राज्यभर ‘चला शाळेत जाऊ’ अभियान, प्रत्येक जिल्ह्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘शिक्षण पालक’ म्हणून नियुक्ती
Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस
या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘शिक्षण पालक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शाळांना भेटी देऊन समस्या जाणून घेतील. पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, शिक्षण विभागाने प्रशासकीय कामकाजाबरोबरच विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि ग्रामस्थ यांच्याशी थेट संवाद साधला पाहिजे. राज्यातील आठही विभागामध्ये वरिष्ठ अधिका-याची जिल्हानिहाय जबाबदारी निश्वित करून प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा घेण्यात येणार आहे. हे अधिकारी चार दिवसांच्या विशेष दौन्यात शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे मूल्यांकन करतील. ज्या शाळांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील त्या शाळांना विविध माध्यमांतून प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी विद्यार्थी संघाची घेणार मदत : दादा भुसे
प्रत्येक शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन करण्यात आला आहे. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे ज्ञान, अनुभव आणि योगदान यांचा उपयोग करून घेण्यावरही भर दिला जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने हे अभियान राबविले जात असल्याचेही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, “शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वछतागृहे, सुरक्षित इमारती आणि स्वच्छ परिसर यांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे. काही कामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असली तरी अनेक सुधारणा लोकसहभागातून आणि स्थानिक पातळीवरील पुढाकारातून तातडीने करता येऊ शकतात. शाळांची रंगरंगोटी, स्वच्छता आणि परिसर सुशोभीकरणासाठी समाजाचा सहभाग घ्यावा”.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






