Switzerland : ग्रीनलँड आणि टॅरिफ मुद्यावरुन पेटला वाद; World Economic Forum मध्ये जागतिक नेत्यांचा ट्रम्पवर हल्लाबोल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या फोरममध्ये अमेरिकेवर जागतिक नेत्यांनी तीव्र टिका केली आहे. ग्रीनलँड आणि टॅरिफच्या मुद्यावरुन अमेरिकेला आंतरराष्ट्रीय टीकांचा सामना करावा लागत आहे. युरोपियन युनियन, नाटो सदस्य देश, आणि अनेक जागतिक नेत्यांनी अमेरिकेला जगाच्या कठघऱ्यात उभे केले आहे. ट्रम्पच्या ग्रीनलँडवरील नियंत्रणाला आणि टॅरिफच्या धोरणाला तीव्र विरोध या फोरममध्ये केला जात आहे.
ट्रम्प यांनी ग्रीनलँड (Greenland) अमेरिकेत सामील करुन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र याला डेन्मार्कसह अनेक युरोपीय देशांनी तीव्र विरोध केला आहे. यामुळे ट्रम्प यांनी त्यांना विरोध करणाऱ्या देशांवर टॅरिफ (Tarrif) लागू केले आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या नियंत्रणाखालील एक स्वायत्त देश असून त्यावर अमेरिकेचे नियंत्रण युरोपीय देशांना मान्य. यामुळे ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर १० टक्के टॅरिफ लादले असून हे २५% पर्यंत वाढवण्याची धमकी दिली आहे. यामुळे अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॅन डेरे यांनी देखील ट्रम्प यांच्या टॅरिफला तीव्र विरोध केला असून युरोपीय देशांच्या एकजुटीचा संदेश दिला आहे. तसेच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देखील नाटो आणि युरोपीय देशांची ग्रीनलँडच्या समर्थनार्थ एकत्र असल्याचे म्हटले आहे. तसेच कॅनडाने देखील ट्रम्प किंवा अमेरिकेचा प्रत्यक्षात उल्लेख न करता यामुळे जागितक व्यवस्था धोक्यात येत असल्याचे म्हटले आहे.
तसेच अनेक जागतिक तज्ज्ञांनी देखील ट्रम्पच्या टॅरिफ धोरणावर टीका केली आहे. तज्ज्ञांच्या मते, टॅरिफमुळे केवळ जागतिक अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होईल असे म्हटले आहे.
दरम्यान या परिषदेत भारतानेही उपस्थिती दर्शवली आहे. भारताने AI, तंत्रज्ञान आणि 5th इंडस्ट्रियल रिव्होल्शनूवर आपली भूमिका मांडली आहे. भारताने समावेळ, कमी खर्चिक आणि जास्त फायदा देणाऱ्या तंत्रज्ञानावर भर दिला आहे.जागतिक स्तरावर भारताला विश्वासक भागीदार म्हणून पाहिले जात आहे. भारताच्या वतीने या परिषदेचे नेतृत्व केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव करत आहेत. तसेच १०० हून अधिक वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रतिनिधी, कंपन्यांचे सीईओ देखील उपस्थिता आहेत.
स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांच्या Air Force One विमानात तांत्रिक बिघाड; अमेरिकेत खळबळ
Ans: ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला युरोपीय नेत्यांनी तीव्र विरोध केला असून डेन्मार्कच्या समर्थनार्थ एकता दर्शवली आहे.
Ans: भारताने AI, तंत्रज्ञान आणि 5th इंडस्ट्रियल रिव्होल्शनूवर World Economic Forum मध्ये आपली भूमिका मांडली आहे.
Ans: ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर १० टक्के टॅरिफ लागू केले आहे. परंतु ग्रीनलँडसोबत करार न झाल्यास ट्रम्प यांनी १ जून २०२६ पासून युरोपीय देशांवर २५ टक्के टॅरिफ शक्यता आहे.
Ans: तज्ज्ञांच्या मते, टॅरिफमुळे केवळ जागतिक अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होईल.
Ans: कॅनडाने अमेरिकेचे नाव न घेता यामुळे जागितक व्यवस्था धोक्यात येत असल्याचे म्हटले आहे.






