(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Bigg Boss 20: सलमान खानचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस २०’ सध्या चर्चेत आहे. शोमध्ये दररोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये अमन गांधीला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्या एक्झिटमुळे घरातील वातावरण भावूक झाले. अमनच्या जवळच्या मैत्रिणी उदिती सिंग आणि अरिशफा खान यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, सलमान खानने आगामी ‘वीकेंड का वार’बाबत मोठी घोषणा केली आहे. पुढील भागात सलमान खानऐवजी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
‘बिग बॉस २०’च्या ताज्या ‘वीकेंड का वार’मध्ये ११ नॉमिनेटेड स्पर्धकांपैकी अमन गांधी, उदिती सिंग आणि मेरी कोम यांना सर्वात कमी मते मिळाल्याचे सांगण्यात आले. या तिघांमध्ये अमन गांधीला सर्वात कमी मते मिळाल्याने त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. सलमान खानने अमनच्या हकालपट्टीची घोषणा केली.
अमनच्या एक्झिटमुळे त्याच्या जवळच्या मैत्रिणी उदिती सिंग आणि अरिशफा खान भावूक झाल्या. अमनच्या जाण्याने घरातील समीकरणांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये स्पर्धकांचा खेळ कसा बदलणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सलमान खानने पुढील ‘वीकेंड का वार’मध्ये तो उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले. व्यस्त वेळापत्रकामुळे तो आगामी भागाचे सूत्रसंचालन करू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी रोहित शेट्टी ही जबाबदारी सांभाळणार आहे.
रोहित शेट्टी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि स्पर्धकांना त्यांच्या चुका दाखवून देण्याच्या शैलीसाठी ओळखला जातो. त्यामुळे आगामी ‘वीकेंड का वार’मध्ये तो घरातील सदस्यांची कशी शाळा घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यापूर्वीही रोहित शेट्टीने ‘बिग बॉस’च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली आहे.
नकुल धुल, गुल्लू आणि कनिका मान यांच्यावरही सलमानची प्रतिक्रिया
या भागात सलमान खानने नकुल धुल आणि गुल्लू यांच्यात झालेल्या वादावरही भाष्य केले. गुल्लूने ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याचे सांगत त्याने गुल्लूचे कौतुक केले. याशिवाय, सलमानने कनिका मानच्या खेळाचेही कौतुक केले.
दुसरीकडे, काझी तौकीरच्या वागणुकीवर सलमान खानने नाराजी व्यक्त केली. काझी खेळात चुकीच्या दिशेने जात असल्याचे सांगत त्याने आपल्या वागण्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
आता सलमान खानच्या अनुपस्थितीत रोहित शेट्टी ‘वीकेंड का वार’मध्ये कोणत्या स्पर्धकांना धारेवर धरणार आणि घरातील कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.






