Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashish Shelar: Gen Z साठी मराठी सिनेमाचा नवा अंदाज! सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा

Ashish Shelar: मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीतील आणि विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासन विशेष चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी होणार आहे. या चित्रपटात आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि इतर तांत्रिक माध्यमांचा प्रभावी वापर केला जाणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 18, 2026 | 07:00 PM
'राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार'; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची मोठी घोषणा

'राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार'; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:
  • Gen Z साठी विशेष मराठी चित्रपटाची निर्मिती
  • VFX आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
  • व्यावसायिक यशासाठी प्रेक्षकांशी नवा कनेक्ट साधण्यावर भर
Enteriment News: मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीचा, विशेषतः जेन झी प्रेक्षकांचा वेध घेणारा तसेच आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अन्य तांत्रिक माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासन सहभाग घेणार, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. मराठी चित्रपटांचा दर्जा, गुणवत्ता, नावीन्य आणि अभिनय याबाबत कोणतीही कमतरता नसून व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेल्या ‘कनेक्टिंग लिंक’वर काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यवहार्य मॉडेल तयार झाल्यास महाराष्ट्र शासन त्यात गुंतवणूक

मराठी चित्रपटसृष्टीने दर्जेदार आशय आणि नाविन्यपूर्ण मांडणीची परंपरा कायम ठेवली आहे. मात्र निर्मितीइतकाच स्क्रीन, वितरण आणि प्रेक्षकवर्ग यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी व्यवहार्य मॉडेल तयार झाल्यास महाराष्ट्र शासन त्यात गुंतवणूकदार म्हणून भूमिका घेईल, असे ॲड. शेलार यांनी सांगितले. Ashish Shelar

मराठी चित्रपटांसाठी उपलब्ध स्क्रीनची संख्या, वितरण व्यवस्था आणि नव्या प्रेक्षकवर्गाची निर्मिती या मुद्द्यांवर व्यापक विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दक्षिण भारतीय चित्रपटांना मिळणाऱ्या भावनिक प्रेक्षक प्रतिसादाचा दाखला देत मराठी चित्रपटांसाठीही नव्या पिढीशी भावनिक नाते निर्माण करणारा प्रेक्षकवर्ग विकसित करण्याची आवश्यकता आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आधुनिक तंत्रज्ञान हे चित्रपटसृष्टीसमोर आव्हान असले तरी त्याचे संधीत रूपांतर करणे आवश्यक आहे. यासाठी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याची उपयुक्तता आणि आव्हाने यावर प्रात्यक्षिकांसह चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करावी, अशी सूचना मंत्री ॲड. शेलार यांनी केली.

मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा

मराठी जेन झी प्रेक्षक अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा, यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मितीमूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण करणे गरजेचे आहे. अशा चित्रपटाच्या निर्मितीचा आर्थिक भार केवळ निर्मात्यांवर पडू नये, यासाठी राज्य शासन त्यात भूमिका घेईल, असेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

चित्रपटसृष्टीची परिसंस्था बनविण्याचा प्रयत्न – स्वाती म्हसे पाटील

चित्रपट हा केवळ कला किंवा व्यवसाय नसून कला, तंत्रज्ञान, अर्थकारण, निर्मिती आणि संस्कृती यांचा सुरेख संगम आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात चित्रनगरीची भूमिका केवळ चित्रीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित न राहता चित्रपटसृष्टीसाठी संपूर्ण परिसंस्था निर्माण करण्याची आहे, असे मत फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी व्यक्त केले.

Mrutyuchakra Upcoming Movie: मिश्कील ‘जना काका’ की रहस्यमयी चेहरा? ‘मृत्यूचक्र’मध्ये शशांक शेंडेंची अनोखी भूमिका

स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि ओटीटीच्या वाढत्या प्रभावामुळे चित्रपट निर्मिती, संकलन आणि आस्वादनाचे आयाम बदलले आहेत. या बदलांमुळे नवीन आव्हाने निर्माण झाली असली तरी त्यातून संधीही उपलब्ध होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा ‘तो’ लूक पाहून धक्का बसेल! देवखेळ 2’चा टीझर अंगावर काटा आणणारा

चित्रनगरीकडून पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’ यावर काम केले जात असून, त्यासाठी पाच आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. महामंडळ ५०व्या वर्षात पदार्पण करत असल्याचा अभिमान व्यक्त करताना, या परिसंवादातून चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी उपयुक्त विचारमंथन घडेल आणि मराठी चित्रपटसृष्टीला निश्चितपणे सुवर्णकाळ येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला फिल्मसिटीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर, महेश मांजरेकर, अशोक राणे, मेघराज राजेभोसले, राजेश मापुस्कर, सुशांत शेलार तसेच चित्रकर्मी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra government to support special marathi film for gen z audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन
1

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर
2

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा
3

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
4

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.