Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fauji Marathi Movie: शून्यातून उभा राहिला ‘फौजी’! जिद्द, संघर्ष अन् देशप्रेमाची कहाणी; ‘या’ दिवशी होणार रिलीज

Fauji Marathi Movie: फौजी’ हा मराठी चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, भारतीय सैनिकांच्या त्यागाची आणि त्यांच्या शौर्याची कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 31, 2026 | 10:40 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Fauji Marathi Movie: देशसेवा ज्यांच्या रक्तात भिनलेली आहे, मात्र शारीरिक अडचणींमुळे लष्करात भरती होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अशा एका सामान्य तरुणाच्या जिद्दीची आणि अफाट आत्मविश्वासाची कहाणी आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘फौजी’ हा मराठी चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, भारतीय सैनिकांच्या त्यागाची आणि त्यांच्या शौर्याची कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे.

‘फौजी’ हा केवळ एक चित्रपट नसून, या सिनेमामागे अनेक वर्षांचा संघर्ष, जिद्द आणि भावनिक प्रवास आहे. एनसीसीपासून सुरू झालेला प्रवास, फौजी बांधवांचं महत्त्व घराघरात पोहोचवण्याचं स्वप्न, नोटबंदी आणि कोरोना काळातील अडचणी, जवळच्या मित्राचा अपघाती मृत्यू आणि चित्रपटाच्या रिलीजच्या काळात मार्गदर्शकावर आलेलं आरोग्याचं संकट अशा अनेक आव्हानांवर मात करत हा चित्रपट पूर्णत्वास आला आहे.

Tejaswini Pandit: ‘त्यांच्या संस्कारांचं दप्तर..’, आईच्या ७०व्या वाढदिवशी तेजस्विनी पंडित झाली भावूक, पोस्ट करत म्हणाली…

एनसीसीपासून ‘फौजी’च्या निर्मितीपर्यंतचा प्रवास

‘फौजी’चे दिग्दर्शक घनश्याम येडे यांना लहानपणापासूनच देशासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी एनसीसीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सैनिकांविषयीचा आदर जपला. मात्र, शारीरिक अडचणींमुळे त्यांना प्रत्यक्ष सैन्यात दाखल होता आलं नाही.

सैनिकांचं खरं महत्त्व आणि त्यांच्या त्यागाची गाथा प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारातून त्यांच्या मनात ‘फौजी’ या चित्रपटाची संकल्पना आकाराला आली. या प्रवासात त्यांची भेट सुहास गरगडे यांच्याशी झाली. दोघांची आर्थिक परिस्थिती सामान्य असली तरी सैनिकांसाठी काहीतरी करण्याची जिद्द मोठी होती.

चित्रपट उभा करण्यासाठी बँका, पतसंस्था आणि सावकारांच्या माध्यमातून त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, अनेक अडचणींचा सामना करत हा चित्रपट पूर्ण करावा लागला.

नोटबंदी आणि कोरोनामुळे वाढला संघर्ष

चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान नोटबंदी आणि त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, या संकटांवर मात करत चित्रपटाचा प्रवास सुरू राहिला. वासुदेव महाराज गरुड यांच्या आशीर्वादासह सतीश नाझरकर, अशोक नाझरकर, गणेश गुंजाळ, डॉ. शंकर तळबे, सुनील गावडे, अशोक गाडे, प्रवीण बुरुंगे, राजेंद्र करणे, विष्णुपंत नेवाळे, शिवाजी दडस, कोंडीबा नलावडे आणि जोतीबा घाडगे यांसारख्या सहकाऱ्यांच्या मदतीने चित्रपट हळूहळू पूर्णत्वाकडे वाटचाल करू लागला.

The Paradise Song: ‘द पॅराडाईज’चं दुसरं गाणं ‘येशा नागुला’ रिलीज; नानी-कीर्तीच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

जिवलग मित्राच्या निधनाने मोठा धक्का

चित्रपट अंतिम टप्प्यात असतानाच काळाने मोठा आघात केला. चित्रपटातील प्रमुख पात्रांपैकी एक आणि दिग्दर्शक घनश्याम येडे यांचे जिवलग मित्र सुहास गरगडे यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला आणि चित्रपटाचा प्रवासही अडचणीत आला.

या कठीण परिस्थितीत घनश्याम येडे यांच्यावर स्वतःचं घर आणि जमीन गहाण ठेवण्याची वेळ आली. मात्र, मित्राचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी सोडला नाही. सुहास गरगडे यांच्या जागी त्यांचे धाकटे भाऊ मयूर गरगडे यांना चित्रपटात घेण्यात आलं. अशा पद्धतीने जिवलग मित्राच्या स्वप्नाला पूर्णत्व देत त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

नाथ विश्वनाथ साहेबांचं मोलाचं मार्गदर्शन

या संघर्षाच्या काळात घनश्याम येडे यांनी वडिलांचं स्थान दिलेले नाथ विश्वनाथ साहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सामाजिक आशय असलेल्या ‘फौजी’सारख्या चित्रपटाला त्यांनी मोलाचं मार्गदर्शन आणि साथ दिली.

त्यांचे आशीर्वाद आणि सहनिर्माती स्वप्नजा विश्वनाथ यांच्या साथीमुळे चित्रपटाला आणखी बळ मिळालं. सेन्सॉरच्या प्रक्रियेनंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निश्चित करण्यात आली.

मात्र, रिलीजची तारीख जवळ येत असतानाच नाथ विश्वनाथ साहेब गंभीर आरोग्य संकटात सापडले. त्यांच्या मुलीने स्वतःच्या शरीराचा अवयव दान करून त्यांना जीवदान दिल्याचं सांगण्यात आलं आहे. या कठीण परिस्थितीतही चित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली नाही.

‘साहेब जगले तर असे अनेक चित्रपट मी पुन्हा उभे करू शकेन,’ असा विश्वास घनश्याम येडे यांच्या मनात होता. आज त्यांचा हा विश्वास खरा ठरल्याचं ते सांगतात.

सुधीरदादा पाटसकर यांचा खंबीर पाठिंबा

या अटीतटीच्या काळात ‘एकलव्य प्रतिष्ठान’ आणि सुधीरदादा पाटसकर हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता म्हणून पुढे आले. चित्रपट पाहिल्यानंतर घनश्याम येडे यांचं देशप्रेम, साधेपणा आणि प्रामाणिकपणा सुधीरदादांना भावला.

हा चित्रपट घराघरांपर्यंत पोहोचला पाहिजे, या भावनेतून त्यांनी ‘फौजी’च्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या पाठिंब्यामुळे चित्रपटाच्या प्रवासाला आणखी बळ मिळालं.

दिग्गज कलाकारांची फौज

‘फौजी’मध्ये सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, शाहबाज खान, टीनू वर्मा, संजय खापरे, नागेश भोसले, हंसराज जगताप, अश्विनी कासार आणि खुद्द घनश्याम येडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाच्या संगीताची बाजूही दमदार आहे. शान, वैशाली माडे, बेला शेंडे, आदर्श शिंदे, उर्मिला धनगर आणि कविता राम यांच्या सुरेल आवाजाने चित्रपटाला संगीताची वेगळी उंची मिळाली आहे.

२७ नोव्हेंबरला ‘फौजी’ प्रेक्षकांच्या भेटीला

अनेक संकटांवर मात करत अखेर ‘फौजी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सैनिकांचं शौर्य, त्याग आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्ष मांडणारा हा चित्रपट असल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे.

‘फौजी’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Fauji marathi movie release date 2026 ghanshyam yede

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi cinema

संबंधित बातम्या

OTT Release: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरबसल्या पाहता येणार नवे सिनेमे-सीरिज; पाहा संपूर्ण यादी
1

OTT Release: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरबसल्या पाहता येणार नवे सिनेमे-सीरिज; पाहा संपूर्ण यादी

Tejaswini Pandit: ‘त्यांच्या संस्कारांचं दप्तर..’, आईच्या ७०व्या वाढदिवशी तेजस्विनी पंडित झाली भावूक, पोस्ट करत म्हणाली…
2

Tejaswini Pandit: ‘त्यांच्या संस्कारांचं दप्तर..’, आईच्या ७०व्या वाढदिवशी तेजस्विनी पंडित झाली भावूक, पोस्ट करत म्हणाली…

Mahima Mhatre: तूला जपणार आहे’च्या सेटवर घडला भयंकर अपघात; ८ महिन्यांनी महिमाने काढली नाकावरची पट्टी, सांगितला थरारक प्रसंग
3

Mahima Mhatre: तूला जपणार आहे’च्या सेटवर घडला भयंकर अपघात; ८ महिन्यांनी महिमाने काढली नाकावरची पट्टी, सांगितला थरारक प्रसंग

The Paradise Song: ‘द पॅराडाईज’चं दुसरं गाणं ‘येशा नागुला’ रिलीज; नानी-कीर्तीच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष
4

The Paradise Song: ‘द पॅराडाईज’चं दुसरं गाणं ‘येशा नागुला’ रिलीज; नानी-कीर्तीच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.