Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित या भव्य चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर येत्या १५ मे २०२६ रोजी ‘अल्ट्रा झकास’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार असून, त्याचा बहुप्रतीक्षित ट्रेलर  ११ मे रोजी प्रदर्शित झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 12, 2026 | 06:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • उलगडणार तुकोबांच्या संघर्ष, भक्ती आणि प्रेमाची गाथा
  • टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला भक्तिरस
  • अल्ट्रा झकास’वर ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर
Abhang Tukaram Trailer : “ज्ञानोबा माऊली-तुकाराम”च्या अखंड नामघोषात आणि टाळ-मृदंगाच्या भक्तिमय निनादात रंगलेला ‘अभंग तुकाराम’ हा बहुचर्चित चित्रपट आता प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचण्यासाठी सज्ज होणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित या भव्य चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर येत्या १५ मे २०२६ रोजी ‘अल्ट्रा झकास’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार असून, त्याचा बहुप्रतीक्षित ट्रेलर  ११ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. नेमका कसा असेल प्रवास जाणून घेऊयात.

Aai Tuljabhavani Marathi Serial : आई तुळजाभवानीचा अलौकिक विवाह सोहळा ; अनोख्या केळवणाची उत्सुकता शिगेला

कोण प्रमुख भूमिकेत?

‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली असून, अभिनेत्री स्मिता शेवाळे त्यांच्या पत्नी आवलीच्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय अजय पुरकर, समीर धर्माधिकारी यांच्यासह अनेक दमदार कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

तुकाराम महाराजांचा प्रवास उलगडणार

चरित्रपट, नाटक आणि ऐतिहासिक या धाटणीतील हा चित्रपट संत तुकाराम महाराजांच्या जीवनप्रवासाची, त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांची आणि अभंगांमधून दिलेल्या जीवनतत्त्वज्ञानाची प्रभावी कहाणी मांडतो. पत्नी आवलीच्या साथीने समाजप्रबोधनाचा मार्ग स्वीकारणाऱ्या तुकाराम महाराजांचा संघर्ष, भक्ती आणि प्रेमाचा प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. कविता, अभंग आणि संगीताच्या माध्यमातून ही कथा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच भक्तिभाव जागवणारी ठरेल.

जीवनाचं गूढ सत्य दडलं – दिग्पाल लांजेकर

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाची कथा आणि संवाद लिहिले आहेत. वारकरी परंपरेचा सखोल अभ्यास आणि लोकजीवनाचा गाभा जपत हा चित्रपट साकारण्यात आला आहे. दिग्पाल लांजेकर म्हणतात, “तुकारामांच्या अभंगांमध्ये अध्यात्मासोबतच जीवनाचं गूढ सत्य दडलं आहे. सोबतच लोकसाहित्य, लोकसंगीत आणि भक्तीचा संगम प्रेक्षकांना या चित्रपटात अनुभवायला मिळेल.”

अध्यात्मिक वारशाचा एक भावनिक प्रवास – सुशीलकुमार अग्रवाल

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी. ई. ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, ”अभंग तुकाराम’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि अध्यात्मिक वारशाचा एक भावनिक प्रवास आहे. अशा आशयघन आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. जगभरातील प्रेक्षकांना संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा आणि अभंगांचा दिव्य अनुभव डिजिटल माध्यमातून घेता येईल, याचा आम्हाला आनंद आहे.”

मराठी संस्कृती, वारकरी परंपरा आणि भक्तिरसाचा भव्य अनुभव देणारा ‘अभंग तुकाराम’ आता ‘अल्ट्रा झकास ओटीटी’च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे भक्ती, अध्यात्म आणि अभंगांचा हा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा, हा प्रवास तुकोबांच्या आयुष्याच्या प्रवासाकडे घेऊन जाईल.

Web Title: Abhang tukaram marathi web series trailer released ott streaming see details more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • sant tukaram

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.