Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकरांचा कॅन्सरशी लढा; उपचारानंतर व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, ‘काही प्रवास आयुष्य बदलून..’

Medha Manjrekar : महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनी कर्करोगाशी सुरू असलेल्या लढ्याबाबत भावुक पोस्ट शेअर केली. उपचारांचा प्रवास आणि कुटुंबाच्या साथीसाठी मानले आभार.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 13, 2026 | 11:15 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Medha Manjrekar :मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी तसेच अभिनेत्री आणि निर्माती मेधा मांजरेकर यांनी नुकत्याच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मेधा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्याला कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती दिली. तसेच उपचारादरम्यानचा भावनिक प्रवास आणि या काळात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी मनापासून आभार मानले.

मेधा मांजरेकर यांनी त्यांचे काही फोटो पोस्ट केले असून त्यांनी लिहिले, , “आयुष्यात काही प्रवास असे असतात, जे तुम्हाला कायमचे बदलून टाकतात. माझ्यासाठी हा तसाच एक प्रवास होता. उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा आता पूर्ण होत आला आहे. मागे वळून पाहताना मला कर्करोगाचं निदान, शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडिएशन यापेक्षा या काळात मिळालेलं प्रेम, साथ आणि आशीर्वाद अधिक आठवतात.”

त्या पुढे म्हणाल्या, “जेव्हा जेव्हा मला वाटलं की आता पुढे चालणं शक्य नाही, तेव्हा कोणीतरी माझा हात धरायला आलं. ते योगायोग नव्हते, तर देवच वेगवेगळ्या रूपात माझ्या मदतीला आला होता. माझे गुरु, डॉक्टर, परिचारिका, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि माझे पती महेश मांजरेकर यांच्या आधारामुळेच मी हा कठीण प्रवास पार करू शकले.”

मेधा यांनी आपल्या मुलींचाही विशेष उल्लेख केला. “आई कायम मुलांचा हात धरून चालते, असंच वाटत राहतं. पण या प्रवासात मला जाणवलं की, एक दिवस मुलंच आईचा हात धरून तिला आधार देत असतात. माझ्या मुलींनी माझा हात कधीच सोडला नाही,” असे त्यांनी भावुक शब्दांत लिहिले.


उपचारांच्या काळात मित्र-परिवाराने दिलेल्या मायेची आठवणही त्यांनी पोस्टमध्ये सांगितली. कुणी घरचं जेवण आणलं, कुणी प्रार्थना केली, तर कुणी फक्त सोबत राहून धीर दिला. “या संकटात मला कधीच एकटं वाटू दिलं नाही. तुमच्या प्रेमाने आणि विश्वासानेच मला लढण्याची ताकद दिली,” असे म्हणत त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

मेधा मांजरेकर यांच्या या पोस्टनंतर चाहते आणि मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा देत लवकर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

Web Title: Mahesh manjrekars wife medha manjrekar diagnosed with cancer opens up after treatment says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • cancer
  • mahesh manjrekar
  • marathi actress

संबंधित बातम्या

कॅन्सर झाला म्हणजे करिअर संपले का? उपचारानंतर पुन्हा ‘कमबॅक’ शक्य! डॉक्टरांचा सल्ला  ठरेल गेमचेंजर
1

कॅन्सर झाला म्हणजे करिअर संपले का? उपचारानंतर पुन्हा ‘कमबॅक’ शक्य! डॉक्टरांचा सल्ला ठरेल गेमचेंजर

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ
2

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ

Exclusive: मीराची सुट्टी अन् गौतमची एंट्री! ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’मध्ये ऑफिसच्या समीकरणांना लागणार नवं वळण
3

Exclusive: मीराची सुट्टी अन् गौतमची एंट्री! ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’मध्ये ऑफिसच्या समीकरणांना लागणार नवं वळण

Bandkhor: सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट! टिझरने वाढवली उत्सुकता, महेश मांजरेकरांची कलाकृती
4

Bandkhor: सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट! टिझरने वाढवली उत्सुकता, महेश मांजरेकरांची कलाकृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.