Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aali Mothi Shahani Movie: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन

Aali Mothi Shahani Movie: हृता दुर्गुळे आणि सारंग साठे यांच्या ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ गाणं रिलीज झालं आहे. अभय जोधपूरकरांच्या भावपूर्ण आवाजाने गाणं खुललं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 11, 2026 | 01:00 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aali Mothi Shahani Movie: गणेशोत्सवाला आता काहीच दिवस बाकी असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याच उत्सवी वातावरणात ‘आली मोठी शहाणी’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘गणेश वंदना’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बाप्पाच्या चरणी श्रद्धा व्यक्त करणारं हे गाणं भक्तिभावासोबतच गणेशोत्सवाचा आनंद आणि प्रसन्न वातावरणाची अनुभूती देतं.

‘मोठं व्हायचंय’ म्हणणाऱ्या चिमुकलीची इच्छा

चित्रपटाच्या टीझरमध्ये एका चिमुकलीची ‘मोठं व्हायचंय’ ही निरागस इच्छा पाहायला मिळाली होती. आपली ही इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी ती गणरायाकडे साकडं घालताना दिसली होती. त्यामुळे ‘गणेश वंदना’मधूनही चित्रपटाच्या कथेशी जोडलेला बाप्पाचा भावनिक धागा समोर येतो.

अभय जोधपूरकरांच्या आवाजाने खुलला भक्तिरस

नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले अभय जोधपूरकर यांनी या गाण्याला आपला भारदस्त आणि भावपूर्ण आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजामुळे गाण्यातील भक्तिभाव अधिक प्रभावीपणे जाणवतो.

पंकज पडघन यांनी गाण्याला संगीत दिलं असून त्यांच्या संगीत रचनेतून गणेशोत्सवाचा उत्सवी रंग खुलतो. तर गुरु ठाकूर यांच्या शब्दांमधून बाप्पाप्रतीची श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त होतो.

Bipasha Basu: प्रोटीन पावडरमध्ये चक्क सापडल्या अळ्या; बिपाशाने तुकाराम मुंढेंकडे मागितली मदत, म्हणाली- ‘आपणच एकमेव..’

‘भक्तिभाव आणि उत्सवाचा आनंद यांचा मेळ साधला’

संगीतकार पंकज पडघन यांनी गाण्याबद्दल सांगितलं की, ‘गणेश वंदना’ तयार करताना भक्तिभाव आणि उत्सवाचा आनंद यांचा सुंदर मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाप्पाशी जोडलेली श्रद्धा आणि ‘आली मोठी शहाणी’च्या कथेतील भावनिक धागा संगीताच्या माध्यमातूनही जाणवावा, याकडे विशेष लक्ष दिल्याचं त्यांनी सांगितलं.

बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहात हे गाणं प्रेक्षकांच्या मनातही आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

चित्रपटाच्या कथेशी जोडलेली आहे ‘गणेश वंदना’

लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी सांगितलं की, ‘आली मोठी शहाणी’च्या कथेत गणपती बाप्पाशी जोडलेला भाव महत्त्वाचा आहे. त्यामुळे ‘गणेश वंदना’ केवळ उत्सवाचा भाग न राहता चित्रपटाच्या कथेशी जोडलेली असावी, अशी टीमची इच्छा होती.

गाण्यात भक्तिभावासोबतच प्रसन्न ऊर्जा जाणवावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये मुख्य भूमिकेत

आनंद दिलीप गोखले लिखित-दिग्दर्शित ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाची निर्मिती फाईन ब्रू प्रोडक्शन्स आणि ट्रू होप फिल्म्स वर्क यांच्या वतीने करण्यात आली आहे. जयकुमार मुनोत, ईशा मुठे आणि श्रुती साठे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटात हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘आली मोठी शहाणी’ हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या ‘गणेश वंदना’मुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा

Web Title: Aali mothi shahani movie ganesh vandana song release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • New Song

संबंधित बातम्या

R Madhavan: शूटिंगमधून वेळ काढत आर. माधवन पोहोचला यूएस ओपनमध्ये; दिग्गजांसोबत घेतला खास अनुभव
1

R Madhavan: शूटिंगमधून वेळ काढत आर. माधवन पोहोचला यूएस ओपनमध्ये; दिग्गजांसोबत घेतला खास अनुभव

Bipasha Basu: प्रोटीन पावडरमध्ये चक्क सापडल्या अळ्या; बिपाशाने तुकाराम मुंढेंकडे मागितली मदत, म्हणाली- ‘आपणच एकमेव..’
2

Bipasha Basu: प्रोटीन पावडरमध्ये चक्क सापडल्या अळ्या; बिपाशाने तुकाराम मुंढेंकडे मागितली मदत, म्हणाली- ‘आपणच एकमेव..’

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा
3

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा

Mirzapur Box Office Collection: ‘कालीन भैय्या’चा दबदबा कायम! 10 सप्टेंबरला सिनेमाने केली तुफान कमाई
4

Mirzapur Box Office Collection: ‘कालीन भैय्या’चा दबदबा कायम! 10 सप्टेंबरला सिनेमाने केली तुफान कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.