फोटो सौजन्य - Social Media
“जय भारत! जय संविधान! काल NEET प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात सहभागी झाले. आपण जिथे असू, तिथून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण आज प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा, मेहनतीचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. तो प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्या संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून भविष्य घडत नाही; त्यांचा आवाज ऐकून राष्ट्र घडतं. आवाज द्या. प्रश्न विचारा. न्यायाची साथ द्या.”
एकंदरीत, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी तसेच त्यांच्या आवाजाला अधिक बळकट करण्यासाठी वनिताने या आंदोलनात सहभाग घेतल्याचे सांगितले आहे. वनितासह महाराष्ट्राची हास्यजत्रेतील इतर कलाकारही या आंदोलनात उपस्थित होते. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर तसेच अभिनेता रोहित मानेची पत्नीही या आंदोलनात उपस्थित होती.
‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?
चाहत्यांचा प्रतिसाद काय?
या आंदोलनाला पाठिंबा न देणाऱ्या काही चाहत्यांनी अभिनेत्री वनिता खरातविषयी नाराजी व्यक्त केली आहे. एका चाहत्याने कमेंट करत, “हास्यजत्रेमध्ये सगळेच लेफ्टिस्ट भरले आहेत का? असंच असेल तर यापुढे हा कार्यक्रम पाहणार नाही. विषय काय आहे, याचं तरी भान ठेवा,” असे म्हटले. यावर आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या एका नेटकऱ्याने विरोधकांना प्रत्युत्तर देत, “वनिता कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा द्यायचा नाही, हा पूर्णपणे तिचा वैयक्तिक निर्णय आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.






