Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khatu Shyam Movie: ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’; खाटू श्याम बाबांची कथा आता मोठ्या पडद्यावर, २०२७ मध्ये होणार रिलीज!

Khatu Shyam Movie: खाटू श्याम बाबांच्या भक्तांसाठी मोठी बातमी! ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’ हा चित्रपट २०२७ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. बर्बरीक यांच्या कथेतून प्रेरित या सिनेमाची निर्मिती अबंडंटिया एंटरटेनमेंट आणि सिलेक्ट मीडिया करणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 07, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’ चित्रपटाची घोषणा
  • महाभारतातील बर्बरीकांची कथा मोठ्या पडद्यावर
  • खाटू श्याम बाबांना ‘हारे का सहारा’ का म्हणतात?
Khatu Shyam Movie: भगवान खाटू श्याम बाबांच्या भक्तांसाठी एक मोठी आणि खास बातमी समोर आली आहे. अबंडंटिया एंटरटेनमेंट आणि सिलेक्ट मीडिया यांनी आगामी ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. खाटू श्याम बाबांच्या पवित्र आणि भक्तिभावाने ओतप्रोत कथेतून प्रेरणा घेतलेला हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून महाभारतातील पराक्रमी योद्धा बर्बरीक यांचा असामान्य प्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. धार्मिक परंपरेनुसार बर्बरीक हे भीमाचे नातू आणि घटोत्कचाचे पुत्र होते. त्यांच्या त्यागानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना कलियुगात पूजले जाण्याचा वर दिल्याची मान्यता आहे. त्यामुळे पुढे त्यांची खाटू श्याम बाबा म्हणून भक्तिभावाने पूजा केली जाऊ लागली.

‘हारे का सहारा’ म्हणून ओळख

खाटू श्याम बाबांना भक्त प्रेमाने ‘हारे का सहारा’ म्हणजेच आशा गमावलेल्यांचा आधार, असं संबोधतात. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खाटू येथील त्यांचं मंदिर हे देशातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक आहे. देशभरातून तसेच परदेशातूनही भाविक या मंदिराला भेट देतात.

‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’ या चित्रपटातून बर्बरीक यांच्या जीवनप्रवासासोबतच त्याग, श्रद्धा, आशा आणि समर्पण या भावनांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

भव्यतेसोबत श्रद्धेचा अनुभव

अबंडंटिया एंटरटेनमेंट आणि सिलेक्ट मीडिया यांचं हे सहकार्य केवळ भव्य सिनेमॅटिक अनुभवापुरतं मर्यादित नसून कथेमागील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संदर्भ अस्सल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. निर्मात्यांच्या मते, श्रद्धा आणि आशेची ही कथा भौगोलिक सीमा, पिढ्या आणि परिस्थितीच्या पलीकडे जाणारी आहे.

अबंडंटिया एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि CEO विक्रम मल्होत्रा यांनीही या प्रकल्पाबद्दल आपली भूमिका व्यक्त केली. राजस्थानमध्ये वाढताना श्याम बाबांवरील लोकांची श्रद्धा त्यांनी जवळून पाहिली असल्याचं त्यांनी सांगितलं. भाविक ज्या विश्वासाने आणि समर्पणाने बाबांकडे पाहतात, त्याच भावनेने ही कथा मोठ्या पडद्यावर मांडण्याची इच्छा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Krishnavataram Global Release: श्री श्री रविशंकर आणि क्रिएटिव्हलँडची हातमिळवणी; ‘कृष्णावतारम’ ट्रायलॉजी जगभरात पोहोचणार

‘भारतीय संस्कृतीचा वारसा जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न’

अबंडंटिया एंटरटेनमेंटने याआधीही भारतीय संस्कृती, कुटुंब आणि परंपरेशी जोडलेल्या प्रभावी कथा मांडण्यावर भर दिला आहे. ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’च्या माध्यमातूनही भारतीय श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कोण सांभाळणार, तसेच कलाकार आणि निर्मितीशी संबंधित इतर माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’ हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, खाटू श्याम बाबांच्या भक्तांसह भारतीय पौराणिक कथांमध्ये रस असलेल्या प्रेक्षकांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे.

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत

Web Title: Khatu shyam movie hare ka sahara baba khatu shyam hamara 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: दीपच्या मनात प्रेमाची चाहूल, तारिणीसमोर मोठं संकट; ‘देवमाणूस’मध्येही गूढ वाढणार, ‘या’ आठवड्यात काय घडणार?
1

Zee Marathi Serial: दीपच्या मनात प्रेमाची चाहूल, तारिणीसमोर मोठं संकट; ‘देवमाणूस’मध्येही गूढ वाढणार, ‘या’ आठवड्यात काय घडणार?

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत
2

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत

Krishnavataram Global Release: श्री श्री रविशंकर आणि क्रिएटिव्हलँडची हातमिळवणी; ‘कृष्णावतारम’ ट्रायलॉजी जगभरात पोहोचणार
3

Krishnavataram Global Release: श्री श्री रविशंकर आणि क्रिएटिव्हलँडची हातमिळवणी; ‘कृष्णावतारम’ ट्रायलॉजी जगभरात पोहोचणार

Colors Marathi: मंगळागौरीच्या उत्सवात जेसिकाची एन्ट्री; छवी-अनिकेतच्या नात्यात येणार नवं वादळ?
4

Colors Marathi: मंगळागौरीच्या उत्सवात जेसिकाची एन्ट्री; छवी-अनिकेतच्या नात्यात येणार नवं वादळ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.