Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी चित्रपटाचा थरारक ट्रेलर रिलीज झाला आहे. अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनने भरलेला हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 17, 2026 | 11:03 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Devghar On Rent Marathi Movie:अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शन यांचा अनोखा मिलाफ असलेला आगामी मराठी चित्रपट ‘देवघर ऑन रेंट’ सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला असून, त्यातून गूढ आणि थरारक कथानकाची झलक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ‘देवघर’ आणि ‘रेंट’ या दोन शब्दांमागे नेमकं कोणतं गूढ दडलं आहे? याची उत्सुकता ट्रेलरमुळे वाढली आहे.

‘देवघर ऑन रेंट’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदोर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे.

रहस्यमय देवघराभोवती फिरणारं कथानक

ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच चित्रपटातील गूढ वातावरणाची जाणीव होते. अर्थपूर्ण संवाद, संशयास्पद घटना आणि व्यक्तिरेखांमधील संघर्ष कथानकातील उत्कंठा वाढवतात. पोलीस तपास, गुन्हेगारी जगत आणि एका रहस्यमय देवघराभोवती घडणाऱ्या घटनांची गुंफण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

चित्रपटात केवळ रहस्य आणि थरार नाही, तर भावनिक पदरही असल्याचे ट्रेलरमधून संकेत मिळतात. देवघराच्या परिसरातील आध्यात्मिक संदर्भ आणि अनाकलनीय घटनांमुळे कथा नेमकी कोणत्या वळणावर जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

ॲक्शनचा जबरदस्त तडका

‘देवघर ऑन रेंट’मध्ये ॲक्शन सीक्वेन्सलाही विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. पाठलाग, हाणामारी आणि संघर्षाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. दाक्षिणात्य शैलीच्या ॲक्शनचा वापर करत चित्रपटाचा आवाका भव्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

निखिल चव्हाण ते गौतमी पाटील; दमदार कलाकारांची फौज

या चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नागरकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील यांच्या भूमिका आहेत.

याशिवाय ‘KGF’ फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे मराठी कलाकारांसोबत दाक्षिणात्य कलाकारांची जोडी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांची निर्मिती

आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. दिग्दर्शन स्वरूप सावंत यांनी केलं आहे. चित्रपटाची संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची असून कथा, पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे.

चित्रपटासाठी संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी संगीत दिलं आहे. कोरिओग्राफी किशोर दळवी यांनी केली असून, डीओपी चैतन्य साळुंके यांनी सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे. रोहित नागभीडे यांनी पार्श्वसंगीत केलं आहे.

CBFC New Board: तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूडसह ‘या’ मराठी चेहऱ्यांना मिळालं स्थान!

चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्सची जबाबदारी राकेश पाटील आणि कार्तिक डंगरी यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शन दिलीप कंधारे, वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी आणि रंगभूषा सुजीत सुरवसे यांनी केली आहे.

कार्यकारी निर्माते अनुनेहा घोडके आणि निर्मिती व्यवस्थापक यश सणस आहेत. अक्षय लोणदे यांनी सिंक साऊंड, शर्मा यांच्या टीमने प्रकाशयोजना, तर विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिलं आहे.

आता २५ सप्टेंबरला ‘देवघर ऑन रेंट’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शन यांचं हे मिश्रण प्रेक्षकांना कसं भावतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’, गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Web Title: Devghar on rent marathi movie trailer release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

CBFC New Board: तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूडसह ‘या’ मराठी चेहऱ्यांना मिळालं स्थान!
1

CBFC New Board: तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूडसह ‘या’ मराठी चेहऱ्यांना मिळालं स्थान!

Kantara SIIMA Awards: ‘कांतारा’ने रचला इतिहास; सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तब्बल 9 पुरस्कारांवर कोरले नाव
2

Kantara SIIMA Awards: ‘कांतारा’ने रचला इतिहास; सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तब्बल 9 पुरस्कारांवर कोरले नाव

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’,  गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
3

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’, गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव
4

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.