Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kartik Aaryan Surgery: सेटवर दुखापत अन् थेट सर्जरी! कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला नेमकं काय झालं?

Kartik Aaryan Surgery: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याला आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली. अॅक्शन सीनच्या शूटिंगवेळी झालेली दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यानंतर कार्तिकवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 23, 2026 | 11:07 AM
Kartik Aaryan Surgery: सेटवर दुखापत अन् थेट सर्जरी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Kartik Aaryan Surgery: सेटवर दुखापत अन् थेट सर्जरी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला दुखापत
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर गुडघ्यावर शस्त्रक्रिया
  • रुग्णालयातून डिस्चार्ज; सध्या घरी आराम
 

Kartik Aaryan Knee Surgery: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या कामापासून थोडा दूर राहिला आहे, त्याच कारणपण ते तसेच गंभीर आहे. कार्तिकला शूटिंगदरम्यान दुखापत झाली. त्याच्या गुडघ्याला लागले आहे. ही जखम इतकी गंभीर आहे की, त्याला थेट शस्त्रक्रिया सल्ला दिला होता. आता ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्याला आता घरी सोडण्यात आले आहे, सध्या तो डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आराम करत आहे.

नेमकं काय घडलं?

कबीर खान यांच्या आगामी चित्रपटासाठी एका अॅक्शन सीनचे शूटिंग सुरु होते. या सीनसाठी कार्तिकला बराच शारिरीक ताण घ्याला लागत होता. तेच करत असताना त्यांच्य गुडघ्याला दुखापत झाली. त्रास वाढत केला, अनेक चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर कार्तिक सध्या घरीच आहे. तो लवकरच कामावर परतण्याचा प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, नेमका किती दिवस त्याला विश्रांती घ्यावी लागणार, याबाबत अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अशा दुखापतीनंतर शरीराला पूर्ण वेळ देणे गरजेचे असते. त्यामुळे त्याच्या पुढील शूटिंगचे वेळापत्रक काही काळ बदलण्याची शक्यता आहे.

कार्तिकसाठी हा चित्रपट महत्त्वाचा

कार्तिकसाठी हा चित्रपट विशेष महत्त्वाचा आहे. ‘चंदू चॅम्पियन’नंतर तो पुन्हा एकदा कबीर खान यांच्यासोबत काम करत आहे. या नव्या प्रोजेक्टची अधिकृत माहिती अद्याप पूर्णपणे समोर आलेली नाही. मात्र, हा चित्रपट खेळाच्या पार्श्वभूमीवर तयार होत असल्याची चर्चा होत आहे. कथेत किकबॉक्सिंगशी संबंधित विषय असल्याचे सांगितले जात असून, कार्तिक एका प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. Kartik Aaryan Surgery:

भूमिुकेवर जोरदार मेहनत

ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकने स्वतःवर खूप मेहनत घेतली होती. फिटनेसपासून शरीरयष्टीपर्यंत त्याने भूमिकेनुसार तयारी केली. त्यामुळे चित्रपटातील ॲक्शन भागही त्याच्यासाठी महत्त्वाचा होता. मात्र, शूटिंगच्या वेळी झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या तयारीला काही काळासाठी ब्रेक लागला आहे.

Govinda Video: तोंडावर मास्क अन् चेहऱ्यावर थकवा; गोविंदा रुग्णालयातून बाहेर पडतानाचा VIDEO व्हायरल

कार्तिकच्या हातात सध्या एकापेक्षा जास्त चित्रपट आहेत. त्यामुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर पुढील कोणत्या प्रोजेक्टचे काम आधी सुरू होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या नव्या स्पोर्ट्स ड्रामामधून कार्तिक निर्मिती क्षेत्रातही एक पाऊल पुढे टाकणार आहे. त्याच्या ‘डोपामाइन स्टुडिओज’ या संस्थेअंतर्गत हा चित्रपट तयार होणार असल्याचे सांगितले जाते.

शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याची दिलासादायक बातमी

कार्तिकच्या चाहत्यांसाठी त्याची दुखापत नक्कीच चिंतेची बाब आहे. मात्र, शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याची बातमी दिलासादायक आहे. आता तो पूर्णपणे बरा होऊन पुन्हा सेटवर कधी दिसतो, याची उत्सुकता आहे. सध्या मात्र कामापेक्षा आरोग्याला प्राधान्य देत कार्तिक आराम करत आहे. पुढील काही दिवस त्याच्यासाठी रिकव्हरीचे असणार आहेत आणि त्यानंतरच त्याच्या शूटिंगबाबत चित्र स्पष्ट होईल.

Deepika Padukone: ‘स्पिरिट’ वाद पुन्हा चर्चेत; चित्रपट नाकारण्यामागचं आणखी एक कारण आलं समोर, वाचा सविस्तर

कोण आहेत  कबीर खान?

कबीर खान हे एक प्रख्यात भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि छायाचित्रकार आहेत, जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टीत (बॉलिवूड) कार्यरत आहेत. त्यांनी ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘८३’ यांसारख्या अनेक लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

 

 

Web Title: Kartik aaryan knee surgery after injury on film set actor discharged home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

South Africa News : स्थलांतरविरोधी आंदोलनाला हिंसक वळण; २४ गाड्या जाळल्या, परदेशी नागरिकांच्या दुकानांची लूट
1

South Africa News : स्थलांतरविरोधी आंदोलनाला हिंसक वळण; २४ गाड्या जाळल्या, परदेशी नागरिकांच्या दुकानांची लूट

Hungary News : हंगेरीमध्ये १२६ वर्षांतील सर्वाधिक तीव्र दुष्काळ; शेती, पाणीपुरवठा आणि ऊर्जा क्षेत्रावर संकट
2

Hungary News : हंगेरीमध्ये १२६ वर्षांतील सर्वाधिक तीव्र दुष्काळ; शेती, पाणीपुरवठा आणि ऊर्जा क्षेत्रावर संकट

Russia-Ukraine : युक्रेनचा रशियाच्या मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर ड्रोन हल्ला
3

Russia-Ukraine : युक्रेनचा रशियाच्या मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर ड्रोन हल्ला

World News : अमेरिकेच्या आखाती किनारपट्टीवर ‘इसायस’ चक्रीवादळाचे संकट; लाखो नागरिकांना सतर्कतेचा इशारा
4

World News : अमेरिकेच्या आखाती किनारपट्टीवर ‘इसायस’ चक्रीवादळाचे संकट; लाखो नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.