Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deepika Padukone: ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या मीनम्माचे ५ आयकॉनिक डायलॉग्स; दीपिका पदुकोणच्या या भूमिकेने जिंकली चाहत्यांची मनं

Deepika Padukone: ‘चेन्नई एक्सप्रेस’ला १३ वर्षे पूर्ण; दीपिका पदुकोणच्या मीनम्माचे ‘डोंट वरी, भागने में मेरा बहुत एक्सपीरियंस है’सह ५ आयकॉनिक डायलॉग्स पुन्हा चर्चेत.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 09, 2026 | 10:15 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Deepika Padukone: ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन १३ वर्षे पूर्ण झाली असली, तरी या चित्रपटातील दीपिका पदुकोणची मीनम्मा आजही प्रेक्षकांच्या आवडत्या पात्रांपैकी एक आहे. खास उच्चार, भन्नाट कॉमिक टायमिंग, भावनिक अभिनय आणि निरागस व्यक्तिमत्त्वामुळे मीनम्माने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली.

शाहरुख खानचा राहुल आणि दीपिकाची मीना ही जोडी बॉलिवूडमधील संस्मरणीय ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक मानली जाते. मात्र या जोडीसोबतच मीनम्माचे मजेशीर आणि भन्नाट डायलॉग्सही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिले. ‘चेन्नई एक्सप्रेस’ला १३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मीनम्माचे हे पाच आयकॉनिक डायलॉग्स पुन्हा आठवूया.

१. ‘हम लोग जहां से खड़ी होती, स्टेशन वहीं से शुरू होती।’

अमिताभ बच्चन यांच्या ‘कालिया’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगच्या धर्तीवर असलेला हा संवाद मीना राहुलला तिच्या गावात तिच्या वडिलांचा किती दबदबा आहे, हे सांगताना म्हणते. मीनम्माच्या आत्मविश्वासाची झलक दाखवणारा हा डायलॉग चित्रपटाची खास ओळख ठरला.

२. ‘डोंट वरी, भागने में मेरा बहुत एक्सपीरियंस है।’

लग्नातून पळून आलेली मीना राहुलला आत्मविश्वासाने धीर देताना हा संवाद म्हणते. तिचा बेधडक आणि जिंदादिल स्वभाव या एका वाक्यातूनच दिसून येतो. त्यामुळे हा डायलॉग चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय संवादांपैकी एक ठरला.

३. ‘थंगाबली किट्टा वराथे…’

याचा साधा अर्थ म्हणजे ‘थंगाबलीजवळ जाऊ नको.’ चित्रपटातील एका मजेशीर प्रसंगात मीनम्मा हा संवाद म्हणते. झोपेत बोलणारी मीना आणि त्यानंतर राहुलला बेडवरून खाली ढकलण्याचा प्रसंग आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे.

Aamir Khan: ‘चौथं लग्न कधी करणार?’, KBC 18मध्ये आमिर खानची एंट्री; प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चौथ्या लग्नाची चर्चा

४. ‘कहां से खरीदी ऐसी बकवास डिक्शनरी?’

राहुल आणि मीना यांच्यातील खट्याळ नोकझोक चित्रपटातील विनोदाची रंगत आणखी वाढवते. मीनम्माचा हा संवाद तिच्या आणि राहुलच्या भन्नाट केमिस्ट्रीचे उत्तम उदाहरण आहे. दोघांची सहजस्फूर्त कॉमेडी आणि संवादफेक यामुळे हा प्रसंग आजही चाहत्यांच्या आवडत्या क्षणांपैकी एक आहे.

५. ‘बिना अम्मा अप्पा के तुमने 50 साल निकाल दिए।’

मीनम्माच्या खास शैलीतला हा संवाद तिची निरागसता, विनोदबुद्धी आणि आपुलकी दाखवतो. तिच्या वेगळ्या बोलण्याच्या शैलीमुळे साधा संवादही प्रेक्षकांच्या लक्षात राहतो.

१३ वर्षांनंतरही मीनम्माची जादू कायम

‘चेन्नई एक्सप्रेस’ प्रदर्शित होऊन १३ वर्षे झाली असली, तरी मीनम्मा ही दीपिका पदुकोणच्या सर्वाधिक आयकॉनिक भूमिकांपैकी एक मानली जाते. तिची खास संवादफेक, अचूक कॉमिक टायमिंग आणि निरागस अभिनय यामुळे हे पात्र आजही तितकेच लोकप्रिय आहे.

राहुल-मीनाच्या भन्नाट केमिस्ट्रीमुळे आणि मीनम्माच्या मजेशीर डायलॉग्समुळे ‘चेन्नई एक्सप्रेस’ आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. विविध पिढ्यांतील प्रेक्षकांना आजही हा चित्रपट आणि त्यातील मीनम्मा तितकीच मनोरंजक वाटते.

Amey Wagh: TVFचा पहिला मराठी चित्रपट जाहीर; अमेय वाघसह ‘या’ कलाकारांची फौज, नावही भन्नाट!

Web Title: Deepika padukone chennai express meenamma 5 iconic dialogues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Deepika Padukone
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
1

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
2

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
3

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
4

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.