Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत होणार क्रांतीपर्वाची सुरुवात! ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांची धमाकेदार Entry

मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत आता क्रांतीपर्वाची दमदार सुरुवात होणार आहे. या टप्प्यात डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले प्रभुलकर यांची दमदार एण्ट्री होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 15, 2026 | 05:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत आता क्रांतीपर्वाची दमदार सुरुवात होणार आहे. स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आता उलगडणार आहे. समाजातील जातीभेद, अन्याय आणि अंधश्रद्धा यांना छेद देत ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ हा विचार रुजवण्याचा संघर्ष या पुढील भागांत अधिक प्रभावीपणे दाखवला जाणार आहे.

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेच्या कुटुंबीयांनी ग्रामदेवतेला घातलं गाऱ्हाणं… लेक ठरली TOP 5 ची मानकरी!

या खास टप्प्यासाठी मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले प्रभुलकर यांची दमदार एण्ट्री होत आहे. मधुराणी गोखले प्रभुलकर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांनी या भूमिकेला मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. “आज आपण शिक्षण आणि स्वातंत्र्याचा जो लाभ घेतो, तो सावित्रीबाईंनी केलेल्या संघर्षामुळेच,” असे त्या म्हणाल्या. या भूमिकेबद्दल उत्सुकता, आनंद आणि दडपण अशा संमिश्र भावना असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.

तर डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी ही भूमिका साकारणे हे मोठे आव्हान असल्याचे सांगत, “‘कलाकार म्हणून माझं भाग्य आहे की वेगवेगळ्या लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं हे एक वेगळं आव्हान आहे. विचारांची धगधगती मशाल म्हणजे महात्मा जोतीराव फुले. व्यवस्थेला प्रश्न विचारायची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. अश्या क्रांतीकाराचे विचार पोहोचवणं ही मोठी जबाबदारी आहे,” असे मत व्यक्त केले.

या पुढील भागांमध्ये केवळ कथा पुढे जाणार नाही, तर एक सामाजिक क्रांती कशी आकाराला आली, याचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. स्त्रिया आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई आणि जोतीराव यांनी केलेला संघर्ष, त्यांना आलेला विरोध आणि त्यांनी दाखवलेले धैर्य याचे प्रभावी चित्रण पाहायला मिळणार आहे.

Bhushan Pradhan New Movie : अभिनेत्याने केले April Fool! वाटली लग्नाची तारीख, निघाली Release Date

प्रेक्षकांसाठी ही मालिका केवळ मनोरंजन न राहता प्रेरणादायी ठरणार असून, ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका दररोज सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होत आहे.

Web Title: Dr amol kolhe and madhurani gokhale prabhulkar to make their entry in the series mi savitribai jotirao phule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • marathi serial update
  • Savitribai Phule Pune University

संबंधित बातम्या

Savitribai Phule Pune University: पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात तरुणांचा राडा; चतुःशृंगी पोलिसांकडून नोटीस जारी
1

Savitribai Phule Pune University: पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात तरुणांचा राडा; चतुःशृंगी पोलिसांकडून नोटीस जारी

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित
2

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.