Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalpana Iyer: ‘रम्बा हो’ गर्लचा इंडस्ट्रीवर संताप; वयाच्या सत्तरीतही कल्पना अय्यर मागतायत काम, नक्की काय घडलं?

Kalpana Iyer: ‘रम्बा हो’ गर्ल कल्पना अय्यर यांनी वयाच्या ७०व्या वर्षीही काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंडस्ट्रीतील वागणुकीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी ‘सभ्यता आणि आदराची अपेक्षा’ असल्याचं म्हटलं.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 03, 2026 | 10:35 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kalpana Iyer: ‘रम्बा हो’ या आयकॉनिक गाण्यामुळे घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री कल्पना अय्यर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ‘धुरंधर’मधील ‘रम्बा हो’ या गाण्यावर डान्स केल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. एका मित्राच्या लग्नात त्यांनी या गाण्यावर भन्नाट डान्स केला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

या व्हिडीओनंतर कल्पना अय्यर अनेक पॉडकास्टमध्येही दिसल्या. वयाच्या ७०व्या वर्षीही अभिनय करण्याची त्यांची इच्छा असल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच, चित्रपट निर्मात्यांनी आपल्यासाठी भूमिकांचा विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली होती. आता त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे.

‘किमान मला सांगण्याची तरी सभ्यता दाखवा’

कल्पना अय्यर यांनी इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इंडस्ट्रीतील काही अनुभवांबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘किमान मला सांगण्याची तरी सभ्यता दाखवा’, असं म्हणत त्यांनी आपली व्यथा मांडली.

त्या म्हणाल्या की, प्रत्येक गोष्टीत नम्रपणे वागण्याचा आणि ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्याबद्दल नाराज न होण्याचा आपण प्रयत्न करत असतो. मात्र, आपल्याशी प्रामाणिकपणे वागलं जात नसल्याची भावना असल्याचं त्यांनी सांगितलं.

कल्पना अय्यर यांनी पुढे स्पष्ट केलं की, त्यांना कोणत्याही ‘दिवा’सारखी म्हणजेच लहरी स्टारसारखी वागणूक नको आहे. मात्र, सभ्यता आणि आदराची अपेक्षा ठेवणं ही फार मोठी मागणी नाही, असं त्यांनी म्हटलं.

कोणाचंही नाव न घेता व्यक्त केली नाराजी

या पोस्टमध्ये कल्पना अय्यर यांनी कोणत्याही व्यक्तीचं किंवा विशिष्ट निर्मात्याचं नाव घेतलेलं नाही. ही पोस्ट कोणाला लक्ष्य करण्यासाठी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्या म्हणाल्या की, लोकांनी त्यांच्या पोस्टवरून कोणतेही अंदाज बांधू नयेत. त्याऐवजी त्यांच्याशी थेट संवाद साधावा. ‘एक ७० वर्षांची महिला निष्पक्ष आणि सभ्यपणे वागण्याची अपेक्षा करत आहे,’ अशा आशयाचं त्यांनी म्हटलं आहे.

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय

‘मला सहानुभूती किंवा विशेष वागणूक नको’

कल्पना अय्यर यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारची सहानुभूती किंवा विशेष वागणूक नको असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांना फक्त काम करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी योग्य संधी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

एखाद्या प्रोजेक्टसाठी त्यांच्याशी संपर्क साधला आणि नंतर काही कारणामुळे ते काम पुढे जाऊ शकलं नाही, तरी किमान त्यांना त्याबाबत सांगावं, अशी त्यांची मागणी आहे.

त्या म्हणाल्या की, ‘तुम्ही माझ्याशी संपर्क साधलात तर मी आभारी राहीन. मात्र ते शक्य नसेल तर मला कळवा. माझ्याशी बोला, मला विचारा. मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि कदाचित बदल किंवा पर्यायही सुचवण्याचा प्रयत्न करेन.’

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

OTT Release: वीकेंडचा प्लॅन ठरला का? ४ सप्टेंबरला OTTवर येणार ९ चित्रपट आणि वेब सीरिज; वाचा संपूर्ण लिस्ट

वयाच्या ७०व्या वर्षीही काम करण्याची इच्छा

कल्पना अय्यर यांनी आपल्या पोस्टमधून पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, वयाच्या ७०व्या वर्षीही त्या अभिनयापासून दूर जाऊ इच्छित नाहीत. आपल्या वयाला साजेशा भूमिका मिळाल्यास त्या काम करण्यासाठी तयार आहेत.

‘रम्बा हो’ या गाण्यामुळे मिळालेली लोकप्रियता, अलीकडे व्हायरल झालेला त्यांचा डान्स आणि त्यानंतरच्या मुलाखती यामुळे कल्पना अय्यर पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आता त्यांच्या या पोस्टनंतर ज्येष्ठ कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये मिळणाऱ्या संधी आणि त्यांच्याशी होणाऱ्या व्यावसायिक व्यवहारावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Kalpana iyer ramba ho girl seeks work at 70

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Mirzapur The Movie: बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’? टॉप A-Rated ओपनर्समध्ये होणार एंट्री
1

Mirzapur The Movie: बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’? टॉप A-Rated ओपनर्समध्ये होणार एंट्री

OTT Release: वीकेंडचा प्लॅन ठरला का? ४ सप्टेंबरला OTTवर येणार ९ चित्रपट आणि वेब सीरिज; वाचा संपूर्ण लिस्ट
2

OTT Release: वीकेंडचा प्लॅन ठरला का? ४ सप्टेंबरला OTTवर येणार ९ चित्रपट आणि वेब सीरिज; वाचा संपूर्ण लिस्ट

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय
3

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट
4

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.