Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prahaar Movie : २६/११ चा दहशतवादी अजमल कसाबच्या भूमिकेत मराठीचा चॉकलेट हिरो, अंगावर काटा आणणारा ‘प्रहार’चा पहिला लूक प्रदर्शित

'प्रहार' चित्रपटातून 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची कहाणी मोठ्या पडद्यावर येणार आहे. अभिनेता ललित प्रभाकर अजमल कसाबच्या भूमिकेत दिसणार असून त्याचा पहिला लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 25, 2026 | 04:11 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

राजकुमार राव हा एक असा बॉलिवूड अभिनेता आहे, ज्याला भूमिकेत कसे शिरायचे हे चांगलेच ठाऊक आहे. तो लवकरच ‘प्रहार’ या चित्रपटात दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा मिळवून देणारे वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील त्याच्या लूकची पहिली झलक समोर आली आहे. निर्मात्यांनी ‘प्रहार’च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

‘प्रहार’ या चित्रपटात राजकुमार राव, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार कसाबला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी अथक लढा देणारे प्रख्यात भारतीय वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारणार आहे. ही कथा आता मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे. हा चित्रपट ७ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

जेव्हा चाहत्यांना ‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार रावच्या लूकची झलक मिळाली, तेव्हा त्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला. सेलिब्रिटींनीही चित्रपटाचे आणि राजकुमारचे कौतुक केले. पण प्रहार चित्रपटाची पहिली झलक समोर येताच मराठी प्रेक्षकांना देखील सुखद धक्का मिळाला आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट हिरो प्रहार मध्ये झळकणार आहे. त्याचं नाव आहे ललित प्रभाकर असून तो, या चित्रपटात अजमल कसाबची भूमिका साकारणार आहे. ललितला आतापर्यंत विविध रोमॅंटिक आणि सकारात्मक भूमिका साकारताना प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण, आता पहिल्यांदाच अजमल कसाबच्या भूमिकेत पाहून चाहतेही शॉक झाले आहेत.

 Vaishnavi Kalyankar : “माणसासारखी आकृती दिसली अन्…”, वैष्णवीने रात्री २:३० वाजता केला पती किरण गायकवाडला फोन, म्हणाली…

ललित प्रभाकरच्या रूपांतराने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. “खरंच कसाबच्या भूमिकेत ललित आहे का?”, “ललितचा लूक पाहून शॉक बसला”, “वेगवेगळ्या भूमिका आणि दमदार अभिनय… ललितला मानलं पाहिजे”, “मराठीचा चॉकलेट बॉय आता कसाबच्या भूमिकेत पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. ललितच्या या धाडसी आणि आव्हानात्मक भूमिकेमुळे ‘प्रहार’ चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.आशिष चंचलानीपासून ते अनंत जोशीपर्यंत, सेलिब्रिटींनी ‘प्रहार’वर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हास्याचा फुल ऑन डोस! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा धमाकेदार टीझर आऊट, अंकुश, कुशल, अभिजीत अन् संतोषची भन्नाट गँगमस्ती

राजकुमार राव ‘प्रहार’ या चित्रपटात उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारणार आहे. तो माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यावरील बायोपिकमध्येही काम करणार आहे. या चित्रपटासाठी तो क्रिकेटचे धडे घेत आहे. त्याने आपल्या दिसण्यातही बदल केले आहेत.

 

Web Title: Lalit prabhakar as 2611 terrorist ajmal kasab first look of prahaar unveiled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • 26/11 Attack
  • Hindi Movie
  • rajkumar rao

संबंधित बातम्या

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
1

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई
2

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज
3

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
4

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.