Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fauzi Release Date: ‘अज्ञातपर्व’ संपले! प्रभासच्या ‘फौजी’च्या रिलीज डेटची घोषणा, बॉक्स ऑफिसवर चार बड्या स्टार्समध्ये होणार टक्कर

प्रभासच्या बहुप्रतिक्षित 'फौजी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली असून पोस्टरमध्ये प्रभास रक्ताने माखलेल्या अवस्थेत, हातात बंदूक घेऊन दिसत असून त्याचा रौद्र अवतार चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 16, 2026 | 02:28 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

पॅन-इंडिया सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षित ‘फौजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. मैत्री मुव्ही मेकर्सने नव्या दमदार पोस्टरसह चित्रपट ३ डिसेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. पोस्टरमध्ये प्रभास रणांगणावर रक्ताने माखलेल्या अवस्थेत, हातात बंदूक घेऊन दिसत असून त्याचा रौद्र अवतार चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

निर्मात्यांनी पोस्टर शेअर करताना “अज्ञाताचा अंत… बंडाची सुरुवात” असे कॅप्शन देत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. पोस्टरमध्ये प्रभास मृतदेहांनी भरलेल्या रणांगणात एका खडकावर बसलेला दिसतो. हनु राघवपुडी दिग्दर्शित या पीरियड अॅक्शन ड्रामाची ही झलक सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

पोस्टरवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी प्रभासच्या दमदार लूकचे कौतुक केले, तर काहींनी पोस्टरची तुलना संदीप रेड्डी वांगा यांच्या चित्रपटांच्या शैलीशी केली. मात्र, काही नेटकऱ्यांनी पोस्टरची गुणवत्ता कमी असल्याचे म्हणत ते एआय-निर्मित (AI-generated) असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.


Bhootam Bhayyam Movie: ‘भूतम भयम्’ मधील भूमिकेसाठी करण सोनावणेने गिरवले मालवणीचे धडे; प्रेक्षकांना दिसणार नवा अंदाज

यापूर्वी प्रभासच्या वाढदिवसानिमित्त ‘फौजी’चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी निर्मात्यांनी हा चित्रपट भारतीय इतिहासातील एका अज्ञात पण शूर सैनिकाची कथा असल्याचे सांगितले होते. १९४५ च्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात प्रभास ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक हनु राघवपुडी यांनीही ही कथा खास प्रभासला डोळ्यासमोर ठेवून लिहिल्याचे यापूर्वी स्पष्ट केले होते.

दरम्यान, ‘फौजी’च्या प्रदर्शनामुळे डिसेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठा संघर्ष रंगणार आहे. ३ डिसेंबरला प्रभासचा ‘फौजी’ प्रदर्शित होत असून, त्यानंतर ४ डिसेंबरला आलिया भट्टचा ‘चामुंडा’, अजय देवगणचा ‘रेंजर’ आणि अक्षय कुमार-विद्या बालन यांचा अद्याप नाव जाहीर न झालेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस बॉक्स ऑफिसवर मोठ्या स्टार्समध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

‘सीता के पति…’; जंतर-मंतरवरील कुणाल कामराच्या वक्तव्यावरून नवा वाद, अभिजित दीपकेवरही नेटकऱ्यांचा निशाणा

Web Title: Fauji release date prabhas intense look from fauji unveiled release date announced with new poster set for a mega box office clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Actor Prabhas
  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

‘फुलों का तारों का’ रक्षाबंधनासाठी लिहिलंच नव्हतं; ५५ वर्षांपूर्वी लता मंगेशकरांनी जे केलं, ते पाहून पंचम दाही झाले होते थक्क
1

‘फुलों का तारों का’ रक्षाबंधनासाठी लिहिलंच नव्हतं; ५५ वर्षांपूर्वी लता मंगेशकरांनी जे केलं, ते पाहून पंचम दाही झाले होते थक्क

The Paradise: नानीच्या ‘द पैराडाइज’च्या दुसऱ्या सिंगलचा डॅलसमध्ये ग्रँड लॉन्च; अनिरुद्धच्या कॉन्सर्टमध्ये होणार धमाका!
2

The Paradise: नानीच्या ‘द पैराडाइज’च्या दुसऱ्या सिंगलचा डॅलसमध्ये ग्रँड लॉन्च; अनिरुद्धच्या कॉन्सर्टमध्ये होणार धमाका!

Mirzapur The Movie:‘मिर्झापूर: द मूव्ही’ रिलीजपूर्वी अली फजल-दिव्येंदुंची खास दावत; पारंपरिक लूकमध्ये जमणार ‘मिर्झापूर’ची गँग!
3

Mirzapur The Movie:‘मिर्झापूर: द मूव्ही’ रिलीजपूर्वी अली फजल-दिव्येंदुंची खास दावत; पारंपरिक लूकमध्ये जमणार ‘मिर्झापूर’ची गँग!

Kangana Ranaut: कंगनाची ९ वर्षांपूर्वीची रक्षाबंधन अॅड पुन्हा चर्चेत; कुनिका सदानंदने साधला निशाणा, नेटकरी म्हणाले- ‘गजब पाखंड.’
4

Kangana Ranaut: कंगनाची ९ वर्षांपूर्वीची रक्षाबंधन अॅड पुन्हा चर्चेत; कुनिका सदानंदने साधला निशाणा, नेटकरी म्हणाले- ‘गजब पाखंड.’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.