Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dwidha Movie: रिअल ते रील… ‘द्विधा’मध्ये दिसणार मायलेकीचं खास बॉन्डिंग; मानसी कुलकर्णींची लेक ओवी करणार अभिनयात पदार्पण

मराठी चित्रपट 'द्विधा'मध्ये अभिनेत्री मानसी कुलकर्णी आणि त्यांची लेक ओवी पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ओवी या चित्रपटातून अभिनयात पदार्पण करत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 27, 2026 | 12:45 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या पुढच्या पिढीची नेहमीच उत्सुकता असते. आता अशीच एक खास मायलेकीची जोडी आगामी मराठी चित्रपट **’द्विधा’**मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांनी साकारलेल्या ‘श्रावणी’ या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या बालपणीच्या भूमिकेत त्यांची कन्या ओवी कुलकर्णी दिसणार आहे.

‘द्विधा’च्या निमित्ताने मानसी कुलकर्णी आणि ओवी कुलकर्णी ही मायलेकीची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. विशेष म्हणजे, ओवीचा हा पहिलाच ऑनस्क्रीन अभिनय अनुभव असूनही तिने आत्मविश्वासाने आणि निरागसतेने भूमिका साकारत सर्वांची दाद मिळवली आहे.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी विदुला रमेश आजगावकर यांनी सांभाळली आहे. ‘द्विधा’ हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

याबद्दल अभिनेत्री मानसी कुलकर्णी म्हणाल्या, “श्रावणीच्या बालपणीच्या भूमिकेसाठी ओवीची निवड हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता. आई म्हणून तिचा पहिला ऑनस्क्रीन प्रवास पाहताना मला खूप अभिमान वाटला. तिच्यातील सहजता आणि आत्मविश्वास पाहून समाधान मिळाले. तिने ही भूमिका मनापासून आणि प्रामाणिकपणे साकारली आहे.”

Main Vaapas Aaunga OTT Release: शर्वरी वाघची मुख्य भूमिका असलेला चित्रपट आता ओटीटीवर, जाणून घ्या कधी व कुठे पाहायचा?

पहिल्या अभिनय अनुभवाबद्दल ओवी म्हणाली, “सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण आई आणि संपूर्ण टीमने मला खूप प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी ही भूमिका आत्मविश्वासाने करू शकले. ‘द्विधा’मधून प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे.”

‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्यावर आधारित चित्रपट नसून, प्रत्येक नात्यातील प्रेम, विश्वास आणि भावनांचा संवेदनशील प्रवास मांडणारा चित्रपट आहे. चित्रपटात मानसी आणि ओवी यांच्यासोबत सतीश पुळेकर, रेणुका दफ्तरदार, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत आणि हेमांगी वेळणकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Shreelekha Mitra Controversy: पंतप्रधान मोदींवरील आक्षेपार्ह कार्टून शेअर केल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत, नेमकं प्रकरण काय?

Web Title: Actress mansi kulkarni and her daughter ovis special duo to shine on screen ovi makes her acting debut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Maha Sakthi Teaser: नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार; शेवटचे 10 सेकंद ठरणार खास, ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश
1

Maha Sakthi Teaser: नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार; शेवटचे 10 सेकंद ठरणार खास, ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य
2

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत
3

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या
4

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.