अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘डेट भेट’ (Date Bhet) या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि अभिनेता संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘डेट भेट’ २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. सोनाली कुलकर्णी आणिहेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले आहे.
‘डेट भेट’ चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते यांचे आहे. पटकथा व संवाद लेखन अश्विनी शेंडे यांनी केले आहे. प्रदीप खानविलकर हे सिनेमॅटोग्राफर आहेत.‘डेट भेट’ची निर्मिती शिवांशु पांडे, हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेझ पटेल,प्रशांत जम्मूवाला,हनी शर्मा यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते अजय सोनी आणि प्रशांत शेळके हे आहेत. सिनेमाचे संगीत ‘व्हिडिओ पॅलेस’ या म्युझिक लेबल द्वारे प्रदर्शित होत आहे तर चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन फिल्मअस्त्र स्टुडिओज करत आहेत.