Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayesha Khan Engagement: आयशा खानने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक फोटो व्हायरल

Ayesha Khan Engagement: ‘धुरंधर’ फेम आयेशा खानच्या मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटो आणि डायमंड रिंगमुळे साखरपुड्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जाणून घ्या या फोटोंमागचं सत्य.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 19, 2026 | 10:11 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Ayesha Khan Engagement: ‘बिग बॉस १७’ फेम आणि अभिनेत्री आयेशा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’ या गाण्यातील तिच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर आता आयेशाच्या एका सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. आयेशाने काही फोटो शेअर केले असून, त्यात ती एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या बोटात दिसणाऱ्या हिऱ्याच्या अंगठीमुळे तिच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मिस्ट्री मॅनसोबत फोटो, हातात डायमंड रिंग

आयेशाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्यासोबत एक व्यक्ती दिसत आहे. मात्र, या व्यक्तीचा चेहरा तिने उघड केलेला नाही. त्यामुळे हा व्यक्ती नेमका कोण आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यातच आयेशाच्या हातातील सुंदर डायमंड रिंगने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

आयेशाने या फोटोंसोबत ‘एक स्वप्न’ असे कॅप्शन लिहिले आहे. तसेच तिने एका ज्वेलरी ब्रँडलाही टॅग केले आहे. त्यामुळे हे फोटो एखाद्या ज्वेलरी ब्रँडच्या फोटोशूटचा भाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयेशाने अद्याप आपल्या साखरपुड्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

‘शरारत’ गाण्यामुळे मिळाली लोकप्रियता

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’ या गाण्यात आयेशा खान आणि क्रिस्टल डिसूझा यांनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कराचीमधील एका भव्य लग्नसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हे गाणे चित्रित करण्यात आले होते. दोघींनी लग्नातील नर्तकींची भूमिका साकारली होती.

या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव आयेशासाठी मात्र सोपा नव्हता. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले होते की, गाण्याचे शूटिंग दोन दिवस चालले आणि या काळात तिला प्रचंड धावपळ करावी लागली.

2026 New Bollywood Couples: नवे चेहरे, नवी केमिस्ट्री! २०२६मध्ये या बॉलिवूड जोड्या करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

शूटिंगदरम्यान आयेशा भावुक झाली होती

आयेशाने सांगितले की, शूटिंगदरम्यान तिला मासिक पाळी आली होती आणि त्यामुळे तिला शारीरिक तसेच भावनिक त्रास जाणवत होता. दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर काम पूर्ण करायचे असल्याने संपूर्ण टीमवर मोठा ताण होता.

“मी स्वतःला आवरू शकले नाही आणि रडू लागले,” असे आयेशाने सांगितले होते. पुढे तिने स्पष्ट केले की, हे आनंदाश्रू होते. तिच्यासाठी हा अनुभव भावनिक आणि खास होता.

Home Minister New Season: २० वर्षांचा प्रवास, ७,५०० पैठण्या आणि लाखो आठवणी; ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात

‘बिग बॉस १७’मध्येही झाली होती चर्चेत

आयेशा खान ‘बिग बॉस १७’मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. शोमध्ये तिच्या आणि मुनवर फारुकीच्या नात्याची मोठी चर्चा झाली होती. आयेशाने मुनवरवर फसवणूक आणि एकाच वेळी अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे आरोप केले होते.

आता ‘शरारत’मधील लोकप्रियतेनंतर आयेशा पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या हातातील डायमंड रिंग आणि मिस्ट्री मॅनमुळे साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले असले, तरी आयेशाने याबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे हे खरंच साखरपुड्याचे संकेत आहेत की केवळ ज्वेलरी शूटचा भाग, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Ayesha khan engagement rumours mystery man diamond ring

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • Ayesha khan
  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग
1

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
2

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
3

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.