वाढ; वर्ल्डवाइड कलेक्शन पोहोचलं इतक्या कोटींवर

‘कोणीही स्वतःला असहाय्य समजू नये’

संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणं ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं सोनूने म्हटलं. पूरग्रस्तांसाठी ब्लँकेट्स, शिधा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू नेपाळमध्ये आणण्यात आल्या आहेत.

या मदतीमुळे पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळावा आणि त्यांना पुन्हा नव्याने आयुष्य उभं करण्यासाठी बळ मिळावं, हा सोनूचा प्रयत्न आहे. नेपाळमधील या संकटाच्या काळात सोनू सूदने दाखवलेल्या माणुसकीमुळे त्याच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Nepal flash flood sonu sood children viral photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Nepal Flood
  • sonu sood

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.