Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “भावाला बिकिनी घालून राखी का बांधाल?”, कंगना रनौतने कृती सेननला सुनावलं; जाहिरातीवरून वाद पेटला

Kriti Sanon Raksha Bandhan Ad वरून वाद निर्माण झाला आहे. कृती सेननच्या जाहिरातीतील लूकवर कंगना रनौतने टीका करत “भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्र घालून राखी का बांधाल?” असा सवाल केला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 25, 2026 | 08:49 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवरून वाद
  • रक्षाबंधन जाहिरातीवर कंगना रनौतची टीका
  • कंगना रनौतने काय म्हटलं?
Kriti Sanon Raksha Bandhan Ad: बॉलिवूडमधील स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कंगनाने अभिनेत्री कृती सेननच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून कंगनाने जाहिरातीतील कृतीच्या लूकवर प्रश्न उपस्थित करत काही गोष्टींना मर्यादा असायला हव्यात, असं म्हटलं आहे.

कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवरून वाद

कृती सेननने नुकतीच रक्षाबंधनाच्या निमित्ताने एका ज्वेलरी ब्रँडसाठी जाहिरात केली. या जाहिरातीत ती ऑफ-व्हाइट रंगाच्या इंडो-वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. तिने ब्रॅलेट-स्टाइल ब्लाउज, केप आणि ड्रेप केलेला स्कर्ट परिधान केला आहे.

जाहिरात सोशल मीडियावर प्रदर्शित होताच तिच्या लूकवरून चर्चा सुरू झाली. पारंपरिक भारतीय सण रक्षाबंधनाशी संबंधित जाहिरातीसाठी हा पोशाख योग्य आहे का?, असा सवाल काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला. काही युजर्सनी कृतीला ट्रोल करत जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली.

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

कंगना रनौतने काय म्हटलं?

या वादात आता कंगना रनौतनेही उडी घेतली आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत कृतीच्या जाहिरातीवर टीका केली. महिलांना आज त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असलं, तरी काही प्रसंग आणि संदर्भ लक्षात घेऊन मर्यादा पाळायला हव्यात, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कंगनाने लिहिलं, “स्त्री असण्याचा हा एक अद्भुत काळ आहे. आपले वॉर्डरोब विविध प्रकारच्या कपड्यांनी भरलेले आहेत. आजची स्त्री जागतिक आहे. कॉकटेल ड्रेसपासून लेहेंगा-चोलीपर्यंत, जीन्सपासून साड्यांपर्यंत, बिकिनीपासून सलवार-कमीजपर्यंत, आज आपल्याकडे अनेक पर्याय आहेत.”

पुढे कंगनाने थेट सवाल केला, “मग तुम्ही बिकिनी (Bikni)किंवा अंतर्वस्त्रे घालून तुमच्या भावाला राखी का बांधाल? तुमचे स्टायलिंगचे पर्याय कुठे गेले? ही जाहिरात मुद्दाम विचित्र आहे.”

Don’t Be Shy : मैत्री, प्रेम आणि तरुणपणाचा प्रवास…आलिया आणि शाहीन भट्टचा ‘डोंट बी शाय’ चित्रपट, ‘या’ तारखेला ग्लोबल प्रीमियर

नेटकऱ्यांच्याही संमिश्र प्रतिक्रिया

कृती सेननच्या या जाहिरातीवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही युजर्सनी जाहिरातीच्या सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी ती केवळ जाहिरात असल्याचं म्हणत तिची बाजू घेतली आहे.

काही नेटकऱ्यांनी रक्षाबंधनाच्या जाहिरातीतील ग्लॅमरस सादरीकरणावर प्रश्न उपस्थित केले. तर काहींनी जाहिरातीच्या माध्यमातून पारंपरिक सणाचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केल्याची टीका केली.

दरम्यान, कंगना रनौतच्या प्रतिक्रियेमुळे या जाहिरातीवरील चर्चा आणखी वाढली आहे. आता कृती सेनन किंवा जाहिरात करणाऱ्या ब्रँडकडून याबाबत काही प्रतिक्रिया येते का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर

Web Title: Kriti sanon raksha bandhan ad kangana ranaut criticism controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Entertainement News
  • Kangana Ranaut
  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली
1

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली

Onkar Bhojane On Milind Kawde:  दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ कारणामुळे प्रमोशनला नव्हता हजर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ कारणामुळे प्रमोशनला नव्हता हजर

Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’मध्ये ‘या’ मराठी अभिनेत्रीची पुन्हा Entry; पोस्टमधून व्यक्त केला आनंद
3

Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’मध्ये ‘या’ मराठी अभिनेत्रीची पुन्हा Entry; पोस्टमधून व्यक्त केला आनंद

Nivedita Saraf Secret Diet Plan: वयाच्या ६१ व्या वर्षीही फिटनेसचा फंडा! निवेदिता सराफ यांचा ‘हा’ खास डाएट प्लान पाहिलात का?
4

Nivedita Saraf Secret Diet Plan: वयाच्या ६१ व्या वर्षीही फिटनेसचा फंडा! निवेदिता सराफ यांचा ‘हा’ खास डाएट प्लान पाहिलात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.