
Mohini Premachi Filmy Kahani: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मुंबई २२ ऑक्टोबर, २०२६ – कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ प्रेक्षकांसाठी एक अत्यंत रोमांचक आणि रंजक महाएपिसोड घेऊन येत असून, २५ ऑक्टोबर रोजी रात्री ८:१५ वाजता प्रसारित होणाऱ्या या विशेष भागामध्ये मालिकेच्या कथानकात एक नाट्यमय वळण येणार आहे. RK च्या चित्रिकरणाचा श्रीगणेशा, सेटवरील घडामोडी, कार्तिकीचे सीक्रेट आणि मोहिनीसमोर उभे ठाकणार मोठे संकट यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. Mohini Premachi Filmy Kahani:
या महाएपिसोडमध्ये RK च्या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून, त्याच्या राकट आणि रांगड्या लूकसाठी मोहिनीने शोधलेला उपाय सगळ्यांना सुखावणारा ठरतो. मात्र, सेटवर आरकेच्या हिरोईनच्या चुकांमुळे मोहिनीच्या अभिनयाची सरशी RK ला पुन्हा जाणवते. ज्यामुळे त्यांच्या नात्यात आणखीन नवीन रंगत येण्याची शक्यता निर्माण होते.
दुसरीकडे, प्रोड्यूसर गुप्ताच्या दबावामुळे कार्तिकीचे बिंग RK आणि मोहिनीसमोर उघडे पडणार का ? हा पेच उभा राहतो. याच दरम्यान, मोहिनीला सिग्नलवर एका छोट्या मुलाला घेऊन भीक मागणाऱ्या बाई मुले काही तरी मोठं षडयंत्र सुरू असल्याचा संशय येतो आणि ती या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरवते.
मात्र, या भयंकर गुन्ह्याचा पर्दाफाश काढताना त्या एका निष्पाप बालकाला वाचवण्याच्या मोहिनीच्या सत्प्रवृत्तीमुळे तिच्यावरच एका मागोमाग एक संकटाची मालिका ओढवते; गुंडांपासून जीव वाचवून सेटवर पोहोचलेल्या मोहिनीवर थेट बालकाचे अपहरण केल्याचा खोटा आरोप होतो आणि पोलीस तिला सेटवरच अटक करायला येतात.
एकापाठोपाठ एक येणाऱ्या संकटांमुळे तिचे आयुष्य कसे बदलणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढवणारे ठरणार आहे. तेव्हा नक्की पहा महाराविवार मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ८:१५ वाजता.
Ans: २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८:१५ वाजता.
Ans: एका बालकाचे अपहरण केल्याचा खोटा आरोप मोहिनीवर होणार आहे.
Ans: प्रोड्यूसर गुप्ताच्या दबावामुळे कार्तिकीचं गुपित RK आणि मोहिनीसामोर उघड होणार का, हा प्रश्न आहे.