Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devghar On Rent: अध्यात्माच्या दारात दडलंय कोणतं गूढ? ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक टिझर रिलीज

Devghar On Rent: ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी चित्रपटाचा थरारक टिझर रिलीज झाला आहे. अध्यात्म, गूढरहस्य आणि ॲक्शनचा मिलाफ असलेला हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 07, 2026 | 12:30 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक टिझर रिलीज
  • अध्यात्म, गूढरहस्य अन् ॲक्शनचा अनोखा मिलाफ
  • भाऊ कदम, गौतमी पाटीलसह ‘हे’ कलाकार दिसणार
Devghar On Rent: आध्यात्म, गूढरहस्य आणि थरारक अॅक्शनचा अनोखा मिलाफ साधणाऱ्या आगामी मराठी चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अनोख्या शीर्षकामुळे आधीपासूनच चर्चेत असलेल्या ‘देवघर ऑन रेंट’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याने चित्रपटाबद्दलची उत्कंठा आणखी वाढवली आहे. दाटून आलेलं गूढ वातावरण, पोलिसांचा तपास, रक्तरंजित घटनांचे संकेत आणि देवाच्या दाराशी येऊन थांबणारं अनाकलनीय कथानक याची झलक टिझरमध्ये पाहायला मिळते.

‘देवघर ऑन रेंट’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदूर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात आध्यात्माची वर्तमानाशी सांगड घालताना त्याला नाट्य आणि दमदार अॅक्शनची जोड देण्यात आली आहे.

टिझरमध्ये गूढ वातावरणाची झलक

टिझरच्या सुरुवातीपासूनच एक रहस्यमय वातावरण निर्माण होतं. मंदिरासारखी वास्तू, पोलिसांची धावपळ, संशयास्पद हालचाली, रक्ताने माखलेलं शस्त्र आणि तणावपूर्ण प्रसंग यामुळे ही केवळ आध्यात्मिक कथा नसून त्यात रहस्य आणि अॅक्शनचाही मोठा भाग असल्याचं जाणवतं.

काही पात्रांच्या चेहऱ्यावरील तणाव आणि भावनिक संघर्षही टिझरमध्ये ठळकपणे समोर येतो. त्यामुळे देव, श्रद्धा आणि मानवी कर्म याभोवती फिरणाऱ्या या कथेत नेमकं कोणतं गूढ दडलं आहे, याची उत्सुकता निर्माण होते.

‘कर्म काहीही असो, सगळ्या वाटा देवाच्या दारात जातात’ या विचाराभोवती चित्रपटाची कथा गुंफलेली असल्याची झलक मिळते. ‘विचार आणि अविचाराच्या उंबरठ्यावरची गोष्ट’ अशी या चित्रपटाची ओळख करून देण्यात आली आहे.

 

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन

दाक्षिणात्य अॅक्शनचीही जोड

‘देवघर ऑन रेंट’मध्ये मराठी कलाकारांसोबत दाक्षिणात्य कलाकार आणि तंत्रज्ञांचाही सहभाग आहे. ‘KGF’ फेम अभिनेता गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विशेष म्हणजे चित्रपटातील अॅक्शनची जबाबदारी दाक्षिणात्य अॅक्शन मास्टर कार्तिक डंगरी यांनी सांभाळली आहे. त्यामुळे मराठी कथेला दाक्षिणात्य शैलीतील अॅक्शनची भव्य जोड मिळणार आहे.

कोणते कलाकार दिसणार?

या चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील यांच्या भूमिका आहेत. गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्त्वाच्या व्यक्तिरेखांमध्ये दिसणार आहेत.

स्वरूप सावंत यांचं दिग्दर्शन

आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी स्वरूप सावंत यांनी सांभाळली असून, चित्रपटाची संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची आहे. कथा, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत.

चित्रपटाच्या तांत्रिक बाजूची जबाबदारीही अनुभवी टीमने सांभाळली आहे. चैतन्य साळुंखे यांनी सिनेमॅटोग्राफी, रोहित नागभीडे यांनी पार्श्वसंगीत, दिलीप कंधारे यांनी कला दिग्दर्शन आणि किशोर दळवी यांनी कोरिओग्राफी केली आहे. संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी चित्रपटातील गीतांना संगीत दिलं आहे.

OTT Release: या आठवड्यात OTTवर होणार मनोरंजनाचा ‘घमासान’; ‘सिरफिरे’ही घेऊन येणार क्रांतीची मशाल!

२५ सप्टेंबरला चित्रपटगृहात

अध्यात्म, रहस्य, नाट्य आणि अॅक्शन यांचा अनोखा मेळ साधणारा ‘देवघर ऑन रेंट’ प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. टिझरमधील गूढ वातावरणामुळे चित्रपटाची कथा नेमकी कोणतं रहस्य उलगडणार, याची उत्सुकता आता वाढली आहे. हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदूर आणि बडोदा येथे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Devghar on rent marathi movie teaser release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Gautami patil
  • marathi movie

संबंधित बातम्या

Ashwini Bhave: परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर! कॅलिफोर्नियात अश्विनी भावेंनी घेतलं ढोल वादनाचं प्रशिक्षण
1

Ashwini Bhave: परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर! कॅलिफोर्नियात अश्विनी भावेंनी घेतलं ढोल वादनाचं प्रशिक्षण

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन
2

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन

OTT Release: या आठवड्यात OTTवर होणार मनोरंजनाचा ‘घमासान’; ‘सिरफिरे’ही घेऊन येणार क्रांतीची मशाल!
3

OTT Release: या आठवड्यात OTTवर होणार मनोरंजनाचा ‘घमासान’; ‘सिरफिरे’ही घेऊन येणार क्रांतीची मशाल!

Bigg Boss 20: घरात एन्ट्री करताच माही विजचा हुकूम सुरू; कोणाकडून बनवली चहा, तर कोणाकडून उचललं सामान!
4

Bigg Boss 20: घरात एन्ट्री करताच माही विजचा हुकूम सुरू; कोणाकडून बनवली चहा, तर कोणाकडून उचललं सामान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.