Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार

Genelia D'Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरातीची संधी मिळाली होती. मात्र या एका महत्त्वाच्या कारणामुळे जेनेलियाने सुरुवातीला ही ऑफर नाकारली होती.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 05, 2026 | 08:58 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Genelia D’Souza Birthday: बॉलिवूडची गोड आणि चुलबुली अभिनेत्री जेनेलिया डिसूझा ( देशमुख) आज (५ ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू आणि इतर भाषांतील चित्रपटांत अभिनयाची छाप सोडणाऱ्या जेनेलियाच्या करिअरची सुरुवातही तितकीच रंजक होती. अवघ्या १५व्या वर्षी तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली होती, मात्र परीक्षेमुळे तिने सुरुवातीला ती ऑफर नाकारली होती.

लग्नात मिळाली पहिली मोठी संधी

जेनेलिया एका लग्नसमारंभात ब्राइड्समेड म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी एका जाहिरात निर्मात्याची तिच्यावर नजर पडली आणि तिला पार्कर पेनच्या जाहिरातीसाठी निवडण्यात आले. विशेष म्हणजे या जाहिरातीत तिच्यासोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन झळकणार होते.

परीक्षेमुळे सुरुवातीला दिला नकार

जाहिरातीच्या शूटिंगच्या अवघ्या दोन दिवसांनी जेनेलियाची परीक्षा होती. त्यामुळे तिने सुरुवातीला ही ऑफर नाकारली. मात्र, दिग्दर्शकाने समजावून सांगितल्यानंतर ती जाहिरात करण्यास तयार झाली. ही जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर जेनेलियाला मोठी लोकप्रियता मिळाली. अमिताभ बच्चन यांनीही तिच्या सहज अभिनयाचे आणि नैसर्गिक हावभावांचे कौतुक केले होते.

अभिनेत्री होण्याची नव्हती इच्छा

जेनेलियाला सुरुवातीला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे नव्हते. तिचा कल शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राकडे होता. ती राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू आणि राज्यस्तरीय अॅथलीट राहिली आहे. पुढे ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाची ऑफर मिळाल्यानंतरही तिने सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, चित्रपटाच्या तेलुगू आवृत्तीबद्दल माहिती मिळाल्यानंतर तिने होकार दिला.

‘तुझे मेरी कसम’मधून झाली करिअरची सुरुवात

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून जेनेलिया आणि रितेश देशमुख या दोघांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटादरम्यान दोघांची मैत्री झाली, पुढे ती प्रेमात बदलली आणि जवळपास नऊ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांनी विवाह केला.

South Theatre Release: एक-दोन नाही… तब्बल 11 दाक्षिणात्य चित्रपट एकाच आठवड्यात! बॉक्स ऑफिसवर कोण मारणार बाजी?

अनेक गाजलेल्या चित्रपटांत केला अभिनय

‘मस्ती’, ‘मेरे बाप पहले आप’, ‘जाने तू… या जाने ना’, ‘लाइफ पार्टनर’, ‘चान्स पे डान्स’ आणि ‘फोर्स’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये जेनेलियाने दमदार भूमिका साकारल्या. याशिवाय तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतही तिने मोठे यश मिळवले. आज ती रितेश देशमुख आणि दोन्ही मुलांसोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत असून, चाहत्यांमध्ये तिची लोकप्रियता कायम आहे.

Entertainment News: छोट्या कथांपासून मोठ्या पडद्यावरील युद्धापर्यंत… एका वेगळ्या विचारांच्या फिल्ममेकरची अनोखी सफर

Web Title: Genelia dsouza birthday why she rejected amitabh bachchan offer at 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Birthday
  • genelia deshmukh
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Genelia Deshmukh Ganeshotsav: सासू-सुनेचं गोड बॉण्डिंग, खास फोटोशूट; जिनिलीयाने दाखवली देशमुखांच्या गणेशोत्सवाची खास झलक
1

Genelia Deshmukh Ganeshotsav: सासू-सुनेचं गोड बॉण्डिंग, खास फोटोशूट; जिनिलीयाने दाखवली देशमुखांच्या गणेशोत्सवाची खास झलक

Ajay Atul Family Photo: अजय-अतुलच्या कुटुंबाला पाहिलंत का? अतुल गोगावलेंचा वाढदिवस थाटात साजरा, फोटो व्हायरल
2

Ajay Atul Family Photo: अजय-अतुलच्या कुटुंबाला पाहिलंत का? अतुल गोगावलेंचा वाढदिवस थाटात साजरा, फोटो व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.