Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deool Band 2: ‘… तर माझं ‘देऊळ कायमचं बंद’! ‘देऊळ बंद २’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज; आता होणार थेट देवाची परीक्षा!

'वटवृक्ष एण्टरटेन्मेंट' निर्मित आणि प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित 'देऊळ बंद २' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा थरारक, भावनिक आणि डोळ्यात अंजन घालणारा अधिकृत ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 19, 2026 | 10:19 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

देऊळ बंद चित्रपटाचा पहिला भाग दहा वर्षांपूर्वू प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व इतिहास घडवणाऱ्या ‘Deool Band 2’ चित्रपटानंतर, प्रेक्षक ज्या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या २१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘वटवृक्ष एण्टरटेन्मेंट’ निर्मित आणि प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा थरारक, भावनिक आणि डोळ्यात अंजन घालणारा अधिकृत ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. “आता परीक्षा देवाची…” या अत्यंत आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक टॅगलाईनसह येत असलेला हा भव्य चित्रपट येत्या २१ मे २०२६ रोजी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘Deool Band 2’ चे कथानक सामाजिक वास्तव, श्रद्धा आणि मानवी संघर्ष या विषयांवर प्रकाश टाकणारे आहे. देऊळ बंद २ मध्ये एक शेतकरी महिला आता देवाची परिक्षा घेणार आहे. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या असे बरेच प्रश्न ही महिला देवाला विचारणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म यांमधील संघर्षासोबतच, या भागात देवाचे अस्तित्व आणि सामाजिक उत्तरदायित्व यांविषयीची मांडणी अत्यंत प्रभावीपणे करण्यात आली आहे.

ट्रेलरची सुरुवातच एका आव्हानात्मक संवादाने होते, जिथे स्वामी समर्थांच्या अस्तित्वाला एका भक्ताची परीक्षा द्यावी लागत आहे. “बाईच्या मनाची खोली मोजू नको बाबा त्यात शेतकऱ्याची…” “या देशात सगळं ओरिजनल आहे, डुप्लिकेट फक्त शेतकरी!” यांसारखे संवाद थेट मनाला भिडतात आणि चित्रपटाची संवेदनशीलता अधोरेखित करतात. “रोज एक तरी आत्महत्या होणाऱ्या आमच्या या तालुक्यात पुढच्या आठ दिवसात एकही आत्महत्या झाली नाही पाहिजे… जर झाली तर माझं देऊळ बंद कायमचं!” हा ट्रेलरमधील सर्वात शक्तिशाली संवाद असून, तोच चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे व येथे देवालाच त्याच्या अस्तित्वाची आणि कृपेची परीक्षा देण्याचे थेट आव्हान देण्यात आले आहे.

 

मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास! १० वर्षांनी मोडला ‘सैराट’चा विक्रम, ‘Raja Shivaji’ ठरला १०० कोटी कमावणारा दुसरा मराठी सिनेमा

या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले असून चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे पुन्हा एकदा ‘स्वामी समर्थांच्या’ दैवी भूमिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. त्यांच्यासोबत स्नेहल तरडे, आणि स्वतः प्रवीण तरडे सदूशेठ नावाच्या १०० तोंडांच्या रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची भव्य निर्मिती कैलास वाणी, सौ. जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी – सूर्यवंशी यांनी केली आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि ग्रामीण भागाचे वास्तववादी चित्रीकरण ट्रेलरमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. २१ मे २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या “देऊळ बंद २” मध्ये स्वामी भक्तीचा गजर आणि सामाजिक प्रबोधन यांचा अनोखा मिलाफ कौटुंबिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

Salman Khanच्या व्हायरल पोस्टमागचं अखेर सत्य समोर; ‘मम्मी पूछ रही हैं…’ म्हणत सांगितली फोटोमागची खरी गोष्ट

देऊळ बंद २ चित्रपटातील कलाकार
या चित्रपटात प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांच्यासह ‘लाखात एक आमचा दादा’ फेम शत्रू म्हणजेच अतुल कुदळे, पिट्याभाई म्हणून प्रसिद्ध रमेश परदेशी, तसेच ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा समावेश आहे.

याशिवाय महेश मांजरेकर, ओम भूतकर, मंगेश देसाई, प्रसाद ओक, सविता मालपेकर, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, जगन्नाथ निवंगुणे आणि संस्कृती बालगुडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

अशा दमदार कलाकारांच्या उपस्थितीमुळे ‘देऊळ बंद २’बाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली असून, हा चित्रपट मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

Web Title: Deool band 2 then my temple will be shut forever goosebump inducing trailer released now begins the direct test of god

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • marathi movie
  • pravin tarade
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव
1

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?
2

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट
3

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली
4

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.