Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Bangla Viral Video: १५०-२०० कॅमेरे अन् स्पर्धकांचा खुलेआम रोमान्स! सौरव गांगुलींचा पारा चढला, स्पर्धकांना थेट वॉर्निंग

Bigg Boss Bangla Viral Video: सौरव गांगुली सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस बांग्ला’ या रिअॅलिटी शोमधील राजवीर आणि नंदिनी यांच्या जवळिकीच्या व्हिडिओंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 26, 2026 | 12:30 PM
Bigg Boss Bangla: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Bigg Boss Bangla: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बिग बॉस बांग्लातील राजवीर-नंदिनीच्या VIDEO ची चर्चा.
  • स्पर्धकांच्या रोमान्सवर सौरव गांगुलींचा संताप.
  • सोशल मीडियावर VIDEO व्हायरल; नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी.

छोट्या पडद्यावर सगळ्यात जास्त लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो बिग बॉस आहे. शोमधल्या स्पर्धेकांची चर्चा सर्वत्र होत असते. सध्या देशात सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये बिग बॉस सुरु आहे. सर्वत्र चर्चा असते ती सलमान खानच्या हिंदी बिग बॉसची, आता मात्र चित्र थोड उलट पाहायला मिळत आहे, बांगली भाषेतील बिग बॉसमधील काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या शोचे होस्टिंग माजी क्रिकेटर सौरव गांगुली करत आहेत. Bigg Boss Bangla Viral Video:

नेमकं काय झालं?

सौरव गांगुली होस्ट करत असलेल्या बिग बॉस बांग्लामध्ये स्पर्धकांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या. घरात जवळपास 150 ते 200 कॅमेरे लावलेले आहेत त्या प्रत्येक कोपऱ्यातील कॅमेरामध्ये शूटिंग सुरू असतं हे माहीत असून सुद्धा दोन स्पर्धक उघडपणे इंटिमेट झाले आहेत. हा तर फॅमिली शो असल्याने लहान मुले हा शो आवडीने पाहतात. तरी पण असं वागल्यामुळे सौरव गांगुलीला प्रचंड राग आला आहे. त्याने थेट त्या स्पर्धकांना वॉर्निंग दिली आहे.

राजवीर आणि नंदिनीने ओलांडली मर्यादा

बिग बॉस बांग्लामधले स्पर्धक राजवीर आणि नंदिनी यांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. हे दोघे जवळपास विसरुन गेले आहेत की, एका रिऍलिटी शोमध्ये असून तिथे 24 तास कॅमेरे सुरू असतात. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये हे दोघे अनेक वेळा कॅमेऱ्यासमोरच इंटिमेट होताना दिसत आहेत. कधी घट्ट मिठी मारणं, कधी लिप लॉक करणं असं सगळं उघडपणे सुरू होतं. घरातले बाकीचे स्पर्धक पण हे बघून अवघडून गेले.

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच …

फॅमिली शोमध्ये असला रोमान्स आणि इंटिमेट होणं हे बघून सौरव गांगुलीचा पारा चढला. विकेंडच्या भागात त्याने राजवीर आणि नंदिनीला चांगलंच सुनावलं. “हे काय चाललंय? तुम्ही विसरलात का की तुम्ही कुठे आहात? हा शो पूर्ण फॅमिली बघते, याचं भान ठेवा,” असं तो रागात म्हणाला. सौरवला एवढ्या रागात बघून घरातले सगळे स्पर्धक पण शांत झाले होते.

Scout and love are nothing in front of what’s happening in BB Bangla 😭😭 https://t.co/UfPdKTznIj — EmilyP (@itsallhereeeee) October 25, 2026

सोशल मीडियावर लोकांचा संताप

सोशल मीडियावर राजवीर आणि नंदिनीच्या त्या क्लिप्स खूप व्हायरल होत आहेत. लोक त्यावर कमेंट करत आहेत. काही लोक म्हणत आहेत की हा बिग बॉस आहे की दुसरंच काही. लोक असं पण म्हणत आहेत की सलमानच्या हिंदी बिग बॉस मधला लव्ह कटारिया आणि स्काऊटचा रोमान्स तर यांच्या पुढे काहीच नाही. बांग्ला बिग बॉसने तर सगळ्या हद्दीच पार केल्या.

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच …

काही नेटकऱ्यांनी मेकर्सना पण प्रश्न विचारले आहेत की टीआरपीसाठी तुम्ही असे घाणेरडे टास्क करून घेता का? फॅमिली शोमध्ये असं दाखवणं चुकीचं आहे.आता सौरव गांगुलीने वॉर्निंग दिल्यानंतर पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राजवीर आणि नंदिनी सुधारणार का? की त्यांना घराबाहेर काढलं जाणार? हे येणाऱ्या भागातच कळेल. पण सध्या तरी बिग बॉस बांग्लाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title: Bigg boss bangla sourav ganguly warns rajveer nandini viral video rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Viral Video: आई आजारी पडली अन् 14 वर्षांच्या लेकाने करून दाखवलं असं काही; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
1

Viral Video: आई आजारी पडली अन् 14 वर्षांच्या लेकाने करून दाखवलं असं काही; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

Shivali Parab: शिवाली परबची नवी इनिंग सुरू! अमेरिकेतून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
2

Shivali Parab: शिवाली परबची नवी इनिंग सुरू! अमेरिकेतून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: राहुल गांधी निर्दोष, सुलतानपूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: राहुल गांधी निर्दोष, सुलतानपूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय

ACB Trap : मातीच्या भरावासाठी लाचेचा व्यवहार ;सहा हजार रुपये घेताना वनपाल रंगेहात पकडला
4

ACB Trap : मातीच्या भरावासाठी लाचेचा व्यवहार ;सहा हजार रुपये घेताना वनपाल रंगेहात पकडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.