Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Viral Video: भारतामध्ये सहज आणि अनेकदा मोफत मिळणाऱ्या कडीपत्त्यासाठी अमेरिकेत चक्क 4 डॉलर मोजावे लागतात, हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका मराठी महिलेने आठवडी बाजाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यामध्ये भारतीय भाज्या आणि फळांचीही विक्री होताना दिसते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 07, 2026 | 03:34 PM
Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेतील बाजारात कडीपत्त्याची किंमत ऐकून मराठी महिला थक्क.
  • भारतात सहज मिळणाऱ्या कडीपत्त्यासाठी अमेरिकेत द्यावे लागतात 4 डॉलर.
  • kokan_to_america पेजवरील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.
 

Curry Leaves Price in America: आपण नेहमी म्हणतो भारतात खूप महागाई वाढली आहे. भाज्या महाग झाल्या, सगळं महाग झालं. पण परदेशात वस्तू काही स्वस्त नाहीत. उलट भारतात जी गोष्ट 5-10 रुपयांना फुकट मिळते मात्र, परदेशात राहणाऱ्या व्यक्तींना त्याच भाज्यासाठी 4-5 डॉलर मोजावे वागतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि तो बघून सगळेच थक्क झाले आहेत.

कडीपत्त्यासाठी 4 डॉलर?

हा व्हिडीओ kokan_to_america या इंस्टाग्राम पेजवर एका मराठी महिलेने शेअर केला आहे. ती महिला अमेरिकेत राहते आणि तिने तिथला आठवडी बाजार कसा असतो हे दाखवले आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय त्या बाजारात आपल्यासारख्याच भाज्या कारली, भेंडी, वांगी, शेवग्याच्या शेंगा, पालक आहेत. भारतीय भाज्या फळांच्या स्टॉलवर सफरचंद, पेरू, डाळिंब, कलिंगड सगळी ताजी फळं पण आहेत.तिने भाजी घेतली, कोथिंबीर घेतली आणि नेहमीप्रमाणे आपल्या भारतीय सवयीनुसार तिने दुकानदाराला विचारलं, “काका, दोन काड्या कडीपत्ता फ्रीमध्ये द्याल का?” आपल्याकडे कोथिंबिरीसोबत कडीपत्ता फुकट देतातच. पण तिथे जे उत्तर मिळालं ते ऐकून तिला पण धक्का बसला.

दुकानदार काय म्हणाला?

दुकानदार सरळ म्हणाला, कडीपत्ता हवा असेल तर 4 डॉलर द्यावे लागतील म्हणजेच आपले जवळपास 350 रुपये आहेत. त्यानंतर दुकानदाराने तिला एक टोला मारला. तो म्हणाला की, “हे कॅलिफोर्नियाचं गोल्ड आहे.”

व्हिडिओ पाहून नेटकरी आवाक्

व्हिडिओ पाहून नेटकरी आवाक् झाले. हा व्हिडिओ हजारो लोकांनी बघितला आणि सगळे जण हेच बोलत आहेत की, भारतात कडीपत्ता कुणी विकतच घेत नाही. भाजीवालाच कोथिंबिरीसोबत मूठभर कडीपत्ता फुकट टाकून देतो. अनेकांच्या घराच्या अंगणात किंवा कुंडीत कडीपत्त्याचं झाड असतं. 10 रुपयात पिशवी भरून मिळतो. पण अमेरिकेत त्याच कडीपत्त्यासाठी 350 रुपये.खरं तर यामागचं कारण पण तसंच आहे. कडीपत्ता हा आपल्या भारतीय जेवणातला मुख्य भाग आहे. फोडणीत कडीपत्ता नसेल तर जेवणाला चवच येत नाही.

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

एक गोष्ट नक्की लक्षात

त्यामुळे भारतात त्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं. प्रत्येक शेताच्या बांधावर, घराच्या परसात कडीपत्त्याची झाडं असतात. त्यामुळे तो सहज मिळतो. पण अमेरिकेत त्याची गोष्ट वेगळी आहे. अमेरिकन लोकांच्या जेवणात कडीपत्त्याचा वापरच होत नाही. तो फक्त इंडियन स्टोअर किंवा आशियाई बाजारातच मिळतो. त्याला तिकडे आणण्यासाठी खर्च येतो, त्यामुळे त्याची किंमत आपोआप वाढते.

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले

तिकडे कडीपत्ता फुकट मिळत नाही, त्यासाठी पैसे मोजावे लागतात.हा व्हिडीओ बघितल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात येते की आपल्या भारतात ज्या गोष्टी आपल्याला अगदी सहज आणि स्वस्त मिळतात, त्यांची किंमत परदेशात किती जास्त आहे. त्या महिलेचा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेत आहे.

Web Title: Curry leaves cost 4 in america marathi womans reaction goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • marathi movie
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल
1

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

Devghar On Rent: अध्यात्माच्या दारात दडलंय कोणतं गूढ? ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक टिझर रिलीज
2

Devghar On Rent: अध्यात्माच्या दारात दडलंय कोणतं गूढ? ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक टिझर रिलीज

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले
3

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
4

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.