(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस आयुष्यभर मेहनत घेत असतो. आयुष्यात कितीही यश, प्रसिद्धी आणि पैसा मिळाला तरी स्वतःच्या हक्काचं घर नसल्यास काहीतरी अपूर्ण असल्याची भावना अनेकांच्या मनात असते.
असंच एक स्वप्न आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि Anushri Mane हिचंही पूर्ण झालं आहे. साध्या परिस्थितीतून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अनुश्रीने नुकतंच स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे तिने मुंबई किंवा पुण्यात नव्हे, तर पिंपरी -चिंचवडमध्ये हे स्वप्नातील घर उभारलं आहे. खरं तर अनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये घर कुठे घेतलंय याचा उल्लेख केलेला नाही. पण तिच्या घराच्या वास्तू शांतीसाठी गेलेल्या काही जणांनी पोस्टमध्ये शहराचं नाव टाकलंय.
तिच्या घराच्या वास्तू शांतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.वस्त्रवेद बाय शुभांगी या पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अनुश्रीच्या नवीन घराची आणि कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांची झलक दिसत आहे.
अनुश्री मानेच्या नवीन घराच्या गृहप्रवेश सोहळ्याला तिचे मित्र आणि Bigg Boss Marathi मधील सहकलाकारांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. या सोहळ्यात तन्वी कोलते, रोशन भजनकर, ओमकार, रुचिता जामदार, विशाल कोटियन, राधा पाटील आणि प्रभू शेळके सहभागी झाले होते. सर्वांनी अनुश्री आणि तिच्या आईला नव्या घरासाठी शुभेच्छा देत त्यांच्या आनंदात सहभागी झाले.
View this post on Instagram
Dwidha Marathi Movie: बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास; ‘द्विधा’ उलगडणार भावनांची नवी बाजू
अनुश्रीने देखील एक भावुक पोस्ट लिहून एक फोटो शेअर केला आहे.
अनुश्रीने पोस्टमध्ये लिहिले, “भाड्याच्या एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. कितीतरी अश्रू, कितीतरी अपयश, कितीतरी जागलेल्या रात्री… पण स्वप्नांवरचा विश्वास कधी सोडला नाही. आज माझ्या स्वतःच्या घराची वास्तुशांती करताना हवनाच्या त्या ज्वाळांमध्ये मला माझा संपूर्ण प्रवास दिसतोय.”
पुढे ती म्हणाली, “हे घर फक्त विटा आणि सिमेंटचं नाही… हे माझ्या आईच्या त्यागाचं, माझ्या कष्टाचं आणि बाबांच्या आशीर्वादाचं स्वप्न आहे. आज मन भरून आलंय. कारण एकेकाळी डोक्यावर स्वतःचं छप्पर असावं असं स्वप्न पाहणारी मुलगी, आज तिच्या स्वतःच्या घरात देवाचं स्वागत करतेय.”
वडिलांची आठवण काढताना अनुश्रीने भावनिक शब्दांत लिहिले, “बाबा, तुम्ही आज असता तर सर्वात जास्त आनंद तुम्हालाच झाला असता…”
View this post on Instagram
Anushri Mane हिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते आणि मित्रपरिवार तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी तिच्या संघर्ष, मेहनत आणि जिद्दीचे कौतुक करत नव्या घरासाठी अभिनंदन केले आहे.






