Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी माझं वास्तव…, वर्षभरानंतर सोशल मीडियावर परतलेल्या तापसी पन्नूने व्यक्त केला संताप,म्हणाली…

सोशल मीडियापासून एक वर्ष दूर राहिल्यानंतर, तापसी पन्नू अखेर डिजिटल विश्वात परतली असून तिने संताप व्यक्त केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 07, 2026 | 09:48 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियापासून एक वर्ष दूर राहिल्यानंतर, तापसी पन्नू अखेर डिजिटल विश्वात परतली आहे. परतल्यानंतर, तिने आपल्या चाहत्यांना विचारले की त्यांना तिच्या अकाऊंटवर कोणत्या प्रकारचा कंटेंट पाहायला आवडेल.

तापसी पन्नूने सोशल मीडियापासून स्वतःला दूर का ठेवले?

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत तापसी पन्नूने स्पष्ट केले की, आजकाल सेलिब्रिटींवर सतत ऑनलाइन सक्रिय राहण्याचा खूप दबाव असतो. या सततच्या दबावाला कंटाळून, तिने पडद्यापासून दूर आपले खरे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. तिच्या या वक्तव्यामुळे इंडस्ट्रीमध्ये एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

तापसीने स्पष्ट केले की, तिने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा फार मोठा गाजावाजा केला नाही, तर हा निर्णय तिने स्वतःच्या मनःशांतीसाठी घेतला. ती म्हणाली, “मी सोशल मीडियापासून दूर राहण्याची मी कधी घोषणा केली नव्हती. हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक होता, त्याचा माझ्या कामाशी काहीही संबंध नव्हता. या डिटॉक्समागे अनेक कारणे होती. एखादा ट्रेंड सुरू करण्यासाठी किंवा त्यात सामील होण्यासाठी आपण नेहमीच शर्यतीत आहोत असे वाटायचे. ते खूप थकवणारे होते. मला माझे आयुष्य जगायचे होते, सतत सोशल मीडिया तपासायचे नव्हते.” यासाठी, तिने तिच्या फोनमधून सोशल मीडिया ॲप्स डिलीट केले.

खऱ्या आयुष्याचा आनंद
या ब्रेकदरम्यान, जेव्हा तापसी दर तीन-चार दिवसांनी एकदाच सोशल मीडिया तपासू लागली, तेव्हा ती तिच्या फोनच्या बाहेरच्या खऱ्या आयुष्याचा आनंद घेऊ लागली. ती म्हणाली, “मी खऱ्या आयुष्याचा आनंद घेऊ लागले आणि मला त्याचे व्यसनच लागले. कलाकारांनाही स्वतःला जास्त लोकांसमोर न आणण्यास सांगितले जाते. नाहीतर, लोक तुम्हाला पाहण्यासाठी थिएटरमध्ये का येतील? हा तर्क मला योग्य वाटला.”

तापसी पन्नूने स्पष्ट केले की, जेव्हा तिने सोशल मीडियावर पोस्ट करणे कमी केले, तेव्हा तिचे मित्र आणि चाहते काळजीत पडले. लोक तिला ‘सगळं ठीक आहे ना?’, ‘तू कुठे गायब झाली आहेस?’ असे अनेक प्रश्न विचारू लागले. चाहत्यांनी विचारले, ‘तुझी फीड चित्रपटांच्या पोस्टर्स आणि ब्रँडच्या जाहिरातींनी भरलेली आहे. तू तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट का करत नाहीस?’

तापसी पन्नू काय म्हणाली?

तापसी म्हणते, “कमी सक्रिय राहण्याची मला किंमत मोजावी लागली. मला सांगण्यात आले की ब्रँड्सना असे सेलिब्रिटी हवे असतात जे सतत लोकांच्या नजरेत असतात. मला हेही सांगण्यात आले की, तू जास्त पोस्ट करत नसल्यामुळे, हा ब्रँड तुझ्याशी संबंध ठेवणार नाही. तो ब्रँड अशा व्यक्तीला प्राधान्य देतो जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ब्रँड्स हे कलाकारांसाठी उत्पन्नाचे साधनही असतात आणि त्या ब्रँड्सना प्रसिद्धीची गरज असते. आमचे सोशल मीडिया त्यांचे मार्केटिंगचे साधन बनते.”

माझ्यात स्वतःची ओळख तरी काय उरली आहे?

या व्यावसायिक मानसिकतेवर तीव्र आक्षेप व्यक्त करत, तापसीने प्रश्न विचारला की, मार्केटिंगसाठी कलाकारांनी स्वतःमध्ये बदल करायला हवा का? ती म्हणाली, “जर एखादा ब्रँड माझ्याशी संपर्क साधतो, तर ते माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे माझी निवड करतात. जर मला त्यांच्यामुळे दुसऱ्या कोणाची तरी भूमिका करावी लागत असेल, तर माझ्या स्वतःच्या अस्तित्वाला काय अर्थ उरतो? सोशल मीडिया मनोरंजन विश्वाचा एक भाग असेल, पण स्वतःची अस्सलता गमावून त्याचा स्वीकार करता कामा नये.”

पेड्डी’च्या शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं? जान्हवी कपूर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण, खासगी चॅट व्हायरल
तापसी पन्नू सध्या तिचा पती, मॅथियास बो, आणि कुटुंबासोबत डेन्मार्कमध्ये फावल्या वेळेचा आनंद घेत आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली, “उन्हाळ्यात चित्रपटांचे चित्रीकरण थोडे कमी असते, त्यामुळे मी माझे सर्व काम पूर्ण करून इथे आले आहे. मी इथे एका सामान्य व्यक्तीसारखे जगत आहे. मी स्वतः स्वयंपाक करते, बागकाम करते, व्यायाम करते आणि पाव विकत घेण्यासाठी बाजारात सायकलनेसुद्धा जाते.”

Jay Jay Swami Samarth : स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून गंगा येणार, गोवर्धनला मिळणार कर्मांची शिक्षा!

तापसी लवकरच ”वो लड़की कहां है?’ या चित्रपटात दिसणार आहे. मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी, प्रतीक बब्बर आणि हरलीन सेठी सारखे कलाकार देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक अर्शद सय्यद आहेत. याशिवाय अभिनेत्रीकडे ‘गांधारी’ हा चित्रपटही आहे.

Web Title: I cant change my reality taapsee pannu expresses her frustration after returning to social media a year later

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Social Media
  • Taapsee Pannu

संबंधित बातम्या

Manisha Koirala: ‘माझा मृत्यू जवळ आला…’; कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये सोसला एकटेपणा, अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ
1

Manisha Koirala: ‘माझा मृत्यू जवळ आला…’; कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये सोसला एकटेपणा, अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज
2

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज

Nepal Flood: ‘लोक ३०० किमीपर्यंत वाहून गेले..’, नेपाळच्या महापुरातून बचावली अभिनेत्री, सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
3

Nepal Flood: ‘लोक ३०० किमीपर्यंत वाहून गेले..’, नेपाळच्या महापुरातून बचावली अभिनेत्री, सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Social Media Time Limit: आता फक्त 2 तासच Facebook आणि Instagram वापरता येणार, Meta चा नवीन नियम आहे तरी काय?
4

Social Media Time Limit: आता फक्त 2 तासच Facebook आणि Instagram वापरता येणार, Meta चा नवीन नियम आहे तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.