Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Dwidha: द्विधा या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे आज अनावरण करण्यात आले. या सोहळ्यासाठी चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. बाप लेकीच्या नात्याबाबत ही कहाणी आहे. पहा ट्रेलर

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 14, 2026 | 10:15 PM
द्विधाचे ट्रेलर प्रदर्शित

द्विधाचे ट्रेलर प्रदर्शित

Follow Us
Follow Us:
  • द्विधा मराठी चित्रपटाचे ट्रेलर आज अनावरण 
  • बाप मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा चित्रपट
  • ४ सप्टेंबर रोजी होणार प्रदर्शित 
मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे नुकतेच दिमाखदार अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी बॉलीवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांची विशेष उपस्थिती लाभली. 

बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक संघर्ष आणि आयुष्यातील कठीण निर्णयांची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि संकलन निलेश भास्कर नाईक यांचे असून, निर्मिती विदुला रमेश आजगावकर यांनी केली आहे. ‘द्विधा’ चित्रपट येत्या ४ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Dwidha Marathi Movie: बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास; ‘द्विधा’ उलगडणार भावनांची नवी बाजू

कशी आहे कथा 

‘द्विधा’ हा बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, जबाबदारी, त्याग आणि भावनिक द्वंद्व यांची मनाला भिडणारी कथा आहे. आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणावर उभी असलेली मुलगी आणि तिच्या वडिलांमधील नात्याचे भावनिक पदर चित्रपटातून उलगडले जातात. नात्यांमधील संघर्ष, माणुसकी आणि भावनिक निर्णयांचा हा प्रवास प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा ठरणार आहे.

काय म्हणाले कलाकार

चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मानसी कुलकर्णीने सांगितले की,  ‘द्विधा’ माझ्यासाठी खूप खास अनुभव आहे. बाप-लेकीचं नातं वरकरणी साधं वाटत असलं, तरी त्यामागे अव्यक्त भाव, प्रेम आणि संघर्ष दडलेले असतात. माझ्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून हे भावविश्व अनुभवताना मला स्वतःलाही अनेक गोष्टी नव्याने जाणवल्या. ट्रेलरमध्ये या नात्याची केवळ एक झलक पाहायला मिळते; मात्र संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर या नात्याची खोली प्रेक्षकांना अधिक जाणवेल. ‘द्विधा’ची कथा प्रत्येकाच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, असा मला विश्वास आहे.’

ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर म्हणाले, ‘बाप-लेकीचं नातं हे अत्यंत हळवं आणि भावनिक असतं. ‘द्विधा’मध्ये एका वडिलांच्या मनातील आपल्या मुलीविषयीचं प्रेम, काळजी, जबाबदारी आणि तिच्या निर्णयांबद्दलची अस्वस्थता साकारताना एक वेगळाच अनुभव मिळाला. या व्यक्तिरेखेतील भावना अतिशय सूक्ष्म पद्धतीने मांडल्या आहेत. ट्रेलर अनावरणाच्या निमित्ताने या कथेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर येत आहे, याचा आनंद आहे. 

Dwidha Movie: रिअल ते रील… ‘द्विधा’मध्ये दिसणार मायलेकीचं खास बॉन्डिंग; मानसी कुलकर्णींची लेक ओवी करणार अभिनयात पदार्पण

चित्रपटात कलाकारांची मंदियाळी 

‘द्विधा’ चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत रेणुका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

चित्रपटातील गीतांना मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर यांचे शब्द लाभले असून, निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. हंसिका परीक आणि मयुरी पटवर्धन यांच्या स्वरांनी गीते अधिक भावपूर्ण झाली आहेत. छायांकन सिमरजीत सुमन, अश्विनी पाखरोट आणि श्रीधर अल्ले यांचे असून, वेशभूषा विदुला आजगावकर यांची आहे. ध्वनीरचना इक्रामुद्दीन रुस्तम लोचूर यांची, तर ध्वनीमिश्रण योगेश कारभारी नेहे आणि आकाश स्वजन सेनगुप्ता यांचे आहे.

Web Title: Dwidha marathi movie trailer launch emotional story about father daughter relation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 10:15 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
1

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज
2

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
3

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट
4

Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.