फोटो सौजन्य - Social Media
काय होती ‘ती’ पोस्ट?
भूषण प्रधानने दोन दिवसांअगोदर पोस्टद्वारे एक तारीख जाहीर केली होती. पोस्टमध्ये भूषणचं Couple Photo होतं, तसेच त्याखाली 24.7.2026 अशी तारीख नमूद होती. इतकेच नव्हे तर कॅप्शनमध्येही सारखीच तारीख नमूद होती. त्यामुळे पोस्ट पाहून चाहत्यांना वाटले की भूषण प्रधान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे ते ही 24.7.2026 या तारखेला! ही बातमी माध्यमांमध्येही पसरली. चाहत्यांनी भूषणला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. पण ही निव्वळ एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी होती, हे तेव्हा कळालं जेव्हा भूषणने त्याच्या आगामी सिनेमाचा Poster प्रदर्शित केला.
त्या पोस्टनंतर दोन दिवसांनी भूषणने ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमाचा Poster प्रदर्शित केला. सिनेमाच्या पोस्टरमध्ये अभिनेत्री सायली पाटील दिसून येत आहे. त्याचबरोबर दोन दिवसांअगोदर भूषणने जी तारीख जाहीर केली होती ती मुळात या सिनेमाची Release Date होती. अभिनेता भूषणचा आगामी सिनेमा ‘स्वप्नसुंदरी’ 24.7.2026 या तारखेला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
सिनेमाचे दिग्दर्शन अक्षय जयसिंगराव शिंदेने केले आहे तर सिनेमाचे लेखन अक्षय जयसिंगराव शिंदेने केले आहे. सिनेमाची निर्मिती सतीश गेजगे यांनी केली आहे.






