फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठी 6 मध्ये दररोज नवनवीन वळणे पाहायला मिळत आहेत. ही वळणे अनपेक्षित आहेत कारण या वळणांनी खरा वलय देण्याचे काम स्वतः बिग बॉस करत आहेत. यंदाच्या आठ्वड्यातच बिग बॉसने घरातील सदस्यांना घरातील खिडक्यांशी ओळख करून देऊन त्यांना सावध राहण्यासाठी सांगितले कारण या खिडकीतून येणार आहेत “कधी संकट, कधी पाहुणे”. पण यंदाच्या वेळी पाहुणेच संकट बनून आले आहेत. पाहुण्यांमध्ये मांजर आणि कुत्रा (बाहुले) घरी पाठ्वण्यात आले आहे. घरात दोन गट पाडून दोन्ही गटांना एकेक पाहुणा सांभाळायला दिला आहे. त्यामुळे घरातल्यांची दमछाक झाली आहे.
दरम्यान, बिग बॉसने घरातील सदस्यांना एक टास्क दिला होता. या टास्कमध्ये घरातल्यांना आपल्या मनातला राग, आपल्या मनातले भाव त्या पाहुण्यांसमोर मांडायचे होते. एकंदरीत, पाडलेल्या गटांमधील एका व्यक्तीने चर्चा करून गटाने निवडून दिलेल्या दुसऱ्या गटातील व्यक्तीबद्दल असलेल्या मनातील भावना, राग, द्वेष व्यक्त करत आलेल्या पाहुण्यांना अगदी सौम्य भाषेत आणि शुद्ध मराठी भाषेत त्या व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे. यामध्ये तन्वीने तिच्या मांजर (पाहुण्याला) विशालची ओळख करून दिली आणि तिचा संवाद फार चर्चेत आला. यामध्ये विशाल आणि तन्वीमध्ये वाद नाही पण गोड शब्दात शाब्दिक बाचाबाची नक्कीच झाली कारण तन्वीने अगदी मधुर शब्दात विशालसाठी तिच्या मनात असलेला द्वेष आणि राग, तिच्या पाहुण्याला पटवून दिला, एकंदरीत विशालच्या त्या बाजूशी जी तन्वीला अजिबात आवडत नाही, एक ओळख करून दिली. त्यावर विशालने प्रत्युत्तर दिले की “तो तन्वीसारखा समोरच्याला खाली खेचून वर जाण्याचा प्रयत्न करणार नाही. तो काहीच बोलणार नाही.” पण यामध्ये विशालने तन्वीला सर्कसमधली शेर आहेस अशी उपमा दिली कारण तन्वीनेदेखील विशालला लांडगा म्हंटले होते.
दरम्यान, बिग बॉसने शेअर केलेल्या चर्चेमध्ये दिसून येत आहे की हाच मुद्दा तन्वी आणि राकेशमधील संवादाचे कारण बनले आहे, त्यामध्ये तन्वी राकेशला म्हणते की “हा टास्क आपल्या मनातील त्या भावना व्यक्त करण्याचा होता, जे आपण समोरासमोर बोलत नाही.” तेव्हा तिने विशालचा देखील मुद्दा काढला की “तो आधी म्हणतो की मी काहीच बोलणार नाही आणि नंतर मला म्हणतो की तू सर्कशीतली वाघ आहेस. म्हणजे आधी दाखवायचं की मी किती चांगला आहे आणि नंतर स्वतःच बुराई करायची.” तन्वीने म्हंटले की “खलनायक आहेस तर तशाच रहा ना! उगाच आधी स्वतःला नायक बनवायचा प्रयत्न का करतो?” या चर्चेनंतर आजच्या भागात काय घडेल? हे पाहणे महत्वाचे ठरेल.






