Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govinda: फॅमिली फोटोत गोविंदा का नाही? कृष्णा अभिषेकसोबत सुनीता आहुजांनी साजरी केली राखी, ‘तो’ फोटो व्हायरल

Govinda-Krishna Abhishek: रक्षाबंधनानिमित्त टीना आहुजाने शेअर केलेल्या फॅमिली फोटोत कृष्णा अभिषेक, सुनीता आहुजा आणि आरती सिंग दिसले; मात्र गोविंदा गायब असल्याने फोटो चर्चेत आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 01, 2026 | 08:45 AM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • फॅमिली फोटोतून गोविंदा गायब
  • कृष्णा अभिषेकने सुनीता आहुजांसोबत साजरी केली राखी
  • कृष्णा-सुनीता यांच्यातील नात्यात सुधारणा?
Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील कौटुंबिक वाद गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. दोघांमधील मतभेद अनेकदा सार्वजनिकरित्या समोर आले आहेत. अशातच रक्षाबंधनानिमित्त शेअर करण्यात आलेला एक फॅमिली फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये गोविंदाची मुलगी टीना आहुजा, तिचा भाऊ यशवर्धन आहुजा, कृष्णा अभिषेक, आरती सिंग आणि सुनीता आहुजा दिसत आहेत. मात्र, या फॅमिली सेलिब्रेशनमधून गोविंदा मात्र गायब असल्याचं पाहायला मिळत आहे.

टीनाने रक्षाबंधनाच्या निमित्ताने कुटुंबीयांसोबत वेळ घालवतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या खास क्षणांमध्ये कुटुंबातील सदस्य कॅमेऱ्यासमोर हसताना आणि मजामस्ती करताना दिसत आहेत. टीनाने तिचा भाऊ यशवर्धनला राखी बांधली, तर कृष्णा अभिषेकलाही राखी बांधतानाचा फोटो तिने शेअर केला आहे.

 

टीनाची पोस्ट चर्चेत

टीनाने हे फोटो शेअर करताना, “आमची राखी! #latergram #rakhi” असं कॅप्शन दिलं आहे. पोस्टमध्ये सुनीता आहुजा, टीना, यशवर्धन, कृष्णा अभिषेक आणि आरती सिंग यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. एका व्हिडीओमध्ये सर्वजण कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसतात. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये टीना आणि आरती यशवर्धनला राखी बांधताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे, या सेलिब्रेशनमध्ये कृष्णा अभिषेकही सहभागी झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील अनेक वर्षांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

फॅमिली फोटोत गोविंदा का नाही?

रक्षाबंधनाच्या या फॅमिली फोटोंमध्ये गोविंदा कुठेही दिसत नसल्याने सोशल मीडिया यूजर्समध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील वादामुळे दोघे अनेकदा एकमेकांपासून दूर असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे टीनाच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा त्यांच्या कौटुंबिक नात्यांची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही गेल्या काही काळापासून विविध चर्चा सुरू आहेत. सुनीता आहुजाने गोविंदासोबतच्या नात्याबाबत सार्वजनिकरित्या भाष्य केल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आलं.

Entertainment News: तीस वर्षांचा प्रवास आणि तीन नवे आवाज – पंचम निषादचा ‘वर्तमान’ पुन्हा रंगमंचावर

गोविंदा आपल्या आगामी चित्रपटातील सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरसोबत विमानतळावर दिसल्यानंतरही सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांदरम्यान रक्षाबंधनाच्या निमित्ताने समोर आलेल्या या फॅमिली फोटोने पुन्हा एकदा गोविंदा-कृष्णा अभिषेक यांच्या कौटुंबिक नात्यांकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

Web Title: Govinda missing krushna abhishek sunita ahuja raksha bandhan family photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Govinda
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.