Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Koffee With Karan: ‘वन लास्ट टाइम!’ २२ वर्षांनंतर ‘कॉफी विद करण’ला निरोप; शेवटच्या सीझनची घोषणा करताना करण जोहर भावुक

Koffee With Karan Season 9: करण जोहरने ‘कॉफी विथ करण’च्या नवव्या सीझनची घोषणा केली असून हा शोचा शेवटचा सीझन असणार आहे. पहिल्या एपिसोडमध्ये सलमान खान दिसणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 01, 2026 | 11:36 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Koffee With Karan: बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर त्याच्या लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’मुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. सेलिब्रिटींच्या गप्पा, वैयक्तिक आयुष्यावरील प्रश्न आणि अनेकदा चर्चेत येणाऱ्या वक्तव्यांमुळे या शोने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. आता या लोकप्रिय शोच्या नवव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेसोबतच चाहत्यांसाठी एक भावूक करणारी बातमीही समोर आली आहे.

‘कॉफी विथ करण’चा हा शेवटचा सीझन

करण जोहरने बुधवारी एका भावनिक व्हिडिओच्या माध्यमातून ‘कॉफी विथ करण सीझन ९’ हा शोचा शेवटचा सीझन असणार असल्याचे जाहीर केले. जवळपास २२ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या शोसोबतचा आपला प्रवास आठवताना करण भावुक झालेला पाहायला मिळाला.

या शोने आतापर्यंत आठ सीझनमध्ये १६१ एपिसोड्सचा प्रवास पूर्ण केला आहे. आता नववा सीझन हा या लोकप्रिय चॅट शोचा अंतिम टप्पा असणार आहे.

२००४ मध्ये सुरू झाला होता शो

करण जोहरने प्रोमोमध्ये ‘कॉफी विथ करण’च्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली. त्याने सांगितले की, जून २००४ मध्ये त्याने वडील यश जोहर यांना आपण टॉक शो होस्ट करू इच्छित असल्याचे सांगितले होते.

करणच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी यश जोहर यांनी त्याला विचारले होते की, तो आपल्या मित्रांना बोलावून त्यांच्याशी गप्पा मारणार असेल, तर ते पाहण्यासाठी कोण पैसे देणार? मात्र, त्यानंतर करणने हा शो सुरू केला आणि त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

करणने सांगितले की, २६ जून २००४ रोजी त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि १६ ऑगस्ट २००४ रोजी त्याने ‘कॉफी विथ करण’साठी पहिल्यांदा शूट केले. त्यानंतर हा शो बॉलिवूडमधील लोकप्रिय चॅट शोपैकी एक ठरला.

Amitabh Bachchan Injury: शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; गुडघ्याला झाली दुखापत, सांगितली प्रकृतीची स्थिती

‘या शोने मला खूप काही दिलं’

आपल्या भावनिक संदेशात करण जोहर म्हणाला, “ही एक प्रोफेशनल घोषणा नसून, एक भावनिक मेसेज आहे.” शोच्या प्रवासाची आठवण सांगताना त्याने सेलिब्रिटी, मित्र, कुटुंबीय आणि अनेक जोडप्यांना शोमध्ये आमंत्रित केल्याचे सांगितले.

करण म्हणाला की, त्याने अशा अनेक जोडप्यांशी संवाद साधला, जे नंतर विभक्त झाले, तर काही नाती लग्नापर्यंतही पोहोचली.

आपल्या शोमुळे निर्माण झालेल्या चर्चांचाही त्याने उल्लेख केला. “मी राष्ट्रीय आयकॉन्सचे करिअर जवळजवळ उद्ध्वस्त केले होते; आजही मी घराणेशाही या शब्दासोबत जगतो. अफवा हा एक राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला होता; खूप काही घडले,” असे करणने म्हटले.

When Karan has a message for us, consider us seated on the kouch 😉 Hotstar Specials: Koffee with Karan Season 9, streaming 14th October onwards on JioHotstar. #KWKS9OnJioHotstar #KaranJohar @AdarPoonawalla @apoorvamehta18 @aneeshabaig #NishantNayak @Dharmatic_ https://t.co/dRLMzQsCcR — JioHotstar Reality (@HotstarReality) September 30, 2026

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी

सलमान खान पहिला पाहुणा

‘कॉफी विथ करण ९’च्या पहिल्या एपिसोडमध्ये सलमान खान एकमेव पाहुणा म्हणून दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शेवटच्या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये करण जोहर आणि सलमान खान यांच्यात रंगणाऱ्या गप्पांकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

करणने पुढे म्हटले की, तो कुठेही गेला तरी त्याला नेहमी ‘कॉफी विथ करण’च्या पुढच्या सीझनबद्दल विचारले जाते. या शोने आपल्याला खूप काही दिले असल्याचे सांगताना करण जोहर भावुक झाला.

आता ‘कॉफी विथ करण सीझन ९’च्या माध्यमातून करण जोहर या लोकप्रिय शोला अखेरचा निरोप देणार असल्याने चाहत्यांसाठी हा सीझन विशेष ठरणार आहे.

Web Title: Koffee with karan season 9 last season karan johar emotional ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • entertainment
  • karan johar
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan Injury: शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; गुडघ्याला झाली दुखापत, सांगितली प्रकृतीची स्थिती
1

Amitabh Bachchan Injury: शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; गुडघ्याला झाली दुखापत, सांगितली प्रकृतीची स्थिती

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी
2

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
3

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
4

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.