
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. 4 जून 1947 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात.आपल्या अचूक विनोदी अभिनयामुळे आणि सहजसुंदर भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ आजही चाहत्यांचे लाडके आहेत.मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन आणि आदर्श जोडी म्हणून अशोक व निवदेता सराफ यांच्याकडे पाहिले जाते. पडद्यावर विनोदी, गंभीर आणि विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे खासगी आयुष्यात मात्र अत्यंत शांत आणि मितभाषी स्वभावाचे आहेत. प्रसिद्धीच्या झोतात राहूनही त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच माध्यमांपासून दूर ठेवले. त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये कायम असते.
अशोक मामांची प्रेमकहाणी
मामांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेमकहाणीवर एक नजर टाकूया… विशेष म्हणजे, अशोअशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. मात्र या दोघांच्या वयात तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे, हे अनेकांना माहीत नसते. अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला, तर निवेदिता जोशी-सराफ यांचा जन्म ६ जून १९६५ रोजी झाला.क सराफ यांचा दोन्ही घरचा पाहुणा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता अवघ्या सहा वर्षांच्या होत्या. मात्र नियतीने पुढे या दोघांना एकत्र आणलं.
नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली पहिली भेट
१९७१ साली अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते २४ वर्षांचे होते. त्याच वेळी निवेदिता अवघ्या सहा वर्षांच्या होत्या. पुढे काळाच्या ओघात दोघांनीही मराठी चित्रपटसृष्टीत आपापली वेगळी ओळख निर्माण केली.नाटकाच्या प्रयोगादरम्यान झालेली पहिली भेट, त्यानंतर चित्रपटांमधील सहकार्य आणि पुढे वाढलेली मैत्री—यातूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. विशेष म्हणजे, काही प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी भाऊ-बहीण अशा भूमिकाही साकारल्या, पण वास्तव आयुष्यात हे नाते वेगळ्याच वळणावर गेलं.घरातून विरोध, वयातील मोठं अंतर आणि समाजातील चर्चांना सामोरं जात त्यांनी आपलं नातं पुढे नेलं. या प्रवासात जवळच्या मित्रांची साथही महत्त्वाची ठरली. अनेक चढउतार पार करत अखेर त्यांच्या प्रेमाने स्थैर्य मिळवलं.’मामला पोरींचा’ या चित्रपटाच्या सेटवर जुळलेले मनाचे बंध पुढे जाऊन आयुष्यभराच्या नात्यात परिवर्तित झाले. प्रेम, समजूतदारपणा आणि विश्वास यांच्या जोरावर त्यांनी आपली रेशीमगाठ बांधली.
या ठिकाणी पार पडले लग्न
या दोघांच्या वयात तब्बल १८ वर्षांचं अंतर आहे. ही गोष्ट सुरुवातीला निवेदिताच्या आईला मान्य नव्हती, त्यामुळे या नात्याला कुटुंबातून विरोध झाला होता.मात्र कुटुंबातील इतर सदस्य, विशेषतः बहिणीच्या पुढाकाराने या नात्याला हळूहळू मान्यता मिळाली. अखेर अतिशय साधेपणाने गोव्यातील प्रसिद्ध मंगेशी मंदिर येथे आई आणि बहिणीसह जाऊन या दोघांनी विवाह केला.विवाहानंतर निवेदिता आणि अशोक सराफ यांनी आपलं कौटुंबिक जीवन स्थिरपणे पुढे नेलं. मुलगा अनिकेत सराफ याच्या जन्मानंतर निवेदिता यांनी काही काळासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. या काळात त्यांनी स्वतःचा साड्यांचा व्यवसाय (हंसगामीनी) सांभाळत कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यवसाय यांचा समतोल राखला.पुढे त्यांनी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात दमदार कमबॅक केला. मराठी मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेषतः अग्गबाई सासूबाई या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.