( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Ambani Ganpati Celebration: मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती अंबानी कुटुंबीयांच्या ‘एंटीलिया’ या निवासस्थानी दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ‘एंटीलिया चा राजा’चं थाटात स्वागत करण्यात आलं. अंबानी कुटुंबीयांच्या गणपती दर्शनासाठी बॉलिवूडसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. सलमान खान, विक्की कौशल, कतरिना कैफ, सैफ अली खान, करीना कपूर, रणवीर सिंह, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली.
अभिनेता सलमान खान अंबानींच्या गणपती दर्शनासाठी ‘एंटीलिया’मध्ये पोहोचला. याआधी त्याने भाऊ सोहेल खान यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी सलमान क्लीन-शेव लूकमध्ये दिसला. हलक्या निळ्या रंगाचा चेक्स शर्ट, व्हाइट-वॉश डेनिम जीन्स आणि डोक्यावर बंदाना अशा कॅज्युअल लूकमध्ये त्याने फोटोग्राफर्सना पोझ दिल्या.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांनीही ‘एंटीलिया’मध्ये हजेरी लावत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
View this post on Instagram
सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी मुलं तैमूर आणि जहांगीर यांच्यासह अंबानींच्या गणपती उत्सवाला हजेरी लावली. पारंपरिक वेशभूषेत या चौघांचाही लूक लक्षवेधी ठरला. करीना मस्टर्ड यलो रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसली, तर सैफने लाल कुर्ता आणि धोती परिधान केली होती. तैमूर आणि जेह यांनीही पारंपरिक कुर्ता परिधान केला होता. यावेळी करिश्मा कपूरही करीना आणि कुटुंबीयांसोबत दिसली.
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र मुलगी एकता कपूरसोबत अंबानींच्या गणपती पूजेत सहभागी झाले. एकता गुलाबी रंगाच्या पारंपरिक पोशाखात दिसली, तर जितेंद्र यांनी पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केला होता.
अभिनेता रितेश देशमुख पत्नी जेनेलिया डिसूझासोबत ‘एंटीलिया’मध्ये पोहोचला. ‘धुरंधर’ फेम अभिनेता रणवीर सिंह याचीही या गणपती उत्सवाला उपस्थिती पाहायला मिळाली.
View this post on Instagram
क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकरही आपल्या कुटुंबासह अंबानींच्या गणपती पूजेत सहभागी झाला. सचिनने नारंगी रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केला होता. त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर निळ्या साडीत, तर मुलगी सारा तेंडुलकर हिरव्या साडीत सुंदर दिसत होती. मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.
View this post on Instagram
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांनीही अंबानी कुटुंबीयांच्या गणपती पूजेला हजेरी लावली. कियारा गुलाबी साडीत तर सिद्धार्थ प्रिंटेड शॉर्ट कुर्त्यामध्ये दिसला. या दोघांनीही फोटोग्राफर्ससमोर पोझ दिल्या.
अंबानींच्या ‘एंटीलिया’मधील गणपती उत्सवात बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी लावलेल्या हजेरीमुळे यंदाच्या गणेशोत्सवाची रंगत आणखी वाढली. सेलिब्रिटींचे पारंपरिक लूक आणि गणपती दर्शनाचे फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.






