Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा

एथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे इंजिन खराब होत असल्याच्या तक्रारी आणि सोशल मीडियावरील वादावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्यांना एथेनॉल विरहित १००% शुद्ध पेट्रोल हवे आहे, त्यांना प्रति लीटर तब्बल १६८ रुपये मोजावे लागतील, असे गडकरींनी स्पष्ट केले

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 18, 2026 | 12:18 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका
  • 100% शुद्ध पेट्रोल हवंय?मोजा 168 रुपये लीटर
  • गडकरींकडून खुलासा
Pure Petrol Rate: सध्या देशभरात E20 पेट्रोल वरुन चांगलाच वाद पेटला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या इथेनॉलमय घोषणेनंतर देशभरात आक्रमक वातावरण निर्माण झालं आहे. गाड्यांवर या E20 चा परिणाम होत असल्याच्या विविध तक्रारी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासगळ्यामुळे तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासगळ्यात नितीन गडकरी यांनी इथेनॉल-मिश्रित पेट्रोल, म्हणजेच ई२० बाबत सुरू असलेल्या वादावर भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, कोणत्याही एका प्रकारच्या इंधनाला प्रोत्साहन देणे हे त्यांचे ध्येय नाही. तर भारताला जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, प्रदूषण कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे या मागचं उद्देश्य आहे. नुकत्याच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी शुद्ध पेट्रोलच्या भविष्यातील किमतीवरही मोठं विधान केलं. शुद्ध पेट्रोल स्वतंत्रपणे उपलब्ध झाल्यास त्याची किंमत किती असू शकते आणि इथेनॉल-मिश्रित इंधन किती स्वस्त असेल, हे त्यांनी स्पष्ट केले.

HPCL चा मोठा मान! भारतातील टॉप 20 सर्वात मूल्यवान ब्रँड्समध्ये समावेश; सलग दुसऱ्या वर्षी बाजी

शुद्ध पेट्रोलची किंमत किती असेल?

मुलाखतीत गडकरी यांनी सध्याच्या पेट्रोलच्या किंमती आणि भविष्यात या किंमतींमध्ये होणारी वाढ याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. “भविष्यात ग्राहकांना वेगवेगळे पर्याय दिल्यास १००% पेट्रोलची किंमत प्रति लिटर सुमारे १६८ रुपयांपर्यंत पोहोचू शकते, तर इथेनॉल-मिश्रित पेट्रोलची किंमत खूपच कमी असेल. सरकार अंदाजे ५४ ते ६६ रुपये प्रति लिटर दराने इथेनॉल खरेदी करत आहे.”

इथेनॉलवर चालणारी वाहने तयार आहेत का?

गडकरींच्या मते, अनेक वाहन कंपन्यांनी फ्लेक्स-फ्यूएल इंजिन विकसित केले आहेत. ही वाहने १००% पेट्रोल, १००% इथेनॉल किंवा दोन्हीवर चालू शकतात. त्यांनी दावा केला की,Toyota, Maruti Suzuki, Tata Motors, Mahindra आणि Hyundai यांसारख्या अनेक कंपन्यांनी या तंत्रज्ञानावर आधीच काम केलं आहे. Bajaj, TVS, Hero आणि Honda यांनीही फ्लेक्स-फ्यूएल दुचाकी विकसित केल्या आहेत.

E20 मुळे इंजिनचे नुकसान होतंय का?

ई२० पेट्रोलमुळे इंजिनचे नुकसान होत असल्याच्या सोशल मीडियावरील दाव्यांबाबत गडकरी यांनी सांगितले की, ई२० पेट्रोलमुळे इंजिनचे नुकसान होत आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकार किंवा वाहन उत्पादकांकडे कोणताही ठोस डेटा नाही. त्यांनी पुढे सांगितले की, भारतात ई२० लागू करण्यापूर्वी अनेक वर्षे चाचण्या घेण्यात आल्या होत्या आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या आधारे त्याला मान्यता देण्यात आली होती.

शेतकऱ्यांना कसा फायदा होईल?

मुलाखतीत गडकरी यांनी सांगितले की, इथेनॉल धोरणामुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. त्यांच्या मते, मक्याचा भाव १,२०० रुपये प्रति क्विंटलवरून २,६०० ते २,८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढला आहे. यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना अंदाजे ४५,००० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. साखर कारखान्यांची शेतकऱ्यांकडील थकबाकीही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

प्रदूषण कमी करण्यावर भर

गडकरी यांनी सांगितले की, भारत दरवर्षी पेट्रोलियम आयातीवर लाखो कोटी रुपये खर्च करतो. जर देशाने जैवइंधन आणि इतर इंधनांकडे वेगाने संक्रमण केले, तर आयातीवरील खर्च कमी होईल, परकीय चलन वाचेल आणि प्रदूषणही कमी होईल. २०७० पर्यंत कार्बन न्यूट्रल बनण्याचे भारताचे ध्येय आहे आणि या ध्येयासाठी इथेनॉलसारखी इतर इंधने आवश्यक आहेत.

इथेनॉल वादावर गडकरींचं म्हणणं काय?

सोशल मीडियावर इथेनॉलविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांसंदर्भात गडकरी म्हणाले की, काही लोकांकडे संपूर्ण माहितीचा अभाव आहे, तर काही जण अफवा पसरवत आहेत. ते पुढे म्हणाले की, सरकारने ई२० लागू करण्यापूर्वी वाहन कंपन्या, संशोधन संस्था आणि तांत्रिक संस्थांसोबत सखोल चौकशी केली होती, त्यामुळे लोकांनी अफवांऐवजी सत्यावर विश्वास ठेवावा.

बाप रे! ‘ही’ पँट घातली की सरळ हॉस्पिटल गाठावं लागेल? Zara च्या नव्या ट्राउझरमुळे कित्येकांचे तुटले पाय; नक्की मॅटर काय?

Web Title: Those opposing e20 fuel want 100 pure petrol 168 per litre gadkari clarifies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Business News
  • Diesel Petrol Price
  • E20 Fuel
  • E20 Petrol
  • farmer
  • Marathi News
  • Nitin Gadkari
  • pollution
  • Social Media
  • viral video

संबंधित बातम्या

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”
1

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!
2

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!

Lonavala Tourism News :  वीकेंडलाही लोणावळा ओस! पावसाच्या दांडीमुळे भुशी डॅम, धबधबे कोरडे
3

Lonavala Tourism News : वीकेंडलाही लोणावळा ओस! पावसाच्या दांडीमुळे भुशी डॅम, धबधबे कोरडे

Chandrapur News: घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम
4

Chandrapur News: घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.