Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज! प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘भूतम भयम्’ या मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपटात अभिनेता प्रियदर्शन जाधव ‘मया’ ही रहस्यमय व्यक्तिरेखा साकारत आहेत. गूढ स्वभाव आणि अनपेक्षित वळणांमुळे हे पात्र चित्रपटातील महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 24, 2026 | 07:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ हा मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट सध्या सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हॉरर, कॉमेडी आणि रहस्य यांचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. अशातच आता चित्रपटाशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला असून अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांची ‘मया’ ही रहस्यमय व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आली आहे.

Vanita Kharat : हातात संविधान घेऊन भर चौकात उभी अभिनेत्री! वनिताने वेधलं साऱ्यांचं लक्ष, विद्यार्थ्यांसाठी दिला लढा

चित्रपटात ‘मया’ हे पात्र अत्यंत वेगळ्या स्वभावाचे आणि गूढतेने भरलेले आहे. त्याच्या प्रत्येक कृतीमागे एखादे रहस्य दडलेले असल्याने तो प्रेक्षकांना सतत संभ्रमात ठेवतो. कथेला अनपेक्षित वळण देणारी ही व्यक्तिरेखा नेमकी कोण आहे, तिचा घटनांशी काय संबंध आहे आणि ती कोणते रहस्य उलगडणार आहे, याची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.

या भूमिकेबाबत प्रियदर्शन जाधव म्हणाले, “‘भूतम भयम्’चा भाग होणं हा माझ्यासाठी खूप वेगळा आणि आनंददायी अनुभव होता. ‘मया’ ही व्यक्तिरेखा पहिल्यांदा ऐकली तेव्हाच तिचं वेगळेपण मला भावलं. वरकरणी साधा वाटणारा हा माणूस प्रत्यक्षात अनेक रहस्यांनी भरलेला आहे. त्याची देहबोली, संवादफेक आणि त्यामागचं गूढ जपत ही भूमिका साकारणं माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. प्रत्येक प्रसंगात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळाली. ‘मया’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्याचा धक्का देईल आणि चित्रपट संपल्यानंतरही त्यांच्या लक्षात राहील, असा मला विश्वास आहे.”

रामचंद्र अरुण गांवकर लिखित व दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे असून, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. चित्रपटात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम, पुष्कराज चिरपुटकर, छाया कदम आणि प्रियदर्शन जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Rakhi Sawant : ‘विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्यांना हेच उत्तर’; सॅनिटरी पॅड हातात घेऊन राखी सावंतचा अनोखा विरोध चर्चेत

हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा मेळ, दमदार कलाकारांची फळी आणि आता ‘मया’सारखी गूढ व्यक्तिरेखा यामुळे ‘भूतम भयम्’ प्रेक्षकांसाठी अधिकच उत्सुकतेचा विषय ठरत आहे. या रहस्यमय पात्रामुळे चित्रपटात आणखी थरार आणि मनोरंजनाची भर पडणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Web Title: Bhootam bhayam priyadarshan jadhav maya mystery character marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • Hindi Movie
  • Marathi celebrities

संबंधित बातम्या

Khatu Shyam Movie: ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’; खाटू श्याम बाबांची कथा आता मोठ्या पडद्यावर, २०२७ मध्ये होणार रिलीज!
1

Khatu Shyam Movie: ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’; खाटू श्याम बाबांची कथा आता मोठ्या पडद्यावर, २०२७ मध्ये होणार रिलीज!

Krishnavataram Global Release: श्री श्री रविशंकर आणि क्रिएटिव्हलँडची हातमिळवणी; ‘कृष्णावतारम’ ट्रायलॉजी जगभरात पोहोचणार
2

Krishnavataram Global Release: श्री श्री रविशंकर आणि क्रिएटिव्हलँडची हातमिळवणी; ‘कृष्णावतारम’ ट्रायलॉजी जगभरात पोहोचणार

OTT Release: या आठवड्यात OTTवर होणार मनोरंजनाचा ‘घमासान’; ‘सिरफिरे’ही घेऊन येणार क्रांतीची मशाल!
3

OTT Release: या आठवड्यात OTTवर होणार मनोरंजनाचा ‘घमासान’; ‘सिरफिरे’ही घेऊन येणार क्रांतीची मशाल!

Suraj Chavan: ‘सूरज चव्हाण झाला बाबा!’ कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
4

Suraj Chavan: ‘सूरज चव्हाण झाला बाबा!’ कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.