Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम आणि माणुसकीची गोष्ट सांगणारी ‘धाकट्या सुनबाई’ मालिका २८ सप्टेंबरपासून झी मराठीवर सुरू होणार आहे. चिन्मयी मोरे आणि मंदार जाधव प्रमुख भूमिकेत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 22, 2026 | 01:05 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Zee Marathi New Serial:  नाती, आपलेपणा, प्रेम आणि माणुसकी यांची सुंदर गोष्ट सांगणारी ‘धाकट्या सुनबाई’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन कुटुंबं, त्यांचे वेगवेगळे विचार आणि नात्यांमधील गुंतागुंत या मालिकेत पाहायला मिळणार आहे. २८ सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी ६:३० वाजता झी मराठीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.

राधिका आणि वेदांतची गोष्ट

आपल्या माणसांची साथ आणि नात्यांमधला विश्वास आयुष्याला कसा अर्थ देतो, हे राधिका आणि वेदांतच्या आयुष्यातून या मालिकेत उलगडणार आहे.

कृष्ण मंदिराच्या पायऱ्यांवर लहानपणी सापडलेली राधिका ही आप्पा आणि निर्मलाची दत्तक मुलगी म्हणून वाढली आहे. आप्पांनी तिला कृष्णाचा प्रसाद मानून आपल्या मुलीप्रमाणे वाढवलं. सालस, मनमिळाऊ आणि उत्साही स्वभावाची राधिका नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असते.

Jaywant Wadkar on Lalbaugcha Raja: ‘आम्ही कोळी लोक विसर्जन करायचो…’;जयवंत वाडकरांची नाराजी, म्हणाले,’बाप्पा श्राप देतायत..’

मात्र, घरातील गोदाक्का आजही तिला ‘परकी’ मानतात. त्यामुळे घरात प्रेम मिळत असूनही राधिकाच्या मनात आपल्या खर्‍या घराचा आणि आपल्या माणसांचा शोध कायम आहे. आपल्या मनातलं दुःख ती कृष्णाशी मनमोकळेपणाने बोलते आणि त्यालाच आपला सखा मानते.

वेदांत कुटुंबाच्या परंपरांना महत्त्व देणारा

दुसरीकडे पटवर्धन कुटुंबातील वेदांत आहे. ‘आराधना’ या पूजा साहित्य, अत्तर आणि अगरबत्तीच्या व्यवसायाचा तो वारसदार आहे. हुशार, सुसंस्कृत आणि जबाबदार असलेला वेदांत कुटुंबाच्या परंपरांना महत्त्व देतो.

आई दमयंतीच्या शिस्तीत आणि विचारांमध्ये वाढलेल्या वेदांतच्या आयुष्यात राधिकेची एंट्री झाल्यानंतर मात्र एक नवा प्रश्न उभा राहतो. माणसाची ओळख त्याच्या रक्ताने आणि कुळाने ठरते की त्याच्या मनाने? राधिकेमुळे वेदांतला स्वतःच्या विचारांकडे नव्या पद्धतीने पाहण्याचा प्रवास सुरू होतो.

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च

चिन्मयी मोरे आणि मंदार जाधव प्रमुख भूमिकेत

‘धाकट्या सुनबाई’ मालिकेत अभिनेत्री चिन्मयी मोरे राधिकाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता मंदार जाधव वेदांतच्या भूमिकेत दिसणार आहे. दोन्ही कुटुंबांच्या नात्यांमधून प्रेम, आपलेपणा, विश्वास आणि माणुसकीचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

नात्यांना आणि माणुसकीला केंद्रस्थानी ठेवणारी ‘धाकट्या सुनबाई’ ही मालिका २८ सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी ६:३० वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.

Web Title: Zee marathi new serial dhaktya sunbai chinamayi more mandar jadhav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Mahaveer Karna: सूर्यपुत्र कर्णाची गाथा मोठ्या पडद्यावर; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार कर्णाची भूमिका, फर्स्ट लूक चर्चेत
1

Mahaveer Karna: सूर्यपुत्र कर्णाची गाथा मोठ्या पडद्यावर; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार कर्णाची भूमिका, फर्स्ट लूक चर्चेत

Actress Radha: ४६ कोटींच्या चेकवरून अभिनेत्री राधाचा मोठा आरोप; बहीण अंबिका आणि भावाविरोधात पोलिसांत तक्रार
2

Actress Radha: ४६ कोटींच्या चेकवरून अभिनेत्री राधाचा मोठा आरोप; बहीण अंबिका आणि भावाविरोधात पोलिसांत तक्रार

Jaywant Wadkar on Lalbaugcha Raja: ‘आम्ही कोळी लोक विसर्जन करायचो…’;जयवंत वाडकरांची नाराजी, म्हणाले,’बाप्पा श्राप देतायत..’
3

Jaywant Wadkar on Lalbaugcha Raja: ‘आम्ही कोळी लोक विसर्जन करायचो…’;जयवंत वाडकरांची नाराजी, म्हणाले,’बाप्पा श्राप देतायत..’

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च
4

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.