Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Choli Ke Peeche Controversy: माधुरी दीक्षितचं ‘चोली के पीछे’ गाणं ठरलं होतं वादग्रस्त; मदतीला धावून आले होते बाळासाहेब ठाकरे

Choli Ke Peeche Controversy: ‘खलनायक’मधील ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावरून मोठा वाद झाला होता. ३२ हून अधिक संघटनांनी विरोध केला होता. सुभाष घईंनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 30, 2026 | 01:04 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Choli Ke Peeche Controversy: दिग्दर्शक सुभाष घई यांच्या कारकिर्दीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘खलनायक’. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत मोठं यश मिळवलं. मात्र, या यशासोबतच ‘खलनायक’ला एका गाण्यामुळे मोठ्या वादालाही सामोरं जावं लागलं होतं.

माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आलेलं ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. मात्र, रिलीजच्या वेळी या गाण्यावर अश्लीलतेचा आरोप करण्यात आला होता. अनेक संघटनांनी या गाण्याला तीव्र विरोध केला होता. देशभरात आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली होती. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, चित्रपटाच्या प्रदर्शनालाच विरोध करण्यात आला होता.

३२ हून अधिक संघटनांनी केला होता विरोध

अनेक वर्षांनंतर सुभाष घई यांनी या जुन्या वादाची आठवण सांगितली आहे. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ‘खलनायक’च्या प्रदर्शनापूर्वी ३२ हून अधिक संघटनांनी चित्रपटातील गाण्याविरोधात आंदोलन केलं होतं.

सुभाष घई म्हणाले, “३२ हून अधिक संघटनांनी या गाण्याला विरोध केला. त्या सर्वांची एकच मागणी होती की ते चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाहीत. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मी खूप संघर्ष केला. मी त्या सर्व ३२ संघटनांना भेटलो. पुणे ते दिल्लीपर्यंत आंदोलने होत होती. महिला संघटना सर्वाधिक संतप्त झाल्या होत्या.”

घई यांनी पुढे सांगितलं की, त्यांनी सर्व संघटनांना एकच विनंती केली होती—आधी चित्रपट पाहा आणि मग निर्णय घ्या. मात्र, त्या काळात प्रत्येकाचं लक्ष केवळ ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याकडे होतं.

Ashwini Bhave USA Home: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी मराठी कलाकारांची खास भेट; घराजवळची बाग पाहून नीना कुलकर्णी भारावल्या

शिवसेनाही होती गाण्याच्या विरोधात

या वादाच्या काळात शिवसेनाही चित्रपटाच्या विरोधात असल्याचं सुभाष घई यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला.

“शिवसेनासुद्धा चित्रपटाच्या विरोधात होती. मग मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की माझा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कृपया तो एकदा बघा,” अशी आठवण घई यांनी सांगितली.

बाळासाहेब ठाकरे यांनी सुभाष घईंचा चित्रपट पाहिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रात चित्रपटाबद्दल लेख प्रसिद्ध झाला. या लेखातून चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं आणि ‘चोली के पीछे’ गाण्याबाबतही सकारात्मक भूमिका मांडण्यात आली.

घई यांच्या म्हणण्यानुसार, बाळासाहेबांनी त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फटकारलं आणि चित्रपटाविरोधातील वातावरण बदललं. त्यामुळे ‘खलनायक’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होण्यास मदत झाली.

सुभाष घई आजही गाण्याला अश्लील मानत नाहीत

‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर झालेल्या वादाबाबत सुभाष घई यांची भूमिका आजही स्पष्ट आहे. ते या गाण्याला अश्लील मानत नाहीत. त्यांच्या मते, हे एक लोकगीत आहे.

गाण्याच्या प्रदर्शनापूर्वी सेन्सॉर बोर्डकडून ते कापलं जाईल, अशी भीती त्यांना होती. मात्र, तसं झालं नाही. बिहारच्या काही भागांमध्ये अशाच स्वरूपाची लोकगीतं गायली जात असल्याचंही घई यांनी सांगितलं.

Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini: ‘गजनी’ म्हणत सोनम वांगचुकांचा आमिर खानला टोला; ‘3 इडियट्स’बाबत केला मोठा खुलासा

आज ‘चोली के पीछे क्या है’ हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानलं जातं. मात्र, या गाण्यामागे इतका मोठा विरोध आणि संघर्ष झाला होता, याचा खुलासा सुभाष घई यांनी अनेक वर्षांनंतर केला आहे.

Web Title: Choli ke peeche controversy subhash ghai balasaheb thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 01:56 AM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • Entertainemnt News
  • madhuri dixit

संबंधित बातम्या

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या
1

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या

Ashwini Bhave USA Home: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी मराठी कलाकारांची खास भेट; घराजवळची बाग पाहून नीना कुलकर्णी भारावल्या
2

Ashwini Bhave USA Home: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी मराठी कलाकारांची खास भेट; घराजवळची बाग पाहून नीना कुलकर्णी भारावल्या

KK Goswami: ‘विकराल और गबराल’चा गबरू आठवतोय? २३ वर्षांनी केके गोस्वामींची पुन्हा चर्चा; आता काय करतात? जाणून घ्या
3

KK Goswami: ‘विकराल और गबराल’चा गबरू आठवतोय? २३ वर्षांनी केके गोस्वामींची पुन्हा चर्चा; आता काय करतात? जाणून घ्या

Akshaya Gurav Divorce: ८ वर्षांचं नातं संपलं! ‘आई कुठे काय करते’ फेम अक्षया गुरवचा घटस्फोट; घटस्फोटावर पहिल्यांदाच केलं भाष्य
4

Akshaya Gurav Divorce: ८ वर्षांचं नातं संपलं! ‘आई कुठे काय करते’ फेम अक्षया गुरवचा घटस्फोट; घटस्फोटावर पहिल्यांदाच केलं भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.