(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
पहिल्या सीझनमधील विनोद आणि कौटुंबिक जिव्हाळा कायम ठेवत या सीझनमध्ये कटारिया कुटुंबातील प्रत्येक पात्राला नव्या परिस्थितींचा सामना करताना दाखवण्यात आलं आहे. त्यासोबतच पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही नवे पैलूही समोर येणार आहेत.
सीझन 2 मध्ये नेमका काय बदल पाहायला मिळणार आहे, याबद्दल सुष्मा कटारियाची भूमिका साकारणाऱ्या शीबा चड्ढा यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यांच्या मते, दुसऱ्या सीझनचं लेखन अशा पद्धतीने करण्यात आलं आहे की पहिल्या सीझनचा मूळ गाभा कायम ठेवतानाच प्रत्येक पात्राचा प्रवास पुढे जातो.
शीबा चड्ढा म्हणाल्या, “याचे लेखन खूप छान आहे आणि प्रत्येक पात्र काहीतरी नवीन करत आहे.”
शीबा यांच्या मते, या सीझनमध्ये सुष्माच्या व्यक्तिमत्त्वातही महत्त्वाचा बदल पाहायला मिळतो. यावेळी ती आपल्या इच्छा आणि कुटुंबासाठीच्या निर्णयांबाबत अधिक पुढाकार घेताना दिसणार आहे.
आपल्या पात्राच्या प्रवासाबद्दल बोलताना शीबा म्हणाल्या, “तिला जे करायचे आहे, त्याबाबत ती अधिक पुढाकार घेतेय. ती स्वतःसाठी आणि कुटुंबासाठीही गोष्टी करत आहे आणि पुढाकार घेत आहे.”
सुष्माच्या पात्रातील हा बदल आपल्याला यावेळी विशेष आवडल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, सीझन 2 मध्ये सुष्माच्या पात्राचा एक प्रकारे विकास झाला आहे.
‘बकैती’च्या दुसऱ्या सीझनमध्ये कटारिया कुटुंबातील नातेसंबंध आणि दैनंदिन आयुष्यातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून विनोद आणि भावना उलगडताना पाहायला मिळणार आहेत. नव्या परिस्थितींमुळे कुटुंबातील सदस्यांसमोर काही नवी आव्हानं उभी राहणार असून, त्यातूनच अनेक मजेशीर आणि भावनिक प्रसंग घडणार आहेत.
ZEE5च्या अधिकृत माहितीनुसार, या सीझनमध्ये राजेश तैलंग, शीबा चड्ढा, तान्या शर्मा, आदित्य शुक्ला आणि रमेश राय हे कलाकार झळकत आहेत.
‘बकैती’ सीझन 2 आता ZEE5 वर स्ट्रीम होत असून, कटारिया कुटुंबाच्या नव्या गोंधळाची आणि त्यांच्या नात्यांमधील बदलांची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.






