(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Elakshi Gupta: ‘तान्हाजी’ या गाजलेल्या चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री इलाक्षी गुप्ता हिच्या आयुष्यात आनंदाचं नवं पर्व सुरू झालं आहे. इलाक्षीने एका मुलाला जन्म दिला असून, आई झाल्याची आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या या गुड न्यूजमुळे चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वीच इलाक्षीच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते. आता बाळाच्या जन्मानंतर तिने हॉस्पिटलमधील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आपल्या चिमुकल्या बाळाचं आयुष्यात स्वागत करतानाचा तिचा आनंद पाहायला मिळत आहे.
इलाक्षीने या खास पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद’ असा उल्लेख केला आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या या नव्या पाहुण्याचं तिने प्रेमाने स्वागत केलं आहे. पोस्ट समोर येताच चाहत्यांनी आणि जवळच्या व्यक्तींनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
इलाक्षी गुप्ताने ‘तान्हाजी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांची भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयातून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली.
View this post on Instagram
चित्रपटानंतर इलाक्षीने आता छोट्या पडद्यावरही पाऊल ठेवलं आहे. तिने झी टीव्हीच्या ‘हमारा परिवार’ या शोमधून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं आहे. हा शो तिच्या कारकिर्दीतील एक वेगळा टप्पा मानला जात आहे.
‘हमारा परिवार’ हा कौटुंबिक आणि संवादात्मक स्वरूपाचा शो असून, त्याची संकल्पना काहीशी वेगळी आहे. या माध्यमातून इलाक्षी केवळ कलाकारांशीच नव्हे, तर त्यांच्या चाहत्यांशीही संवाद साधताना दिसणार आहे.
दरम्यान, अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या इलाक्षीच्या आयुष्यात आता मातृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. तिच्या या खास प्रवासासाठी चाहतेही सोशल मीडियाच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा देत आहेत.






