Aai Tuljabhavani Marathi Serial : आई तुळजाभवानीचा अलौकिक विवाह सोहळा ; अनोख्या केळवणाची उत्सुकता शिगेला
विशेष म्हणजे या केळवणाच्या आमंत्रणांचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. त्यात कोणती देवी तुळजाचे मायेचे केळवण करणार हे रहस्य निर्माण झाल्यामुळे या आगामी भागांबद्दल प्रेक्षकांना विशेष उत्कंठा आहे.या केळवणाचे निमंत्रणही अनोखे आहे, तुळजाभवानीसाठी एक खास रहस्यमय निमंत्रण येतं, एक निरोप्या तिच्यासमोर खलिता आणतो आणि तो उघडताच त्यातून चमकणारं श्रीयंत्र हवेत झेपावतं.
Zee Marathi : सनई चौघडे मालिकेत नवा ट्विस्ट; जयचा माज उतवरण्यासाठी ‘या’ विशेष व्यक्तीची एन्ट्री
क्षणात त्या श्रीयंत्रातून देवीभोवती चार श्रीयंत्र निर्माण होतात आणि आवाज घुमतो “मी तुझी वाट पाहत आहे. मला तुझं केळवण करायचं आहे.” त्यानंतर गुलाब पाकळ्यांचा सुंदर वर्षाव तुळजाभवानीवर होतो आणि तिचा चेहरा आनंदाने खुलून जातो. पण हे निमंत्रण कोणी पाठवलंय? नाव नाही, पत्ता नाही. तुळजाला मात्र खात्री आहे, हे तिच्या संखीचं प्रेमाचं निमंत्रण आहे. आता प्रश्न एकच कोण करणार आहे तुळजाचे मायेचे केळवण?. आई तुळजाभवानीच्या अलौकिक विवाहाच्या अद्भूत महिन्यातला हा अविस्मरणीय सोहळा त्यातला रहस्यामुळे विशेष ठरणार आहे.
तेजश्री प्रधान आणि राकेश बापटचं लग्न ? अभिनेत्याने सांगितला तो किस्सा म्हणाला नातेवाईक देखील….






