Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Afara Tafari Marathi Movie: शशांक शेंडे, संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने यांच्या ‘अफरातफरी’चा टीझर रिलीज झाला आहे. एक कोटींच्या पॉलिसीभोवती फिरणारा हा विनोदी चित्रपट ९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 08, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Afara Tafari Marathi Movie: पैशांसाठी माणूस काहीही करू शकतो, या गंमतीदार झलक दाखवणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘अफरातफरी’ या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या टीझरमधून शशांक शेंडे, संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने या तीन भावांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत असून, त्यांच्या वडिलांनी काढलेली एक खास पॉलिसी आणि त्यातून मिळणाऱ्या तब्बल एक कोटी रुपयांभोवती फिरणारा गोंधळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित हा चित्रपट अ स्कायलाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत करत असून, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अफरातफरी’ येत्या ९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

एक कोटींसाठी तीन भावांच्या मनात नेमकं काय?

टीझरमध्ये शशांक शेंडे, संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने हे तीन भाऊ दिसतात. त्यांच्या वडिलांनी अशी पॉलिसी काढलेली असते, ज्यानुसार त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास तिन्ही मुलांना एक कोटी रुपये मिळणार असतात.

वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या या मोठ्या रकमेभोवती तिन्ही भावांच्या विचारांची चक्रं फिरताना दिसतात. एक कोटी रुपये मिळवण्यासाठी या तिघांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? हा प्रश्न टीझरमधून निर्माण होतो.

विशेष म्हणजे, टीझरमध्ये तात्यांचा अपघात होताना दिसतो आणि त्यानंतरच्या दृश्यात त्यांच्या फोटोला हार घातलेला पाहायला मिळतो. त्यामुळे तात्यांचा खरंच अपघाती मृत्यू झाला आहे का? त्यांच्या मृत्यूनंतर तीन भावांना एक कोटी रुपये मिळणार का? आणि या पैशांसाठी या तिघांकडून नेमकी कोणती ‘अफरातफरी’ घडणार? असे अनेक प्रश्न टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतात.

पैशांचं आमिष अन् भावांची धावपळ

पैशांचे आमिष, तीन भावांची धावपळ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंमतीदार परिस्थितीभोवती ‘अफरातफरी’ची कथा फिरताना दिसते. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना भरभरून मनोरंजनाची मेजवानी देणार असल्याचे टीझरवरून स्पष्ट होते.

Abhinay Berde Career Break: अभिनय बेर्डेने अचानक का घेतला करिअरमधून ब्रेक? VIDEO शेअर करत सांगितलं खरं कारण

दमदार कलाकारांची फौज

‘अफरातफरी’मध्ये मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दमदार कलाकारांची फौज आणि पैशांभोवती फिरणारी विनोदी कथा यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

“प्रेक्षकांची उत्सुकता चित्रपट पाहताना अधिक वाढेल”

चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे म्हणाले, “‘अफरातफरी’ची कथा ही पैशांच्या हव्यासातून निर्माण होणाऱ्या गंमतीदार परिस्थितीभोवती फिरणारी आहे. एका पॉलिसीमुळे तीन भावांच्या आयुष्यात कोणता गोंधळ निर्माण होतो, याची छोटीशी झलक टीझरमधून दाखवली आहे.”

पुढे ते म्हणाले, “शशांक शेंडे, संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने या तिघांची केमिस्ट्री आणि त्यांच्यातून निर्माण होणारे मजेशीर प्रसंग हे या चित्रपटाचं खास आकर्षण आहे. टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न आणि उत्सुकता चित्रपट पाहताना नक्कीच अधिक वाढेल.”

आता एक कोटींची पॉलिसी, तीन भाऊ आणि त्यातून होणारी ‘अफरातफरी’ नेमकी किती मनोरंजक ठरणार, हे ९ ऑक्टोबरला चित्रपटगृहातच पाहायला मिळणार आहे.

Operation Ganga: मोहनलालच्या ‘ऑपरेशन गंगा’त दिसणार लष्करी कारवाईचा थरार; कॉम्बॅट ॲडव्हायझर म्हणून वर्लिन पंवारांची एन्ट्री

Web Title: Afara tafari marathi movie teaser shashank shende sanjay narvekar omkar bhojne

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार
1

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी
2

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी

Abhinay Berde Career Break: अभिनय बेर्डेने अचानक का घेतला करिअरमधून ब्रेक? VIDEO शेअर करत सांगितलं खरं कारण
3

Abhinay Berde Career Break: अभिनय बेर्डेने अचानक का घेतला करिअरमधून ब्रेक? VIDEO शेअर करत सांगितलं खरं कारण

Operation Ganga: मोहनलालच्या ‘ऑपरेशन गंगा’त दिसणार लष्करी कारवाईचा थरार; कॉम्बॅट ॲडव्हायझर म्हणून वर्लिन पंवारांची एन्ट्री
4

Operation Ganga: मोहनलालच्या ‘ऑपरेशन गंगा’त दिसणार लष्करी कारवाईचा थरार; कॉम्बॅट ॲडव्हायझर म्हणून वर्लिन पंवारांची एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.