Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kangana Ranaut On Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हावर टीका करताना कंगनाने ओलांडली का मर्यादा? वक्तव्यामुळे नवा वाद

Kangana Ranaut On Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण आले आहे. पोस्टमध्ये तिने कोणाचेही नाव घेतले नसले, तरी ती एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर अप्रत्यक्ष टीका असल्याची चर्चा सुरू आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 03, 2026 | 06:28 PM
Kangana Ranaut: सोनाक्षी सिन्हावर टीका (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Kangana Ranaut: सोनाक्षी सिन्हावर टीका (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कंगनाच्या इन्स्टाग्राम स्टोरीची चर्चा रंगली.
  • पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही.
  • नेटकऱ्यांनी पोस्टचा संबंध सोनाक्षीशी जोडला.
Kangana Ranaut News:बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत(Kangana Ranaut:)तिच्या चित्रपटांइतकीच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. कोणताही विषय असो, कंगना आपले मत सोशल मीडियावर मोकळेपणाने मांडत असते. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टची चर्चा रंगते. आता पुन्हा एकदा तिच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

कंगनाचं नाव पुन्हा चर्चेत

अलीकडच्या काही दिवसांत कंगनाचं नाव पुन्हा चर्चेत आलं होतं. त्याचदरम्यान तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने कोणाचंही नाव घेतलं नाही, मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर अप्रत्यक्ष टीका केल्याची चर्चा सुरू झाली. पोस्टमधील काही उल्लेख पाहून सोशल मीडियावर अनेकांनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले. (Kangana Ranaut On Sonakshi Sinha)

याआधीही कंगनाच्या एका कथित सोशल मीडिया कृतीवरून वाद निर्माण झाला होता. काही स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर तिने एका अभिनेत्रीबाबत आक्षेपार्ह पोस्टला पसंती दिल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हे दावे फेटाळून लावत कंगनाने स्वतः स्पष्टीकरण दिलं. तिच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर फिरणारा तो स्क्रीनशॉट बनावट होता आणि ती कोणाच्याही शरीरयष्टीवर टिप्पणी करण्याच्या विरोधात आहे.

कंगनाने आणखी एक स्टोरी शेअर

यानंतर कंगनाने आणखी एक स्टोरी शेअर केली. त्यामध्ये तिने एका अभिनेत्रीच्या कपड्यांच्या शैलीवर आणि सार्वजनिक वावरावर भाष्य केलं. नाव न घेता केलेल्या या पोस्टमध्ये तिने त्या अभिनेत्रीच्या फॅशन सेन्सवर टीका केली. पूर्वीची तिची स्टाईल अधिक चांगली होती, असा उल्लेख करत आता तिच्या पेहरावात मोठा बदल झाल्याचं मत कंगनाने व्यक्त केलं.

याच पोस्टमध्ये कंगनाने त्या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही काही सूचक टिप्पणी केली. नातेसंबंध आणि व्यक्तिमत्त्व यांचा संबंध बाह्य रूपाशी जोडत तिने स्वतःचं मत मांडलं. तसेच, “स्टाईलसाठी मदत हवी असेल तर मी तयार आहे,” अशा आशयाचं विधानही तिने केलं. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला आणखी उधाण आलं.

कंगनाने संपूर्ण पोस्टमध्ये कोणत्याही अभिनेत्रीचं नाव

विशेष म्हणजे, कंगनाने संपूर्ण पोस्टमध्ये कोणत्याही अभिनेत्रीचं नाव घेतलेलं नाही. तरीही पोस्टमधील संदर्भांवरून अनेक सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या अभिनेत्रींची नावं जोडत आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या चर्चा सध्या केवळ सोशल मीडियावरील अंदाजांपुरत्याच मर्यादित आहेत.

कंगना रणौत याआधीही अनेक वेळा तिच्या स्पष्ट मतांमुळे चर्चेत राहिली आहे. सामाजिक, राजकीय किंवा चित्रपटसृष्टीतील घडामोडींवर ती सातत्याने प्रतिक्रिया देत असते. तिच्या वक्तव्यांना काही जण समर्थन देतात, तर काहीजण त्यावर टीका करतात. त्यामुळे तिची प्रत्येक पोस्ट काही वेळातच व्हायरल होते.

अभिनेत्रीकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर नाही..

दरम्यान, या नव्या पोस्टनंतर संबंधित अभिनेत्रीकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे पुढे या विषयावर आणखी काही घडामोडी होतात का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या मात्र कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून तिच्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: Kangana ranaut cryptic instagram story targets sonakshi sinha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Actress Kangana Ranaut
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का
3

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.